#मराठा
स्वराज्याच्या विस्ताराचे जनक छत्रपती शाहु महाराज यांची आज २७० वी
पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आमचे मार्गदर्शक श्री राजेनरेश जाधवराव यांच्या
वॉल वरून साभार ★
छत्रपती शाहु महाराज यांच्यावर इतिहासात लेखन तसेही फार थोडके आहे. त्यात मराठी रियासतकार हे एक. त्यानी जे लेखन केले त्यापैकी येथे इ सन १७०७-१७१९ याच कालावधीतील लेखनाबद्दल आपण माहिती पाहु. बाकी कालावधीत पुढील भागात.
१) इ सन १६८९ साली बालशाहुराजे व येसुबाईसाहेब याना मोगल कैद झाली. ही कैद पुढे १७ वर्षाची होती.या कैदेत शाहु महाराजाना असंख्य संकटाना तोंड द्यावे लागले,त्यापैकी धर्मांतराचा प्रयत्न हे एक महत्वपुर्ण संकट. या सर्व संकटातुन सहिसलामत बाहेर काढले ते मातुश्री येसुबाईसाहेब व मराठा सरदारानीच.. या १७ वर्षाच्या कैदेत शाहु महाराजानी काय केले? हा प्रश्न बर्याचजणाना भेडसावतो...परंतु जेव्हा आपण कैदेतुन सुटुन आल्यानंतरची सलग ४२ वर्षची कारकिर्द अभ्यासली तर शाहु महाराजानी कैदेत काय केले? यावर चांगलाच प्रकाश पडतो, कैदेत शाहु महाराजानी छत्रपती शिवराय महाराज,संभाजी महाराज यानी मराठा स्वराज्यात राबवलेली बाब अभ्यासलेली दिसुन येते,तसेच त्यासोबतच त्यानी औरंगजेबाची प्रशासनव्यवस्था देखिल अभ्यासलेली दिसुन येते. हे शाहु महाराज सुटुन आल्यानंतर लगेच जो अमंल बसवला व ज्या पद्धतीने अमंल बसवला यावरुनच सिद्ध होते. परंतु रियासतकारानी ही बाब मांडलेली दिसत नाही. कारण शाहु महाराज यानी सुटुन आल्यानंतर लगेच छत्रपती शिवराय महाराज यानी चालु केलेली व जबरदस्तीने शत्रुशाहीकडुन वसुल केलेली चौथ व सरदेशमुखी कर शाहु महाराजानी कुलबाबे (हा वंशपरंपरागत अधिकार) या नावाखाली चालु केलेला दिसुन येतो.तो माझाच अधिकार या आवेशात चालवला असेच दिसुन येते. म्हणजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव येथे दिसुन येतो. शाहु महाराज येथेच न थांबता चौथ व सरदेशमुखी वसुलीसोबतच त्या बदल्यात त्या प्रांताची संरक्षणाची जबाबदारी देखिल उचलली ती देखिल रितसर व प्रत्यक्षात आपले सरदार त्या प्रदेशात पेरुनच.....यासंबंधी खाफीखान म्हणतो,"शाहुने मोघलप्रांतात प्रत्येक १०० मैलावर चौथ,सरदेशमुखी व संरक्षणाच्या नावाखाली एक गढी बांधुन त्यावर एक चौथ वसुली करणारा,एक सरदेशमुखी वसुली करणारा व एक रहदारी कर वसुल करणारा अधिकारी ससैन्य ठेऊन आम्ही या प्रांताचे सरक्षण करतोत,अशी पद्धत अवलंबीलेली दिसुन येते. हे काम शाहु महाराजानी इ सन १७११ लाच केलेले दिसुन येते. म्हणजे संरक्षणच्या नावाखाली मोगल प्रांतात प्रत्यक्ष मराठा स्वराज्याचा विस्तारच !!!! विशेष याच काळात शाहु महाराजांचे करवीर गादीशी देखिल वाद चालु होते.
