विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 23 April 2020

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’ भाग 2

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’
postsaambhar:अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षक
भाग 2No photo description available.Image may contain: drawing
सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठे सैन्य दिल्लीकडे कूच झाले. हरियाणाजवळ पानिपत येथे अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांचं नशीब अचानक फिरलं... काही विपरीत गोष्टी घडत गेल्या आणि मराठ्यांचा दारुण पराभव झाला... महाराष्ट्रात तेव्हा एक घरही राहिले नव्हते की, ज्या घरातला कर्ता पुरुष पानिपतावर कामी आला नाही. शेकडो मराठी स्त्रियांच्या कपाळीचे कुंकू या लढाईत पुसले गेले. पानिपतावरच्या पराभवाने मराठा साम्राज्यावर न भूतो, न भविष्यती असं महाभयानक संकट आलं. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी, मराठ्यांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान होते. अहमदशहा अब्दालीच्या प्रचंड सैन्याला मराठ्यांनी निकराचा प्रतिकार केला; पण निसर्ग, विपरीत परिस्थिती अशा अनेक बर्‍या-वाईट घटनांमुळे मराठ्यांचा पानिपतावर दारुण पराभव झाला. विश्वासराव, सदाशिव भाऊ, ग्वाल्हेरचे शिंदे सरदार असे अनेक खासे, मातब्बर सेनानी आणि लाखाच्यावर मराठी सैन्य मारले गेले.
विपरीत परिस्थिती असूनसुद्धा मराठ्यांनी जी कडवी झुंज दिली, महापराक्रम केला, तो पाहून पराभव होता होता वाचलेला अफगाण बादशहा अहमदशहा अब्दालीने मराठ्यांच्या पराक्रमाची नंतर तोंड भरून स्तुती केली, तो शब्दशः अवाक् झाला. या महाभयंकर रणकंदनातून जे वाचले, त्यापैकी बरेचजण महाराष्ट्राकडे पळून जाण्यात यशस्वी झाले, बरेचसे पानिपताच्या आसपास लपून राहिले. नंतर ते तिथेच स्थायिक झाले. आजही ते तिथे रोड मराठा म्हणून वास्तव्यास आहेत... त्यांची खास गावे वसलेली आहेत... जोशी नावाच्या महाराष्ट्रीयन जिल्हाधिकार्‍यांनी पानिपत दिवस साजरा करायची प्रथा सुरू केली, त्यामुळे प्रत्येक वर्षी हा दिवस पानिपतावर पाळला जातो, त्याला महाराष्ट्रामधून अनेक नेते, मराठी मंडळी न चुकता हजर राहतात आणि स्थानिक रोड मराठ्यांसमवेत हा अनोखा सोहळा संपन्न होत असतो.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...