विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 February 2020

छत्रपती संभाजीमहाराजांच्या सुटकेसाठी शिर्के घराण्याचा शेवटपर्यंत अलौकिक धाडसी प्रयत्न

छत्रपती संभाजीमहाराजांच्या सुटकेसाठी शिर्के घराण्याचा शेवटपर्यंत अलौकिक धाडसी प्रयत्न 

 

ऐतिहासिक शिर्के घराण्यांचा आडनाव बदलाचा वास्तव इतिहास
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
👉स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के व छत्रपती संभाजी महाराज यांच्या गोड, प्रेमळ व कणखर नात्यातील कलंकित दोषाचे निवारण झाले असून त्यासंदर्भात आणखी बरीच काही वस्तुस्थिती सह, परिस्थितिजन्य म्हणजेच प्रत्यक्षदर्शी जिवंत पुराव्यानुसार महत्वाची पूरक माहिती शेकडो वर्षापुर्वीपासून उपलब्ध असताना काही समाजकंटक लेखकांनी ध.. चा.. मा..आणि पराचा.. कावळा.. करुन आवर्जून शिर्के घराण्यांचा कर्तुत्वान वास्तव इतिहास समाजासमोर न आणता बुद्धिभ्रष्ट लेखकांनी छत्रपतींच्या जवळच्या नातेवाईकांनाच आवर्जून कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता परंतु खालील प्रत्यक्षदर्शी वास्तव माहितीमुळे संबंधितांचे  कपट- कल्पित मनसूबे पर्दाफाश झाले आहेत.
       कोकणातील संगमेश्वर येथे अचानक घनघोर युद्ध सुरु झाले  असताना त्याप्रसंगी छत्रपती संभाजीराजांसह अनेक राजेशिर्के मंडळी व सैन्यांनी तीव्र लढा दिला होता परंतु दुर्दैवाने त्यावेळी छत्रपती शंभुराजेंसह शिर्के लोकांना व विविध अड़नावांच्या लोकांना अटक झाल्यानंतर सर्वांनांच औरंगजेबाचा सरदार मुक़र्रबखान नेमके कुठे घेऊन जातो यांची खबर- बातमी म्हणजेच कानोसा मिळविण्याकामी कुलमुखत्यार महाराणी येसुबाईसाहेबांनी माहेरच्या जवळील मंडळींना म्हणजेच आपले सख्खे भाऊ गणोजीराव शिर्के इतर बंधूंसह पित्यास स्वराज्यनिष्ठावंत पिलाजीराव शिर्के यांना सांगितल्यानुसार, शंभुराजांना घेऊन गेलेल्या मार्गाचा-माग काढत जाऊन वेळप्रसंगी मोघलांच्या विरोधात तीव्र प्रतिकार करण्यास सांगितले होते अगदी त्याप्रमाणेच गणोजीराजेंसह त्यांचे इतर तिन्ही बंधु म्हणजेच पिलाजीराव यांचे शूरवीर मुले वाघोजीराव,
गणोजीराव, संभाजीराव, देवजीराजे ही चारही मुले व इतरही असंख्य राजेशिर्के मंडळी व इतर हजारो सैन्य घेऊन आपल्या जावयास/मेहुण्यास मदत करण्यास गेले असताना त्यावेळेच्या बिकट परिस्तिथिनुसार गणोजीराजे शिर्के यांनी प्राचीन गामिनी कावा वापरत मोघलांच्या छावणीत ठीक-ठिकाणी अनेकांना वेशांतर करुन तसेच थेट प्रवेश करत मोठे नियोजन केले होते परंतु त्यात विविधप्रकारे विघ्ने, अडचणी आल्या होत्या, त्यातील काही अडचणी व त्यातून काढलेले गामिनी कावा मार्ग खालील प्रमाणे सांगता येतील.
