विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 13 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 66


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 66
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------11
। दुसरे दिवशी सकाळीं, महाराज जनकोजीराव शिंदे लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांस भेटण्याकरितां गेले होते. त्यांचा लवाजमा व थाट अगदी अपूर्व होता. ते स्वतः एका शृंगारलेल्या हत्तीवर बसले होते. हत्तीच्या अंगावर भरजरीची झूल व गळ्यामध्ये सुवर्णाच्या माळा आणि गंडस्थळावर निरनिराळे अलंकार घातले होते. त्यामुळे तो प्रचंड प्राणी फार सुशोभित दिसत असून, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्याकरितांच जणू मंद गतीने चालत आहे, असे वाटत होते. महाराणी९.५ बायजाबाईसाहेब ह्यांचे बंधु हिंदुराव घाटगे व जावई आपासाहेब पाटणकर आणि दरबारचे इतर प्रमुख मानकरी व सरदार लोक महाराजांबरोबर मोठ्या थाटाने गजारूढ होऊन गेले होते. त्यांच्या वैभवाने शृंगाराभिरुचि दिपून जाऊन, ती बिचारी तेथून लोपली होती कीं काय, असे वाटत असे. महाराजांची व नामदारसाहेबांची मुलाखत होऊन कांहीं वेळ एकांत भेट झाली. हिंदुराव व आपासाहेब ह्यांचे व महाराजांचे अंतःकरणांतून रहस्य नसल्यामुळे, त्यांना नामदार साहेबांनी महाराजांस खाजगी भेट दिल्याचे पाहून फार आश्चर्य वाटले. त्यांचा व महाराजांचा एकांत तीन तासपर्यंत चालला होता. तो पाहून, महाराजांना कांहीं लहर येऊन त्यांनीं गव्हरनर जनरलसाहेबांस, आपणांस गादीवर बसविल्यावांचून सोडीतं नाहीं, ह्मणून हट्ट धरून अडवून ठेविलें आहे की काय, अशी शंका घेण्यास कारण झाले. तसा कांहीं प्रकार झाला असता, तर महाराजांस तेव्हांच निरोप मिळून रणकंदनाचाच प्रसंग ठेपल्यावांचून राहाता ना. महाराणींचे सैन्य तयार होतेच व आमचेही सैन्य तयार होतेच. त्या उभयतांपैकीं। कोणाची तरी महाराजांच्या लोकांशी चकमक उडाली असती. परंतु जनकोजीराव ह्यांस, महाराणीच्या सैन्याची व आपली लढाई झाली, व तींत आपण कैद झालो, तर आपणांस गव्हरनर जनरलसाहेबांकडून कांहीं मदत होणार नाही, असे कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी अतिप्रसंग न करितां, तीन तासपर्यंत गव्हरनर जनरलसाहेबांजवळआपणांस । राज्याधिकार मिळावा ह्मणून एकसारखी कर्मकथा चालविली होती. असो. ही भेट संपल्यानंतर दुपारीं लेडी उइल्यम ह्या आमच्या लष्करातील सर्व आंग्ल स्त्रिया बरोबर घेऊन महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस भेट देण्याकरितां गेल्या. त्यांचा महाराणीसाहेबांच्या वतीने चिमणाबाईने उत्तम प्रकारे आदरसत्कार केला. चिमणाबाईचे आदरकौशल्य आणि रीतभात६ पाहून आंग्ल स्त्रियांनी तिच्या रूपाप्रमाणे ह्याही सद्गुणांची फार तारीफ केली. चिमणाबाईने आपल्या मातुश्रींच्या वतीने, मोठ्या प्रौढपणाने आणि चित्ताकर्षक रीतीने, सर्वांचा आदरसत्कार व मानपान यथायोग्य केला. ह्या प्रसंगी बायजाबाईसाहेबांनीं लेडी उइल्यम व आंग्ल स्त्रिया ह्यांना पुष्कळ मूल्यवान् वस्तू नजर केल्या. त्या सर्वांची माहिती चिमणाबाईने आंग्ल स्त्रियांस विनम्र व गोड वाणीने सादर केली. त्यामुळे त्या स्त्रिया अत्यंत प्रसन्न झाल्या, हे सांगावयास नकोच

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...