मुघलांपूर्वीचे वऱ्हाड
post saambhar: https://varhadnama.blogspot.com
१५ व्या शतकात दक्षिण भारतातली बहामनी सल्तनत कोसळल्यावर त्यातून ५
छोटी छोटी राज्ये उभी राहिली. अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३७),
गोवळकोंड्याची कुतुबशाही(१५१८-१६८६), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६८६),
बिदरची बरिदशाही(१५२६-१६१९) आणि वऱ्हाडची इमादशाही(१४८४-१५७४). ई. स. १५७४
मध्ये मूर्तजा निजामशाह ने वऱ्हाड प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडून
घेतला. आणि इमादशाही संपुष्टात आली. पण निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे फार
काळ निजामशाहीचा वऱ्हाडात अंमल राहू शकला नाही. मुर्तजा निजामशाह पहिला
याच्या मृत्यूनंतर इब्राहिम निजामशाह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर
निजामशाहीतल्या ४ अमीरांनी ४ दिशांना तोंडे फिरवली. प्रत्येकाने एकेक
गादीचा दावेदार निवडला आणि ते आपसांत लढू लागले. त्यातला मियां मंझु नावाचा
सरदार इखलास खानाविरुद्ध लढत असता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला, तेव्हा
त्याने गुजरातेत स्थित मुघल बादशाह अकबराचा पुत्र शाहजादा मुराद, याची मदत
मागितली. मुराद दख्खनच्या राजकारणावर नजर ठेऊन होता आणि योग्य संधी
मिळण्याची वाट बघत होता. आता त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने
अकबराचा कौल घेतला आणि आपल्या बापाचा दख्खन काबीज करण्याचा मनसुबा पूर्ण
करण्यासाठी तो गुजरातहून निघाला. मुर्तजा निजामशहाचा बाप हुसेन निजामशाह
याने आपली मुलगी अली आदिलशाह पहिला याला दिली होती. तिचे नाव चाँद बिबी.
तिने मियां मंझुला आपल्याकडे वळवून घेतले, निजामशाहीत आपला अंमल बसविला आणि
इब्राहिमचा मुलगा बहादुर याच्या नावाने ती राज्य करू लागली. चालून आलेल्या
मुघल फौजेने अहमदनगरला वेढा घातला. चाँद बिबीच्या सैन्याने कडवा प्रतिकार
केला. दोन्ही सैन्यांची खूप शक्ती खर्च झाली. आणि अखेर ई. स. १५९५ मध्ये
निजामशाही आणि मुघलांमध्ये तह झाला. त्या तहानुसार निजामशाहीच्या
अधिपत्याखालील वऱ्हाड प्रांत मुघल साम्राज्याला जोडण्यात आला. चाँद बिबीने
मुघल सैन्य परत जाऊ दिले. आणि मुघलांचा अंमल वऱ्हाडावर बसणार नाही याची
काळजी घेतली. वऱ्हाडातला काही भाग मुघलांच्या तर काही निझामशाहीच्या
ताब्यात राहिला. आणि त्यामुळे तिथे कायम युद्धाचे वातावरण राहिले. लुटालूट
जाळपोळ हा रोजचा प्रकार होता.
वऱ्हाड प्रांत म्हणजे आजचे अमरावती, अकोला वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांचा भाग. त्याकाळी हा भाग खूप समृद्ध होता. उत्तरेला तापी , पूर्वेला तसेच दक्षिणेला वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा नदी, आणि पश्चिमेला गोदावरी, ह्या नद्यांनी हा भाग वेढलेला होता. महुरचा रामगड किल्ला ही वऱ्हाडाची दक्षिण सीमा होती. तसेच उत्तर सिमेला गाविलगड, नरनाळा हे मजबूत किल्ले होते.
पुढे निजामशाहीत पुन्हा अंतर्गत कलह माजला आणि त्यातच ई. स. १६०० मध्ये त्या धाडसी चाँद बिबीचा खून झाला. निजामशाहीचा एक बळकट स्तंभ कोसळला. वर्षभरापूर्वी मुरादही मृत्यू पावला होता. काही दिवसातच शहजादा दानियालच्या अधिपत्याखाली मुघल फौजांनी अहमदनगर वर हल्ला केला आणि निजामशाहीची राजधानी ताब्यात घेतली. पण मुघलांच्या हातात जरी राजधानी आणि आजूबाजूचा प्रदेश आला असला तरीही संपूर्ण राज्य अजुन आले नव्हते. आपल्या जाण्यामुळे सैन्यात जोश निर्माण होईल म्हणून स्वतः बादशाह अकबर बुऱ्हाणपूरास येऊन राहिला. निजामशाही प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागांवर राजू दख्खनी तसेच मलिक अंबर ह्या अमिरांचा अंमल होता. ते स्वतंत्रपणे राज्य करू लागले होते. मलिक अंबर हा एक हबशी गुलाम होता. नशिबाने त्याला हिंदुस्तानात आणले, आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्याने निझामशाहीत महत्त्वाचे स्थान मिळवले होते. पुढे मलिक अंबर आणि राजू दक्खनी यांनी एकमुखाने मुर्तजा निजामशाह दुसरा याला गादीवर बसविले. काही काळातच अंबराने राजू दख्खनीचा पराभव करून निजामशाहीत आपला अंमल बसविला. त्याने मरेपर्यंत मुघलांना दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरले. त्याच्या दिमतीला भोसले, जाधवराव, उदाराम देशमुख यांसारखे प्रभावी मराठा सरदार होते. या सर्व काळात वऱ्हाड प्रांतात मात्र राजकीय अस्थैर्य होते. धाडी, लुटालूट,जाळपोळ यांनी प्रजा जेरीस आलेली होती.

संदर्भ सूची :
१. Ain - i - akbari
२. कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत
३. मराठी रियासात : खंड २
४. Berar Under the Mughals - Dr. Mohd. Yaseen Quddusi
५. Malik Ambar - Dr. Joginder Nath Chowdhari
© Vinit Raje
No comments:
Post a Comment