मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 65
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------10
महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांची व नामदारसाहेबांची भेट तंबूमध्ये चिकाचा पडदा लावून झाली. त्यांस नामदारसाहेबांनी मोठ्या आदबीने सलाम केला. नंतर त्यांचे व बायजाबाईसाहेबांचे, मि० म्याक्नॉटन ह्यांच्या मध्यस्थीने, कांहीं वेळ संभाषण झालें. रीतीप्रमाणे नजरनजराणे, पानसुपारी व अत्तरगुलाब होऊन दरबार बरखास्त झाला. । | दुसरे दिवशी सकाळी मराठ्यांचे सैन्य ग्वाल्हेरीकडे परत वळलें, व ना० गव्हरनर जनरल ह्यांची स्वारी एक दिवसानंतर–ह्मणजे ता. २१ डिसेंबर रोजी कूच करिती झाली. त्यानंतर तोफखाना परत निघाला. चंबळा नदीचे ग्वाल्हेरच्या बाजूचे ओहोळ हे आग्याच्या बाजूपेक्षा अधिक बिकट असल्यामुळे त्यांतून सुरक्षितपणे तोफा नेणे जवळजवळ अशक्य होते; ह्मणून ता. २१ रोजी सर्व सैन्य पुढे पाठवून, तोफखाना स्वतंत्र रीतीने न्यावा, असा विचार ठरला. आह्मी आल्यानंतर दुसरे दिवशीं महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांची भेट घेतली. एतद्देशीय स्त्रियांनी युरोपियन स्त्रियांची भेट घेण्याची फारशी चाल नाहीं. परंतु बायजाबाईनीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांची मुलाखत व्हावी अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे तो योग घडून आला. प्रथमतः बायजाबाईसाहेब ह्यांनी रीतीप्रमाणे त्यांना पेशवाईची भेट९४ दिली. त्या वेळी त्यांच्याबरोबर त्यांची कन्या चिमणाबाई ( ही आपासाहेब पाटणकर ह्यांस दिली होती ) व इतर सरदारांच्या स्त्रिया गेल्या होत्या. युरोपियन स्त्रियांना ह्या भेटीचे फार कौतुक वाटून त्या, लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांस, राजस्त्रियांच्या स्वागताचे कामी मदत करण्याकरितां आल्या होत्या. युरोपियन स्त्रियांनी चिमणाबाईचे सौंदर्य पाहून त्यापुढे आपलें रूप कांहींच नव्हे, असे प्रांजलपणे कबूल केले. त्यांनीं, तिचे अप्रतिम लावण्य, तिचा गौरवर्ण, तिचे तेजस्वी व पाणीदार नेत्र आणि नाजूक व रेखलेले अवयव पाहून, इंग्लंडांतील प्रत्येक स्त्री तिचा हेवा करील, अशा प्रकारे तिच्या रूपाची फार फार प्रशंसा केली. ह्या वेळीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांनी महाराणीसाहेबांस कांहीं चिनी वस्तू व अलंकार नजर केले. हे त्यांच्या भेटीच्या अगोदर तीन चार तासपर्यंत सर्वांच्या प्रदर्शनार्थ मांडून ठेविले होते. ते फार सुंदर होते असे ह्मणतात. राणीसाहेब मेण्यांत बसून आल्या, त्या वेळी त्यांच्याबरोबर साहा परिचारिका पायी चालत होत्या. मेण्यावर लाल रंगाच्या मखमलीची भरजरी बुटेदार चादर पसरलेली होती. ती फार मूल्यवान् असून तिच्यासभोंवतीं मोत्यांचे गोंडे लोंबत होते. राणीसाहेबांच्या दासी व इतर स्त्रिया ह्यांनी अतिशय उंची वस्त्रे व बहुमूल्य अलंकार परिधान केल्यामुळे त्यांच्याकडे पाहून दृष्टि दिपून जात असे.

No comments:
Post a Comment