विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 23 April 2020

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’ भाग 3

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’
postsaambhar:अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षकImage may contain: one or more people, mountain, sky and outdoor
भाग 3Image may contain: sky and outdoor
पानिपतावर 14 जानेवारी 1761 या दिवशी हा रणसंग्राम झाला, त्या दिवशी युद्ध संपले तेव्हा मराठ्यांच्या सैन्यातील आणि अहमदशहा अब्दाली व नजीब खान आणि त्याच्या बाजूने लढणार्‍या अनेक छोट्या-मोठ्या राजे, संस्थानिकांच्या सैनिकांच्या मृतदेहांचे खच पडले होते, पानिपतची ही रणभूमी रक्ताने न्हाली होती, दारुण पराभव झालेल्या मराठा सैनिकांचे भयानक हाल झाले. लढाईतून जे जगले-वाचले त्यापैकी बरेचसे पळून जाण्यात यशस्वी झाले. पैकी पराभवामुळे शरण गेलेले सैनिक, खाशा सरदारांच्या स्त्रिया, कुटुंबीय, बाजार बुणगे अशांपैकी 2 हजारांवर मराठे गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने सोबत घेऊन अफगाणी स्थानकाकडे कूच केले. मजल, दरमजल करीत तिकडे पोहोचल्यावर एवढ्या युद्धकैदी, बाजार बुणगे, कैद्यांचे करायचे काय, हा प्रश्न त्याच्या पुढे होता.शेवटी त्याने विचार करून या लटांबराचे गट केले आणि ज्या ज्या अफगाण टोळ्यांनी, सरदारांनी युद्धामध्ये मदत केली त्यांच्यामध्ये मीर नासीर याने बादशहाच्या हुकुमाने हे युद्धकैदी गुलाम म्हणून वाटून टाकले. डेरा बुकटी गावात साहू मराठा जे सरदार, उच्च कुलीन होते, त्यांची वस्ती झाली, ते गुलाम म्हणून वाटले नव्हते... बाकी गडवाही म्हणजे गड सांभाळणारे, किलवाणी म्हणजे किल्लेदार, पेशवाणी म्हणजे जे पेशव्याचे रक्षक होते त्यांना रंगमहाल सुरक्षा अशी कामे वाटून दिली.
अफगाण हे टोळ्यांनी राहत होते.लूटमार, लढाया, आक्रमणे करून लुटीचा माल आणून त्यावर त्यांची उपजीविका असे; पण जे मराठे गुलाम म्हणून आले व स्थायिक झाले. बुलूच परिसरात त्यांनी हळूहळू शेती विकसित केली. नंतर तो भाग चांगला विकसित झाला. समाजाच्या पुढच्या पिढ्या बलुच परिसर व धर्मात सामावल्या गेल्या; पण आजही त्यांच्यातही मराठी बीजे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जिवंत आहेत. लग्नानंतर हळद लावणे, अक्षदा टाकणे, हातावर मेंदी काढणे. काही गाण्यांचे, ओव्यांचे शब्द आजही बोलले जातात. मातेला आई म्हणणे, गोदावरी, कमल, सुभद्रा ही नावे आजही प्रचलित आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...