          संगमेश्वर ते पेडगाव येथील किल्ले बहादुरगड (धर्मवीरगड )
मार्गामध्ये काही राजेशिर्के मंडळी पकडली गेली असल्याने त्यांनी "गामिनी कावा" वापरत आपली आडनावे वेगळी- वेगळी सांगून आपल्या सुटका करुन घेतल्या होत्या म्हणुन त्यासर्व राजेशिर्के घराण्यांचे आजही रिकामे, पडवळ, कुंभारकर, पापळ सह अन्य विविध वेगवेगळी आडनावे पडलेली दिसत आहेत त्या मंडळीचे वंशज आजही गावो-गावी जिवंत आहेत तर काही राजेशिर्के मंडळीनी विविध जातीवर्णीय व्यावसायीकांचे वेशांतर करुन म्हणजेच कोण नाभिक बनून, कोण मंदिरात गुरव अथवा पुजारी होऊन, पालखीचे भोई बनून, काही पाणी देणारे पखाले होऊन, तर कोण कुंभाराचे साहित्य विकणारे बनून इतरही अन्य व्यावसायिकांचे वेशांतर करुन मोघलांच्या छावणीत प्रवेश केला होता. 
 तसेच फक्त कोकणातच दिसणारा शिर्के घराणा आजही कोकणातील शृंगारपूर पासून- संगमेश्वर- पेड़गावचा किल्ला बहादुरगड (धर्मवीरगड)- तुळापुर- वढु-बुद्रुक पर्यंतच्या मार्गावर तसेच किल्ले बहादुरगडाच्या तटबंधी लगत, बहादुरगड परिसरात तसेच  25-30 किलोमीटर अंतरावर म्हणजेच श्रीगोंदा तालुक्यात शिर्के घराण्यांच्या त्याकाळच्या छावण्या आढळतात, ( म्हणजे आजची शिर्के घराण्यांची संपूर्ण गावच अस्तित्वात आहेत. ) पेडगाव मध्येही बहादूरगडा नजीक आजदेखील काही स्थायिक शिर्के घराणे आढळतात आणि हे शिर्के घराणे मोगलांना न डगमागता शिर्के आडनाव कायम ठेऊन बहादुरगडावर नजर ठेऊन होते. त्याप्रसंगी काही शिर्के मंडळींना वेशांतर करुन गडामध्ये प्रवेश करत असताना अनेकांना बलिदानही द्यावे लागल होते. त्यांचे पूर्वज आजही या परिसरात प्रत्यक्ष जीवन जगताना दिसत आहेत तेव्हा पासून शिर्के घराणे अवघ्या महाराष्ट्रातभर विखुरलेले दिसत आहे.
         तर काही राजेशिर्के मंडळींना गामिनी कावा करत असताना पकडल्याने मोघलांनी त्यांचे हात पाय कलम करुन त्यांना अपंग करुन सोडून दिले होते म्हणजे "थिट" करुन सोडून दिले म्हणुन त्यांचे आजही "थिटे" असे अड़नाव पडले आहे.. तसेच तुळापुर येथे छत्रपती संभाजीराजांचा छळ करत शरीराचे तुकड़े करुन मारल्यानंतर...त्याप्रसंगी औरंगजेबासमोर प्रतिकार करणे शक्य झाले नसल्यामुळे हतबल झालेल्या लोकांनी आपल्या राजांचे अवयव गोळा केले होते म्हणून काहींचे "वेचले" असे आडनाव पडले तर काहींनी अवयव शिवून एकत्र जोडले म्हणुन त्यांचे "शिवले" असे आडनाव पडले.. म्हणूनच तुळापुर येथील शंभुराजांच्या "बलिदान स्थळ" परिसरात व वढु- बुद्रुक येथील शंभुराजांचे "समाधी स्थळ" परिसरात आजही आमची आडनावे पूर्वी "शिर्के" असे होते असे अभिमानाने सांगणारी असंख्य मंडळी आढळतात.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...