रियासतकारानी याबाबतीत शाहु महाराज याना मोगलाचे मांडलिक राजा असे नामाभिधान दिले. मान्य आहे छत्रपती शाहु महाराज यानी मोगलांशी चौथ,सरदेशमुखी व संरक्षणाचा करार केला, परंतु तो करार शाहु महाराजानी कशा पद्धतीने राबवला याचा अभ्यास केलेला दिसुन येत नाही.बहुतेक साधनांचा अभाव हे एक कारण यात असु शकते !!! ही त्रुटी मराठी रियासत मध्ये दिसुन येते. बरे असो.
आणखी एक महत्वाचा संदर्भ शाहु महाराजांच्या बाबतीत सापडतो,तो म्हणजे इ सन १७०८ मध्येच शाहु महाराजानी दक्षिणेतील छत्रपती शिवराय महाराजानी जे स्वराज्य विस्तारले होते तेथे अमंल बसवण्यासाठी शंकराजी महाडीक याना नेमुन रुजु होण्यास आदेश दिला व कर्नाटकातील तमाम पाळेगाराना आज्ञापत्र पाठवली. म्हणजे शाहु महाराजानी हे आदेश इ सन १७०८ मध्येच दिलेले आहेत...यावरुनच मराठा स्वराज्याच्या विस्ताराची सुरुवातच शाहु महाराजानी आल्यापासुनच आरंभलेली दिसुन येते. यात आणखी एक महत्वपुर्ण पुरावा मिळतो तो म्हणजे,संताजीराव जाधवराव हे सरसेनापती असतानाचे मोडी कागदपत्र अनुवादीत केलेले आहेत आणी त्यात शाहु महाराजानी आपल्या सरदाराना संपुर्ण महाराष्ट्रात इनाम,मोकासे व सरंजाम दिल्यासंबंधीच्या स्पष्ट नोंदीच सापडतात.......संताजीराव जाधवराव(धनाजीराव पुत्र) यांचा सेनापती पदाचा कार्यकाळ हा इ सन १७११ सालचा आहे. म्हणजे यावरुन हेच सिद्ध होते की ,छत्रपती शाहु महाराज यानी मराठा स्वराज्याचा विस्ताराचा परिपाट इ सन १७०८ पासुनच चालु केलेला आहे.....म्हणजे रियासतकारानी हा विस्तार प्रारंभ इ सन १७१९ पासुन सुरु झाला यास छेद बसतो.
२) रियासतकारानी आणखी एक बाब रियासतीत मांडलेली आहे ती म्हणजे,धनाजीराव जाधवराव यांची निष्ठा डळमळीत होती व ते फक्त वतनासाठी शाहु महाराजाना तगादा लावत असत.
हे प्रकरण आपण अभ्यासले असता,असे लक्षात येईल की,सरसेनापती धनाजी राव जाधवराव यांच्याच महत्वपुर्ण निर्णयामुळे खेड युद्धात इ सन १७०८ लाच शाहु महाराजाना स्थैर्य प्राप्त झाले होते.तेथुन ते सैन्य घेऊन सातारा काबीज करुन १२ जानेवारी १७०८ रोजी लगेच राज्याभिषेक करवुन घेतला....म्हणजे धनाजीरावांच्या एका निर्णयामुळे शाहु महाराजांचे पारडे जड झाले आणी स्थिरता देखिल मिळाली...ही इतिहासातील कलाटणी देणारी घटना असुन याचे श्रेय रियासतकारानी धनाजीरावाना दिलेले दिसत नाही. तसेच ते फक्त वतनाच्या मागे होते, असे रियासतकार म्हणतात,ज्या धनाजीरावांच्या हातात एकेकाळी मुलकी,सनदी व लष्करी सेवा असताना देखिल स्वतःसाठी फक्त पाच गावे मागवुन घेतले व बाकी वतन चक्क विकत घेतले....असा व्यक्ती या वतनास तगादा लावुन शाहु महाराजांना वीट आणला असे रियासतकारानी जे वक्तव्य केले ते धनाजीराव यांची जी पाच छत्रपतींच्या अधिकाराखाली या मातीस योगदान दिले ते पाहुन साफ चुकिचेच आहे. रियासतकारानी हे वक्तव्य कोणत्या भावनेतुन व का केले ? हे वाचकच ठरवतील.
