विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 February 2020

स्वराज्यनिष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के यांच्या घराण्याविषयक थोडक्यात महत्वाची माहिती

स्वराज्यनिष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के यांच्या घराण्याविषयक थोडक्यात महत्वाची माहिती
                               |
                               |
                   #वाघोजी #राजेशिर्के 
                               |
#रामोजी उर्फ़ #गणोजी राजेशिर्के (एक अपत्य)
        #कान्होजी राजेशिर्के (पाच अपत्य- त्यातील एक पिलाजीराव)
    #पिलाजीराव राजशिर्केे (पाच अपत्य)
1)वाघोजीराव  2)संभाजीराव 3) देवजीराजे
4)गणोजीराव राजेशिर्के-5)जिऊबाई उर्फ येसुबाई (शिवरायांचे जावई)    (संभाजीराजांच्या पत्नी)
           ___________
1 फेब्रुवारी 1689 साली छत्रपती संभाजीराजांच्या अटकेनंतर विविध प्रकारे गमिनीकावे व ऐतिहासिक घडामोडी घडल्यानंतर शिर्के घराण्यांची आडनावे बदलली त्यानुसार राजेशिर्के + शिर्के + रिकामे + पडवळ + थिटे + शिवले + कुंभारकर + पापळ सह अन्य इतर ही असंख्य नवीन आडनावे बदलली गेली त्यानंतर कोकण , शिरकाण प्रदेश, संगमेश्वर, पेडगाव, बहादुरगड, श्रीगोंदा, तुळापुर, वढु बुद्रुक, सह इतर भागात आणि अखंड महाराष्ट्रसह इतर राज्यात देशात विदेशात शिर्के मंडळी विखुरली गेल्याने विविध भागात विस्तारली गेली आहेत..!
*वरील ऐतिहासिक आडनावांच्या अनेक घरांपैकी काही प्रमुख मोजकी प्रत्यक्षदर्शी शिर्के घराणी खालील प्रमाणे आढळतात.*
👉संपूर्ण कोकण, शिरकाण प्रदेश, संगमेश्वर, शृंगारपुर सह इतर भागात लाखो राजेशिर्के घराणे आताही आहेत/ पूर्वीही होती त्यातीलच राजधानी सातारा येथील माजी उपनगराध्यक्ष मा. सुहासजी राजेशिर्के, पुणे येथील अमितजी राजेशिर्के , मुंबईचे निशांतजी राजेशिर्के, सातारचे सुरेशजी शिर्के सह अन्य शिर्के मंडळी आहेत.
वाई जवळील पसरणीचे प्रसिद्ध उद्योगपती कै.'बी.जी.शिर्के' यांचे पूर्वी 'रिकामे' असे आड़नाव होते परंतु स्वतः बी.जी. शिर्के यांनी आपले आडनाव बदलून घेत पुन्हा शिर्के करुन घेतल्याने हे घराणेही वंशज आहेत त्यांची एक आठवण नेहमी स्मरणात राहील ती म्हणजे "शिवप्रताप दिना" निमित्त त्यांनी अनेक वेळा किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या मूर्तिवर स्व-मालकीच्या हेलीकॉप्टर मधून पुष्पवृष्टि केली होती.
छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर येथे कैद केल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका- श्रीगोंदा येथील मौजे पेड़गाव गावातील बहादुरगडावर (नविन नाव धर्मवीरगड ) आणले असता, रस्ताने छत्रपती शंभुराजांना वाचविण्यासाठी( शोधण्याकामी) मागावर असणारे राजेशिर्के मंडळी बहादुरगड परिसरात आले होते त्यांचेच वंशज म्हणजे शंभुसेना सामाजिक संघटनेचे प्रमुख मा. दिपकजी गणपतराव शिर्के व इतिहास अभ्यासक लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के सह त्यांचे खुप मोठे शिर्के घराणे आजही बहादुरगड तटबंदी लगत राहत असल्याने हे शिर्के घराणे शंभुराजांना वाचविण्यासाठी बहादुरगडाच्या (धर्मवीरगड) तटबंदी पर्यंत आले होते हा भक्कम पुरावा असून त्यातील काही शिर्के थेट गडामध्ये प्रवेश करत असताना पाखल्याच्या वेशांतरात प्रवेशद्वारातच पकडले गेल्याने त्यांच्या कत्तलीही झाल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच काही शिर्के मंडळी गुप्तपणे संभाजीराजांपर्यंत गडावर पोहचत, महाराणी येसुबाईंनी दिलेली महत्त्वाची माहिती देत, शंभुराजांनीही काही गुप्तहेरा मार्फत निरोप- बातमी व लिखित महत्वाचे खलीदे दिल्याची इतिहासात नोंद आढळते.त्याच शिर्के घराण्याचे वंशज आजही बहादुरगड परिसरात जीवन जगताना दिसत आहे.
