विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 March 2020

श्री सखी राग्नि जयति महाराणी येसूबाई "

श्री सखी राग्नि जयति महाराणी येसूबाई " Image result for महाराणी येसूबाई

छ. संभाजी महाराज गेल्यानंतर तब्ब्ल " एकोणतीस वर्षे" शत्रूच्या कैदेत होत्या महाराणी येसूबाई. छ. शिवाजी महाराज गेल्यांनतर फक्त नऊ वर्षांचा संसार तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती, सिंहाचा छावा, संभाजी महाराजांबरोबर, पती जिवंत असतानादेखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते, होय छ. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेतून सुटले, तेव्हा त्यांनी वाटेत छोट्या शंभूना लपवून अफ़वा पसरवली कि संभाजी महाराजांचा काळ आला. त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊन जगावे लागले…. केवढी ही मनाची प्रग्लभता… 11 मार्च 1689 रोजी छ. संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले. आणि इथूनच सुरुवात झाली येसूबाई यांच्या त्यागाला, आपल्या पतीच्या मरणाचे आभाळाएवढे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली, त्या काळच्या राजेशाही नुसार संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा" शाहू " हा गादीवर बसायला हवा होता, जर येसूबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला असता, पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर, छ. संभाजी महाराजांचे चुलत बंधू राजाराम महाराज यांनाच गादीवर बसवले, पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टीकोन दाखवला. आणि त्यांच्या वतीने येसूबाई स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागले. पण त्यांच्या त्यागाला खरी सुरुवात होते तर इथूनच, संभाजी महाराजांना ठार केल्या नंतर औरंगजेबाच्या अशा पुन्हा पल्लवित झाल्या, त्यानंतर औरंगजेबाने रायगडाला वेढा घातला, त्यांनतर येसूबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले कि स्वराज्याला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही रायगडातून निसटून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा व संपूर्ण राजधानीच जिंजी ला हलवावी. त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल.

आणि अशा प्रकारे येसूबाई स्वताहा शत्रूशी दोन हात करायला पुढे सरसावल्या. स्वराज्य अबाधीत ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या, पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शंभूना एकट ठेऊन निघून जाणे काही राजारामना पटेना, पण येसूबाईंनी त्यांस पटवून दिले. राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिले पाहिजेल तरच राज्य चालते, अखेर जड अंतःकरणाने राजारामांनी रायगड सोडला. आणि सुरु झाली महाराणी येसूबाईंची सत्व परीक्षा, राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर येसूबाईंनी तब्बल 8 महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा दिला. पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईंना व छोट्या शाहूंना कैद केले. महाराजांची शिकवणच होती प्रसंगी शत्रूला गडकिल्ले द्यावेत पण स्वराज्य अभाधित ठेवावे. त्यामुळे येसूबाई व शाहूंना त्यांची ऐन उमेदीची एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली. एकोणतीस वर्षांमधील 17 वर्ष त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली. आणि त्या नंतरची 12 वर्ष परमुलुखात वनवास सहन करावा लागला. 1690 ते 1719 अशी तब्बल 29 वर्ष त्यांना वनवास भोगावा लागला. खाणे, पिणे, रीतिरिवाज सगळं काही अनाकलनीय, कशा राहिला असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो. छ. संभाजी महाराजांबरोबर चाळीस दिवस अन्याय करणारा औरंगजेब येसूबाईंशी कसा वागला असेल…. याची कल्पनाही करवत नाही. महाराष्टरामधेय 17 वर्ष मुलगा शाहू जवळ तरी होता, पण दिल्लाला गेल्यानंतर 12 वर्ष जाणीवपूर्वक त्यांची ताटातूट करण्यात आली, अशा परिस्थिती त्या कशा राहिल्या असतील? अशावेळी फक्त त्यांच्या असीम त्यागाची कल्पना करणंच आपल्या हाती उरत. त्यांचे दुःख, त्याग, वेदना, संघर्ष याची कल्पना सुद्धा आपण अनुभवू शकत नाही. वीर योद्धे संताजी, धनाजी यांना सुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल, याच उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल. त्यानंतर शाहूं महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेतील मुघल सरदार सैयद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली, सैयद हुसेन अली, बरोबर बाळाजी विश्व्नाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहाबरोबर दिल्लीचा बादशाह फारुख शेख ला पदच्युत केल्यानंतर, महाराणी येसूबाईंची मोघलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली. आणि अखेर 4जुलै 1719 रोजी मराठयांची त्या वेळची राजधानी असलेल्या साताऱ्यात पोहचल्या. आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता. पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारणेचा तह झाला. पुढे 1731 च्या अखेरीस महाराष्ट्राच्या महाराणी येसूबाई यांचं निधन झालं.

धन्यवाद !

जय शिवराय, जय शंभुराय, जय महाराणी येसूबाई !

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...