3) रियासतकारानी आणखी बाब रियासतीत नमुद केलेली आढळते,छत्रपती शाहु महाराज यांची सलग ४२ वर्षाची दैदिप्यमान कारकिर्द तीन पेशव्यात विभागुन सांगितली आणी त्यास जे कारण सांगितले ते म्हणजे,शाहु महाराजांची कारकिर्द खुपच प्रदिर्घ आहे म्हणुन विभागुन मांडत आहे........मांडा विभागुन परंतु छत्रपती शाहु महाराजांचे महत्वपुर्ण कार्यास डावलुन मांडले,हे साफ चुकिचे व छत्रपतींच्या कार्यास दगा देणे म्हणता येईल.बरे असो. या कारकिर्दीत समस्त आदेश,नियोजन,मोहिमांचे नियोजन,सरंजाम,इनाम
,मोकासे,सरदाराना रणनिती आखुन देणे, सरदाराना व प्रधानास देखिल मोहिमेवरील सर्व अपडेट दररोज मागवुन घेऊन त्याना त्यानुसार सुचना देणारे छत्रपती शाहु महाराज हेच खरे मराठा स्वराज्याच्या विस्ताराचे जनक व यानीच विस्ताराचे दारे मराठा सरदाराना इ सन १७०८ पासुन उघडुन दिले आसताना त्यांचे श्रेय नाकारणे रियासतकाराना शोभले नाही.....याचे कारण त्यांच्यावेळी अपुर्ण साहित्य असे म्हणु शकतो ? ते वाचकच ठरवतील.
निर्विवाद पेशव्यांचे कार्य शाहु महाराजांच्या कार्यकाळात इतर शिंदे,होळकर,नागपुरकर भोसले, दाभाडे,गायकवाड,कदमबांडे,घो रपडे,महाडीक,शिर्के
आदी सरदारांच्या बरोबरीने किंबहुना उत्तरेत थोडे सरस असु शकते....परंतु
शाहु महाराजानी उत्तरेत बाजीरावांसोबतच शिंदे, होळकर,पवार आदी
सरादार,दक्षिणेस महाडीक,घोरपडे,फत्तेस़िह भोसले आदी सरदार,पुर्वेस नागपुरकर
राजेभोसले आणी पश्चिमेस दाभाडे,कदमब़ाडे,व गायकवाड या सरदाराना नेमणुका
देऊन मराठा स्वराज्याचा विस्तार खुद्द करवुन घेतलेला दिसुन येतो......तो
रियासतकारानी मान्य न करता शाहु महाराजाना यातुन डावललेले दिसुन येते.
५) रियासतकारानी पुणे व गुजराथेतील जो मोगलांचा अमंल सेनापती खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबाळकर,पिलाजीराव जाधवराव यानी दुर केला तो डावलुन बाळाजींच्या नावे करवुन दिलेला दिसुन येतो..... परंतु पुण्यातुन मोगल सरदार रंभाजी निंबाळकर यास हाकलुन देण्याचे महत्वपुर्ण कार्यच खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबळाकर व पिलाजीराव जाधवराव यानी केलेले आहे,तसेच गुजराथ मध्ये तर याच खंडेराव व सुलतानजी यानी हुसैन बंधुंची पाचावर धारण करुन शरण आणले आणी गुजराथ कायमचा मराठा स्वराज्यास इ सन १७१५ लाच जोडलेला आहे.आणी याच मोहिमेमुळे सय्यद बंधुना शाहु महाराजांशी करार करण्यास भाग पाडले.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे इ सन १७१८चा करार हा शाहु महाराज व सय्यदबंधु यांच्यात झालेला आसताना तो बाळाजी विश्वनाथ यानी सरसेनापती खंडेराव यांच्या नेत्रुत्वाखाली दिल्लीत जाऊन सही करुन आणला म्हणुन रियासतकारानी शाहु महाराजांचे श्रेय नाकारुन ते बाळाजीस देतात.....हे साफ चुकिचे आहे...करार केला खुद्द छत्रपती शाहु महाराजांनी ,सर्व तजवीज लावली शाहु महाराजांनी,कलमे ठरवली शाहु महाराजांनी,सरसेनापती प्रधान व मराठा सरदार सय्यद सोबत दिले शाहु महाराजांनी आणी मग तेथुन सातारा येथे कागद आणण्याचे काम करणार्या बाळाजीना श्रेय कसे काय दिले? विशेष सदरील मोहिम सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या अधिकाराखाली आसताना तिचे श्रेय मग दुसर्याना का दिले गेले?
