विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 16 December 2019

महाराणी येसुबाई यांचे पुत्र "छत्रपती शाहु महाराज" ( पहिले )

ऐन उमेदिची म्हणजे 1690 ते 1707 अशी 17 वर्ष मुघलांच्या कैदेत घालवणारा राजा कसा असेल , सतत धर्मातरांचे संकट , धमकी , मानसिक अत्याचार , असे खुप त्रास मानसिक भिती घेऊन शत्रुच्या छावणीत लहाणाचा मोठा झालेला वडीलांची क्रुर हत्या करणार्या दुश्मणांच्या ताब्यात वाढलेल्या राजाकडुन कोण आणि काय अपेक्षा करावी
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढवण्याचे काम जर कोणी केल असल तर ते म्हणजे , छत्रपती संभाजी महाराज आणि
आता विषय राहतो "छत्रपती शाहु महाराज" इतके दिवस कुठ होते , महाराणी येसुबाई कोठे होत्या ??
1689 साली छत्रपती संभाजी राजे यांची क्रुर हत्या झाल्यानंतर महाराणी येसुबाई यांनी राजाराम महाराज यांचे मंचकरोहण करून स्वराज्यांचे 3 रे छत्रपती म्हणून जाहिर केले , संपुर्ण राज परिवार मुघली कैदेत सापडू नये म्हणून दबाव तंत्र वापरून छत्रपती राजाराम महाराज यांना व त्यांच्या दोन पत्नी, मातब्बर सरदार ,विश्वासु माणस सोबत देऊन पन्हाळ गड व तेथुन जिजींला जाऊन राज्यकारभार पहावा व होईल तशी आम्हाला बाहेरून मदत करावी असे सांगून रवानगी केली , व स्वतः बाल शाहुनां सोबत ठेवून रायगड लढू लागल्या . साधारण एक वर्ष रायगड लढत होता , दाणापाणी संपले बाहेर छत्रपती राजाराम महाराज जिंजींच्या वेढ्यात गुंतले होते मदत मिळण्याची सगळीच आशा संपली होती ,, शेवटी औरंगजेब पुढे काही अटी ठेवून रायगडाचे दरवाजे खुले करून बाल शाहुंना व अत्यंत विश्वासु लोक सोबत घेऊन औरगंजेबच्या छावणीत दाखल झाल्या , 1707 साली औरंगजेबच्या मृत्यु नंतर मराठ्यांच्यामधे राजसत्ते साठी भांडणे लावून मराठे संपवायचे या हेतूने औरंगजेबच्या राजपुत्राने "छत्रपती शाहुंना "17 वर्षे च्या कैदेतून , तुम्ही आमचा मांडलिंक राहताल आणि तुमची मातोश्री महाराणी येसुबाई आमच्याकडे ओलिस राहतील या अटिंवर मुक्तक्ता केली ,
अगदी जो परिणाम हवा होता तोच झाला मराठ्यांच्या गादिचा खरा वारस कोण यावरून संभ्रम झाला यातुनच शाहु महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात लढाई झाली यात छत्रपती शाहुंनी निर्णायक विजय मिळवत छत्रपती च्या घराण्याचे 5 वे छत्रपती म्हणून माँ साहेब जिजाऊ जयंती दिवशी अजिंक्यतारा किल्लेवर राज्यभिषेक सोहळा झाला . यावेळी छत्रपती शाहुनी स्वतः महाराणी ताराबाई यांना कोल्हापुर ची गादि म्हणजेच राज्य निर्माण करुन देऊन त्याची राजधानी पन्हाळा गडावर स्थापन केली .
1707 साला पासुन मराठ्यांची चौफेर घोडदौड चालु झाली . छत्रपती शाहु महाराज यांना "अजातशत्रु "
संबोधले जायचे , तसेच शिवाजी महाराज असेही दुहेरी नाव होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जर सुरवात होते तर छत्रपती शाहु महाराज हे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे , पराक्रमाचे , स्वराज्य स्वप्नाचे, युद्ध चालीरिती चे , गणिमी कावाचे , राज्यकारभाराचे , न्यायाचे , स्त्री सन्मानाचे परमोच्च बिंदु होते . छत्रपती शाहु महाराज यांच्या पदरी 800 पेक्षा जास्त सरदार होते , यात सर्वात पुढे होते ते म्हणजे सरदार मानाजी पायगुडे , सरदार खंडेराव दाभाडे व यांच्या सोबत असायचे ते म्हणजे पहिले बाजीराव पेशवे . महाराणी येसुबाई यांना दिल्लीतुन कैदेतून मुक्त करण्यासाठी शाहु महाराज सतत प्रयत्न करत होते पण दोन वेळा यात अपयश आले पण 3र्या प्रयत्नात छत्रपती शाहुंनी जी राजनिती , दबावतंत्र गणिमी कावा वापरला त्याने मुघलशाहीची पाळमुळे उखडली गेली व तिथुन पुढे दिल्लीच्या गादिवर कोणी बसायचे कोणी नाही त्याने कोणते निर्णय घ्यायचे हे सुद्धा छत्रपती शाहु महाराज हे सातारा मधे बसुन ठरवत . छत्रपती शाहु महाराज यांना संपुर्ण हिंदुस्तान मधे युद्धाला आव्हाण देईल , दगाफटका करल अशी कोणतीही ताकद , किंवा कोणतीही शाही नव्हती अगदि इंग्रज ही नव्हते , इंग्रजांच्या एका पत्रात उल्लेख आहे छत्रपती शाहुशी युद्ध करणे म्हणजे संपुर्ण हिदुस्तान शी युद्ध करणे
महाराणी येसुबाई यांचे पुत्र "छत्रपती शाहु महाराज" ( पहिले ) यांनी . छत्रपती संभाजी राजे यांना राज्यकारभार कमी पण संघर्ष आणि स्वराज्य संरक्षण जास्त कराव लागल , छत्रपती राजाराम महाराज यांची तर याहुन ही अत्यंत बिकट वाटचाल होती , 1700 साली सिंहगडावर देह ठेवल्यावर तर स्वराज्याचे काय होईल किंवा आस्तित्व राहिल की नाही याची तर संपुर्ण आशाच मावळली होती , पण या वेळी 25 वर्षे वयाच्या राजाराम महाराज यांच्या पत्नी छत्रपती ताराबाई यांनी 4 वर्षांचे शिवाजी राजे व्दीतीय यांना गादिवर बसवून सलग 7 वर्ष औरंगजेब याच्याशी अत्यंत्य कुशाग्र बुद्धीने , चातुर्याने , गणिमी काव्याने युद्ध करून औरंगजेबच्या सर्व आशा आकांक्षा स्वप्न मातीत मिळवले . एवढेच नव्हेतर औरंगजेबाच्या राज्यात घुसुन असे युद्ध केले की औरंगजेबला मिळणारी रसद , मदत तोडली आणि या महाराष्ट्राच्या मातीत मिसळुन टाकले ,
क्रमशाः
सदरील लेख " श्री अजयदादा जाधवराव " यांच्या प्रेरणेतून लिहला आहे (सरदार जाधवराव यांचे वशंज )
आम्ही छत्रपती शाहु भक्त 🚩🚩🚩
राहुल दोरगे पाटिल

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...