Karvir Riyasat
#श्रीमंत_छत्रपती_राजाराम_महाराज_
ग्वाल्हेर नरेश जिवाजीराव शिंदे यांनी आपले दिवंगत पिताश्री माधवराव शिंदे यांचे स्मारक उभारले होते. या स्मारकाचे अनावरण ''छत्रपति हुजूर सरकारांचेच शुभहस्ते व्हावे,'' अशी शिंदे महाराजांची अतीव इच्छा होती. ग्वाल्हेरकर शिंदेंनी आपली इच्छा रीतसर श्रीमन्महाराज राजाराम छत्रपतिंकडे प्रकट केली व छत्रपतिंनी हि इच्छा पूर्ण करावी अशी विनंती केली. आपले आबासाहेब छत्रपति शाहू महाराज व माधवराव शिंदे यांची घनिष्ट मैत्री होती, हे ध्यानी घेऊन राजाराम महाराजांनी या समारंभासाठी शिंद्यांना आपला होकार कळविला.
१४ नोव्हेंबर १९४० रोजी ग्वाल्हेरास प्रस्थान करण्याचे निश्चित झाले, मात्र याकाळात महाराजांना शारीरिक अस्वास्थ्य जाणवू लागले. वडीलधाऱ्या मंडळींनी ग्वाल्हेरचा दौरा पुढे ढकलण्याचा महाराजांना सल्ला दिला. मात्र ग्वाल्हेरात संपूर्ण तयारी झाली होती, शिवाय छत्रपतिंनी शिंद्यांना शब्द दिला होता. हा शब्द पाळण्यासाठी महाराजांनी नियोजनात कोणताही बदल केला नाही. तब्येतीकडे कानाडोळा करुन ठरल्यानुसार १४ तारखेस महाराजांनी ग्वाल्हेरास प्रस्थान केले व दि. २० नोव्हेंबर रोजी महाराज ग्वाल्हेर नगरीत पोहोचले. त्याठिकाणी छत्रपतींच्या स्वागतासाठी अनेक हत्ती व शाही लवाजमा तयार होता. स्वतः ग्वाल्हेर नरेश महाराजांस सामोरे गेले. अठरा अश्व जुंपलेल्या चांदीच्या शाही बग्गीतून छत्रपतिंचे ग्वाल्हेरच्या राजवाड्यात आगमन झाले. अनेक ठिकाणी उत्तरभारतीय जनतेने महाराजांचा सत्कार केला. श्रीमंत माधवराव शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण छत्रपति राजाराम महाराजांचे हस्ते करण्यात आले. शारीरिक अस्वास्थ्य असताना केलेला दूरवराचा प्रवास, ठिकठिकाणी सत्कार-भाषणे, हवापालट यांमुळे महाराजांची प्रकृती फारच खालावली. यामुळे तातडीने महाराज मुंबईस आले. परतीच्या अविश्रांत प्रवासामुळे महाराजांची तब्येत जास्तच खालावत होती. दि. २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत महाराजांवर छोटीसी शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र यानंतर काहीच अवधीत महाराजांच्या छातीमध्ये आकस्मिक कळ आली व यामध्येच महाराजांची प्राणज्योत मालवली....

वयाच्या ४३ व्या वर्षी आपल्या प्रजाजनांना पोरकं करुन श्रीमत् छत्रपति कैलासवासी झाले.
हि वार्ता कोल्हापूरात पोहोचताच करवीर राज्यावर दुःखाचे सावट पसरले. सर्व व्यवहार ताबडतोब बंद झाले. त्याच दिवशी रात्री दहा वाजता स्पेशल मोटारीने छत्रपतिंचे पार्थिव कोल्हापूरात आणण्यात आले व दर्शनासाठी नवीन राजवाड्यात ठेवण्यात आले. हजारो लोकांनी साश्रूनयनांनी आपल्या लाडक्या राजाचे अखेरचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता नवीन राजवाड्यावरुन दरबारी लवाजम्यासह महाराजांच्या पार्थिव देहाची मिरवणूक निघाली. छत्रपतिंचा पार्थिव देह पालखीत ठेवण्यात आला होता. छत्रपतींच्या अंत्ययात्रेच्या सुरुवातीला दरबारी लवाजमा होता. छत्रपतींच्या पार्थिवावर अखंड पुष्पवृष्टी केली जात होती. ठिकठिकाणी हार घातले जात होते. करवीरनगरी अश्रू ढाळीत आपल्या राजाला अखेरचा मुजरा करीत होती. स्त्रिया टाहो फोडून रडत होत्या. जमिनीस डोके टेकून महाराजांना अखेरचा निरोप देत होत्या. दहनभूमीवर अक्षरशः लाखोंची गर्दी जमली होती. महाराजांचे पार्थिव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आले व सकाळी ठिक अकरा वाजता चितेस अग्नी देण्यात आला. तोफांच्या व बंदुकांच्या शेकडो फैरी झाडून महाराजांना अखेरची सलामी देण्यात आली. करवीरकरांचा लाडका राजा अनंतात विलीन झाला....
३० नोव्हेंबर रोजी महाराजांच्या रक्षा व अस्थींची विसर्जनाकरीता दरबारी लवाजम्यासह सकाळी ९ वाजता मिरवणूक काढण्यात आली. अस्थी व रक्षा सोन्याच्या पेटीत ठेऊन ती पेटी भगव्या रंगाच्या भव्य रथात ठेवण्यात आली. या रथास काळ्या रंगाचे सुमारे बावीस अश्व जुंपलेले होते. मिरवणूकीबरोबर बडोद्याचे महाराज, भावनगरचे महाराज, जत, सावंतवाडी, मुधोळचे राजेसाहेब, इतर संस्थानिक, जहागिरदार पायी चालत होते. हि मिरवणूक शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळून सकाळी अकरा वाजता स्टेशनवर दाखल झाली. वाटेत हजारो प्रजाजन छत्रपतींच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी झुंबड करीत होते. स्टेशनवर अनेक मान्यवरांनी महाराजांच्या अस्थींस हार अर्पण केले. महाराजांच्या अस्थींची सुवर्णपेटी स्पेशल ट्रेनच्या सलूनमध्ये ठेवण्यात आली. ट्रेन सुटताच हजारोंच्या जमावाने हंबरडा फोडला. ते दृश्य खरोखरीच हृदयस्पर्शी होते.
वाटेत मिरज, कराड, सातारा, पुणेवगैरे ठिकाणी प्रचंड जनसमुदायाने महाराजांच्या अस्थींचे दर्शन घेतले. दि. २ डिसेंबर रोजी ट्रेन अलाहाबादला पोहोचली. अलाहाबाद स्टेशनपासून मोठी मिरवणूक काढून छत्रपतींच्या अस्थी गंगायमुनेच्या पवित्र संगमात विसर्जित करण्यात आल्या.....
Post By : Karvir Riyasat Facebook Page
#KarvirRiyasatFB
छायाचित्र : ग्वाल्हेर येथील समारंभ प्रसंगी श्री छत्रपती राजाराम महाराज व ग्वाल्हेरचे संस्थानिक जीवाजीराव शिंदे.
( राजाराम महाराजांच्या शेवटच्या छायाचित्रांपैकी अत्यंत दुर्मिळ छायाचित्र... )
श्री छत्रपती राजाराम महाराज आणि ग्वाल्हेर संस्थानिक जीवाजीराव शिंदे...!!!

No comments:
Post a Comment