७) रियासतकारानी आणखी एक महत्वाची चुक केलेली दिसुन येते. इ सन १७११ अगोदर बाळाजी विश्वनाथ बद्दल ठोस अशी संदर्भ नसताना त्याना प्रत्येक श्रेय देण्याचा प्रयत्न दिसुन येतो......ठोस पुरावे ज्याचे आहेत ते मान्यच आहे....परंतु ज्याचे ठोस पुरावे नाहीत ते मान्य कसे होईल ? परंतु रियासतकारानी हे कशाच्या आधारावर मांडले हे त्यानाच माहिती !!!!
अशा हजारो नोंदी रियासतीत रियासतकारानी चुकिच्या मांडल्या आहेत.....परंतु सदरील पोस्टमध्ये इ सन १७०७-१७१९ मधील मोजकेच मुददे चर्चेला घेतले आहेत.यावरुन हेच सिद्ध होते की मराठी रियासत यात बर्याच त्रुटी आहेत.याचे कारण रियासतकाराना तत्काळातील अपुरे संदर्भ असु शकतील किंवा छत्रपतींचा आकस असु शकतो ......असेच वाटते !!! परंतु या कालखंडावर म्हणजे छत्रपती शाहु महाराज यांच्या सलग ४२ वर्षाच्या कारकिर्दीवर पुनर्लेखन निष्पक्षपणे झाले पाहिजे आसेच प्रामाणीक मत !!!!!!
८) रियासतकारानी आणखी एक बाब चुकिची मांडली आहे,शाहु महाराज सुटुन आलेले आसताना सुलतानपुर परगण्यात तापी नदिच्या किनारी कोकरमंडा येथे अंबुजी कदमबांडे हे मराठा सरदार सामील झाले हे सत्य आहे........परंतु रियासतकारानी तेथे अंबु पांडे असे नाव लिहिले आहे जे साफ चुकिचे आहे.विशेष त्यांच्याच मराठा सरदारांच्या वंशावळी या पुस्तकात रियसतकारानीच कदमबांडे यांचा संदर्भ दिलेला असताना येथे चुकिचा उल्लेख केलेला आढळतो.
९) तसेच छत्रपती शाहु महाराजाना सुरुवातीच्या काळात स्थिरता मिळवुन देण्यात रायभानजीराजे भोसले,रुस्तुमराव जाधवराव,ज्योत्याजी केसरकर,परसोजी भोसले,पिलाजीराव जाधवराव,धनाजीराव जाधवराव साबाजी भोसले,खंडो बल्लाळ,अंबोजी कदमबांडे,सुजानसिंह रावळ,शेख मिरा,सवाई जयसिंह,हैबतराव निंबाळकर,सुलतानजी निंबाळकर,खंडेराव दाभाडे,बाळाजी विश्वनाथ,नेमाजी शिंदे, आदी मराठा सरदारांचा समावेश आसताना रियासतकार मात्र थोडक्याच सरदारांचा उल्लेख करताना दिसत आहेत जे साफ चुकिचे आहे.