सातारा, कोल्हापुर, तंजावर येथील राजगादीचे वंशज छत्रपती भोसले घराण्याचे अनेक नातेवाईक व सगे-सोयरे मंडळी हे आजही शिर्के घराण्यातील आहेत.
   ज्या शिर्के मंडळींचे आडनाव 'थिटे' असे पडले त्यापैकी एक प्रमुख वंशज घराणे म्हणजे माजी खासदार, माजी मंत्री.कै. बापूसाहेब थिटे यांचे होय.
    वाई जवळील पसरणीचे भूमिपत्र व प्रसिद्ध वृत्तपत्र "पवनेच्या प्रवाह" चे  संपादक व इतिहास अभ्यासक, लेखक मा.शिवाजीराव अमृतराव शिर्के, पैठण येथील रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के, नागपुर सह अनेक जिल्ह्यातही शिर्के घराणी 1869 नंतरच विस्तारली आहेत.
  अ.नगर जिल्हा, श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादुरगडापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर संपूर्ण गावच शिर्के घराण्याची वसलेली दिसत आहेत ( 1689 च्या काळातील शिर्के सैनिकांच्या छावण्या होत्या.)
कोकणातील संगमेश्वर ते पेडगांवचा किल्ले बहादुरगड या मार्गावरील अनेक गावात ठिकठिकाणी शिर्के घराणी रहीवाशी झालेले आढळतात. ( शंभुराजांबाबत गुप्त माहिती वेगात मिळविण्याकामी ही मंडळी त्यामार्गात आलेली होती अनं तशीच कायमची स्थायिक झाली. )
  ज्या शिर्के मंडळींचे आडनाव 'पडवळ' असे पडले आहे त्यातील अनेक शिर्के लोक पानशेत धरणा लगत मौजे शिरकोली, तालुका- वेल्हे, जिल्हा पुणे येथेही राहतात त्यातील एक घर 'शिरकाई देवीच्या मंदिरात पुजारी' म्हणून काम पाहतात तर काही पडवळ शिरकाई देवी ट्रस्ट मधे पदाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.
  डेरवण येथील शिवसृष्टी चे व्यवस्थापक आबासाहेब शिर्के सह इतर अन्य मराठा संघटनेचे मंडळी ही शिर्केचे वंशज आहेत.
ज्या शिर्के मंडळींचे आडनाव कुंभारकर असे पडले ते लोक तालुका- पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, सासवड, वनपुरी या भागात राहत असून त्यांचे अडनाव जातीवाचक असले तरी त्यांची ज़ात मराठाच आहे हे विशेष होय, त्यापैकी अनेक कुंभारकर मंडळींनी आपले आडनाव बदलून पूर्ववत शिर्के केली आहेत तर काही मंडळी आजही कुंभारकर आडनाव आभिमानाने लावत आहेत त्यापैकीच एक नाव वनपुरीचे राहुल कुंभारकर सह इतरही अन्य भरपूर घरे आहेत ती मंडळीही अडनाव बदलण्याच्या तयारीत आहेत.
  तसेच तुळापूर, वढु बुद्रुक येथील अनेक शिर्के मंडळींचे आडनाव 'वेचले' आणि 'शिवले' अशी झाली असून हा इतिहास अनेक लोकानां माहित आहे याचेही पुरावे प्रत्यक्ष पाहायला मिळतात.
   1689 च्या घटनेनंतर कोकणातील समस्त शिर्के घराणे वैयक्तिक कामानिमित्त,जीवन जगण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रासह, बाहेरील राज्यात- बडोदे व देश-विदेशात स्थलांतरित झालेले दिसतात.
  तसेच 2 फेब्रुवारी 1689 पूर्वी शिर्के आडनाव हे फक्त मराठा घराण्यातच असताना 1689 नंतर मात्र शिर्के हे आडनाव अनेक जातीत आढळले जाते त्या घराण्यांचा ही तर्कशास्त्रानुसार आभ्यास करावा लागेल. ( त्याप्रसंगी अनेक शिर्के लोकांनी गामिनी कावा करत थेट जातीवर्णीय व्यावसायिक वेशांतर करुन मोघलांच्या छावणीत नाभिक, गुरव, पुजारी, पालखीचे भोई, पखाल्या, कुंभार,आदि अनेक वेशांतरे घेतली असावीत. ( ऐतिहासिक तर्कशास्त्रनुसार )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...