मराठा स्वराज्याच्या विस्ताराचे जनक छत्रपती शाहु महाराज याना मानाचा मुजरा !!!
(सदरील पोस्ट अभ्यासात्मक द्रुष्टीने घ्यावी ,जातीवाचक किंवा धर्मवाचक दृष्टीने घेऊ नये ही नम्र विनंती )
#मराठा_स्वराज्याचे_विस्तार ाचे_जनक_छत्रपती_शाहु_महारा ज#
#शाहु_पर्व#
#Rajenaresh_Jadhavrao
छत्रपती शाहु महाराज यांच्यावर इतिहासात लेखन तसेही फार थोडके आहे. त्यात मराठी रियासतकार हे एक. त्यानी जे लेखन केले त्यापैकी येथे इ सन १७०७-१७१९ याच कालावधीतील लेखनाबद्दल आपण माहिती पाहु. बाकी कालावधीत पुढील भागात.
१) इ सन १६८९ साली बालशाहुराजे व येसुबाईसाहेब याना मोगल कैद झाली. ही कैद पुढे १७ वर्षाची होती.या कैदेत शाहु महाराजाना असंख्य संकटाना तोंड द्यावे लागले,त्यापैकी धर्मांतराचा प्रयत्न हे एक महत्वपुर्ण संकट. या सर्व संकटातुन सहिसलामत बाहेर काढले ते मातुश्री येसुबाईसाहेब व मराठा सरदारानीच.. या १७ वर्षाच्या कैदेत शाहु महाराजानी काय केले? हा प्रश्न बर्याचजणाना भेडसावतो...परंतु जेव्हा आपण कैदेतुन सुटुन आल्यानंतरची सलग ४२ वर्षची कारकिर्द अभ्यासली तर शाहु महाराजानी कैदेत काय केले? यावर चांगलाच प्रकाश पडतो, कैदेत शाहु महाराजानी छत्रपती शिवराय महाराज,संभाजी महाराज यानी मराठा स्वराज्यात राबवलेली बाब अभ्यासलेली दिसुन येते,तसेच त्यासोबतच त्यानी औरंगजेबाची प्रशासनव्यवस्था देखिल अभ्यासलेली दिसुन येते. हे शाहु महाराज सुटुन आल्यानंतर लगेच जो अमंल बसवला व ज्या पद्धतीने अमंल बसवला यावरुनच सिद्ध होते. परंतु रियासतकारानी ही बाब मांडलेली दिसत नाही. कारण शाहु महाराज यानी सुटुन आल्यानंतर लगेच छत्रपती शिवराय महाराज यानी चालु केलेली व जबरदस्तीने शत्रुशाहीकडुन वसुल केलेली चौथ व सरदेशमुखी कर शाहु महाराजानी कुलबाबे (हा वंशपरंपरागत अधिकार) या नावाखाली चालु केलेला दिसुन येतो.तो माझाच अधिकार या आवेशात चालवला असेच दिसुन येते. म्हणजे छत्रपती शिवराय महाराज यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव येथे दिसुन येतो. शाहु महाराज येथेच न थांबता चौथ व सरदेशमुखी वसुलीसोबतच त्या बदल्यात त्या प्रांताची संरक्षणाची जबाबदारी देखिल उचलली ती देखिल रितसर व प्रत्यक्षात आपले सरदार त्या प्रदेशात पेरुनच.....यासंबंधी खाफीखान म्हणतो,"शाहुने मोघलप्रांतात प्रत्येक १०० मैलावर चौथ,सरदेशमुखी व संरक्षणाच्या नावाखाली एक गढी बांधुन त्यावर एक चौथ वसुली करणारा,एक सरदेशमुखी वसुली करणारा व एक रहदारी कर वसुल करणारा अधिकारी ससैन्य ठेऊन आम्ही या प्रांताचे सरक्षण करतोत,अशी पद्धत अवलंबीलेली दिसुन येते. हे काम शाहु महाराजानी इ सन १७११ लाच केलेले दिसुन येते. म्हणजे संरक्षणच्या नावाखाली मोगल प्रांतात प्रत्यक्ष मराठा स्वराज्याचा विस्तारच !!!! विशेष याच काळात शाहु महाराजांचे करवीर गादीशी देखिल वाद चालु होते.
रियासतकारानी याबाबतीत शाहु महाराज याना मोगलाचे मांडलिक राजा असे नामाभिधान दिले. मान्य आहे छत्रपती शाहु महाराज यानी मोगलांशी चौथ,सरदेशमुखी व संरक्षणाचा करार केला, परंतु तो करार शाहु महाराजानी कशा पद्धतीने राबवला याचा अभ्यास केलेला दिसुन येत नाही.बहुतेक साधनांचा अभाव हे एक कारण यात असु शकते !!! ही त्रुटी मराठी रियासत मध्ये दिसुन येते. बरे असो.
आणखी एक महत्वाचा संदर्भ शाहु महाराजांच्या बाबतीत सापडतो,तो म्हणजे इ सन १७०८ मध्येच शाहु महाराजानी दक्षिणेतील छत्रपती शिवराय महाराजानी जे स्वराज्य विस्तारले होते तेथे अमंल बसवण्यासाठी शंकराजी महाडीक याना नेमुन रुजु होण्यास आदेश दिला व कर्नाटकातील तमाम पाळेगाराना आज्ञापत्र पाठवली. म्हणजे शाहु महाराजानी हे आदेश इ सन १७०८ मध्येच दिलेले आहेत...यावरुनच मराठा स्वराज्याच्या विस्ताराची सुरुवातच शाहु महाराजानी आल्यापासुनच आरंभलेली दिसुन येते. यात आणखी एक महत्वपुर्ण पुरावा मिळतो तो म्हणजे,संताजीराव जाधवराव हे सरसेनापती असतानाचे मोडी कागदपत्र अनुवादीत केलेले आहेत आणी त्यात शाहु महाराजानी आपल्या सरदाराना संपुर्ण महाराष्ट्रात इनाम,मोकासे व सरंजाम दिल्यासंबंधीच्या स्पष्ट नोंदीच सापडतात.......संताजीराव जाधवराव(धनाजीराव पुत्र) यांचा सेनापती पदाचा कार्यकाळ हा इ सन १७११ सालचा आहे. म्हणजे यावरुन हेच सिद्ध होते की ,छत्रपती शाहु महाराज यानी मराठा स्वराज्याचा विस्ताराचा परिपाट इ सन १७०८ पासुनच चालु केलेला आहे.....म्हणजे रियासतकारानी हा विस्तार प्रारंभ इ सन १७१९ पासुन सुरु झाला यास छेद बसतो.
२) रियासतकारानी आणखी एक बाब रियासतीत मांडलेली आहे ती म्हणजे,धनाजीराव जाधवराव यांची निष्ठा डळमळीत होती व ते फक्त वतनासाठी शाहु महाराजाना तगादा लावत असत.
हे प्रकरण आपण अभ्यासले असता,असे लक्षात येईल की,सरसेनापती धनाजी राव जाधवराव यांच्याच महत्वपुर्ण निर्णयामुळे खेड युद्धात इ सन १७०८ लाच शाहु महाराजाना स्थैर्य प्राप्त झाले होते.तेथुन ते सैन्य घेऊन सातारा काबीज करुन १२ जानेवारी १७०८ रोजी लगेच राज्याभिषेक करवुन घेतला....म्हणजे धनाजीरावांच्या एका निर्णयामुळे शाहु महाराजांचे पारडे जड झाले आणी स्थिरता देखिल मिळाली...ही इतिहासातील कलाटणी देणारी घटना असुन याचे श्रेय रियासतकारानी धनाजीरावाना दिलेले दिसत नाही. तसेच ते फक्त वतनाच्या मागे होते, असे रियासतकार म्हणतात,ज्या धनाजीरावांच्या हातात एकेकाळी मुलकी,सनदी व लष्करी सेवा असताना देखिल स्वतःसाठी फक्त पाच गावे मागवुन घेतले व बाकी वतन चक्क विकत घेतले....असा व्यक्ती या वतनास तगादा लावुन शाहु महाराजांना वीट आणला असे रियासतकारानी जे वक्तव्य केले ते धनाजीराव यांची जी पाच छत्रपतींच्या अधिकाराखाली या मातीस योगदान दिले ते पाहुन साफ चुकिचेच आहे. रियासतकारानी हे वक्तव्य कोणत्या भावनेतुन व का केले ? हे वाचकच ठरवतील.
3) रियासतकारानी आणखी बाब रियासतीत नमुद केलेली आढळते,छत्रपती शाहु महाराज यांची सलग ४२ वर्षाची दैदिप्यमान कारकिर्द तीन पेशव्यात विभागुन सांगितली आणी त्यास जे कारण सांगितले ते म्हणजे,शाहु महाराजांची कारकिर्द खुपच प्रदिर्घ आहे म्हणुन विभागुन मांडत आहे........मांडा विभागुन परंतु छत्रपती शाहु महाराजांचे महत्वपुर्ण कार्यास डावलुन मांडले,हे साफ चुकिचे व छत्रपतींच्या कार्यास दगा देणे म्हणता येईल.बरे असो. या कारकिर्दीत समस्त आदेश,नियोजन,मोहिमांचे नियोजन,सरंजाम,इनाम
,मोकासे,सरदाराना रणनिती आखुन देणे, सरदाराना व प्रधानास देखिल मोहिमेवरील सर्व अपडेट दररोज मागवुन घेऊन त्याना त्यानुसार सुचना देणारे छत्रपती शाहु महाराज हेच खरे मराठा स्वराज्याच्या विस्ताराचे जनक व यानीच विस्ताराचे दारे मराठा सरदाराना इ सन १७०८ पासुन उघडुन दिले आसताना त्यांचे श्रेय नाकारणे रियासतकाराना शोभले नाही.....याचे कारण त्यांच्यावेळी अपुर्ण साहित्य असे म्हणु शकतो ? ते वाचकच ठरवतील.
निर्विवाद पेशव्यांचे कार्य शाहु महाराजांच्या कार्यकाळात इतर शिंदे,होळकर,नागपुरकर भोसले, दाभाडे,गायकवाड,कदमबांडे,घो
५) रियासतकारानी पुणे व गुजराथेतील जो मोगलांचा अमंल सेनापती खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबाळकर,पिलाजीराव जाधवराव यानी दुर केला तो डावलुन बाळाजींच्या नावे करवुन दिलेला दिसुन येतो..... परंतु पुण्यातुन मोगल सरदार रंभाजी निंबाळकर यास हाकलुन देण्याचे महत्वपुर्ण कार्यच खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबळाकर व पिलाजीराव जाधवराव यानी केलेले आहे,तसेच गुजराथ मध्ये तर याच खंडेराव व सुलतानजी यानी हुसैन बंधुंची पाचावर धारण करुन शरण आणले आणी गुजराथ कायमचा मराठा स्वराज्यास इ सन १७१५ लाच जोडलेला आहे.आणी याच मोहिमेमुळे सय्यद बंधुना शाहु महाराजांशी करार करण्यास भाग पाडले.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे इ सन १७१८चा करार हा शाहु महाराज व सय्यदबंधु यांच्यात झालेला आसताना तो बाळाजी विश्वनाथ यानी सरसेनापती खंडेराव यांच्या नेत्रुत्वाखाली दिल्लीत जाऊन सही करुन आणला म्हणुन रियासतकारानी शाहु महाराजांचे श्रेय नाकारुन ते बाळाजीस देतात.....हे साफ चुकिचे आहे...करार केला खुद्द छत्रपती शाहु महाराजांनी ,सर्व तजवीज लावली शाहु महाराजांनी,कलमे ठरवली शाहु महाराजांनी,सरसेनापती प्रधान व मराठा सरदार सय्यद सोबत दिले शाहु महाराजांनी आणी मग तेथुन सातारा येथे कागद आणण्याचे काम करणार्या बाळाजीना श्रेय कसे काय दिले? विशेष सदरील मोहिम सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या अधिकाराखाली आसताना तिचे श्रेय मग दुसर्याना का दिले गेले?
७) रियासतकारानी आणखी एक महत्वाची चुक केलेली दिसुन येते. इ सन १७११ अगोदर बाळाजी विश्वनाथ बद्दल ठोस अशी संदर्भ नसताना त्याना प्रत्येक श्रेय देण्याचा प्रयत्न दिसुन येतो......ठोस पुरावे ज्याचे आहेत ते मान्यच आहे....परंतु ज्याचे ठोस पुरावे नाहीत ते मान्य कसे होईल ? परंतु रियासतकारानी हे कशाच्या आधारावर मांडले हे त्यानाच माहिती !!!!
अशा हजारो नोंदी रियासतीत रियासतकारानी चुकिच्या मांडल्या आहेत.....परंतु सदरील पोस्टमध्ये इ सन १७०७-१७१९ मधील मोजकेच मुददे चर्चेला घेतले आहेत.यावरुन हेच सिद्ध होते की मराठी रियासत यात बर्याच त्रुटी आहेत.याचे कारण रियासतकाराना तत्काळातील अपुरे संदर्भ असु शकतील किंवा छत्रपतींचा आकस असु शकतो ......असेच वाटते !!! परंतु या कालखंडावर म्हणजे छत्रपती शाहु महाराज यांच्या सलग ४२ वर्षाच्या कारकिर्दीवर पुनर्लेखन निष्पक्षपणे झाले पाहिजे आसेच प्रामाणीक मत !!!!!!
८) रियासतकारानी आणखी एक बाब चुकिची मांडली आहे,शाहु महाराज सुटुन आलेले आसताना सुलतानपुर परगण्यात तापी नदिच्या किनारी कोकरमंडा येथे अंबुजी कदमबांडे हे मराठा सरदार सामील झाले हे सत्य आहे........परंतु रियासतकारानी तेथे अंबु पांडे असे नाव लिहिले आहे जे साफ चुकिचे आहे.विशेष त्यांच्याच मराठा सरदारांच्या वंशावळी या पुस्तकात रियसतकारानीच कदमबांडे यांचा संदर्भ दिलेला असताना येथे चुकिचा उल्लेख केलेला आढळतो.
९) तसेच छत्रपती शाहु महाराजाना सुरुवातीच्या काळात स्थिरता मिळवुन देण्यात रायभानजीराजे भोसले,रुस्तुमराव जाधवराव,ज्योत्याजी केसरकर,परसोजी भोसले,पिलाजीराव जाधवराव,धनाजीराव जाधवराव साबाजी भोसले,खंडो बल्लाळ,अंबोजी कदमबांडे,सुजानसिंह रावळ,शेख मिरा,सवाई जयसिंह,हैबतराव निंबाळकर,सुलतानजी निंबाळकर,खंडेराव दाभाडे,बाळाजी विश्वनाथ,नेमाजी शिंदे, आदी मराठा सरदारांचा समावेश आसताना रियासतकार मात्र थोडक्याच सरदारांचा उल्लेख करताना दिसत आहेत जे साफ चुकिचे आहे.
मराठा स्वराज्याच्या विस्ताराचे जनक छत्रपती शाहु महाराज याना मानाचा मुजरा !!!
(सदरील पोस्ट अभ्यासात्मक द्रुष्टीने घ्यावी ,जातीवाचक किंवा धर्मवाचक दृष्टीने घेऊ नये ही नम्र विनंती )
#मराठा_स्वराज्याचे_विस्तार
#शाहु_पर्व#
#Rajenaresh_Jadhavrao
No comments:
Post a Comment