विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 April 2020

|| छत्रपती संभाजी महाराज ||


|| छत्रपती संभाजी महाराज ||

छत्रपती संभाजी महाराज , मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील सुवर्ण पर्व . जगाच्या पाठीवर आजपर्यंत राजे , शासक अनेक झाले , आहेत आणि होतील , पण छत्रपती संभाजी महाराज , हे जो पर्यंत चंद्र - सूर्य आहेत , तो पर्यंत सर्वोत्तम राजे म्हणोन राहतील . मात्र ११ , ५६८ दिवसांचे आयुष्य , परंतु शंभूराजे त्यातही जीवन जगण काय असतं हे शिकवून गेलं , ते उत्तम कवी होते , उत्तम प्रशिक्षक होते , उत्तम अभियंता होते , उत्तम वैज्ञानिक होते , उत्तम जलतज्ञ होते , उत्तम वनस्पतीशास्त्राचे जाणकार होते ,
उत्तम सेनापती होते , उत्तम शासक होते .

छत्रपती संभाजी महाराज ,
हे सर्व धर्मांना आदर देत असत , तसेच स्त्रियांना योग्य मानसन्मान देत असत , त्यांवर कोणीही अन्याय केला , तर शंभूराजे खुद्द कठोर शिक्षा फर्मावित , आणि अमलात आणत , पण भविष्यात इतिहासकारांनी वयक्तिक रागापाई आणि लोभापायी सह्याद्रीच्या ह्या शंभूराजाला पार बदनाम केलं , पण आता सत्य बाहेर आल आहे ,
" त्याकाळात अनेक लग्न करण्याची परंपरा होती , तेव्हा आपल्या पत्नीशी [ महाराणी येसूबाईसाहेब ] एकनिष्ठ होते " .

छत्रपती संभाजी महाराज
युवराज असल्यापासून रयतेकरिता त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि अमलात ही आणल्या , असं म्हणतात की , " रयतेच्या मुखावरील हसू , ही शंभूराजांची ताकद होती , आणि रयतेच्या डोळ्यातील अश्रू , ही शंभूराजांची कमजोरी होती . शंभूराजांनी दुष्काळग्रस्त परिसरात जलनियोजन योजना राबविल्या , धरणांची निर्मिती केली , शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबविल्या होत्या . शंभूराजांनी धर्मांतरावर पूर्ण पणे बंदी घातली होती , बालमजुरी व वेठबिगारी विरुध्द त्यांनी कायदा तयार केला होता .

छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर , लवकरच आलमगीर ३ लाख घोडदळ , २ लाख पायदळ , १ लाख सेवकवर्ग , ३ हजार हत्ती , ५० हजार उंट , प्रचंड तोफखाना 【 ७० लांब पल्ल्याच्या तोफा होत्या 】, १५ कोटीचा खजिना , अमीर उमराव व मनसबदार यांची संख्या साडे ३ हजार होती , शहजादा मुअज्जम , आज्जम , कामबक्ष , नातू मूईद्दीन , बेदारबखत , नामांकित सरदार असदखान , एतियारखान , शहाबुद्दीन खान , फत्तेखान , रुहुलाखान , हसनअलीखान , दाऊदखान , तरबियतखान अशा सेनानींचा ताफा होता ; परंतु औरंगजेबाचे पारिपत्य करण्याकरिता , संभाजीराजे समर्थ होते , तो येण्यापूर्वीच बुऱ्हाणपूर लुटून आणि शहजादा अकबर यास पन्हा देऊन , त्यांनी औरंगजेबास हिनवले होते . ६ महिन्यात संपूर्ण दख्खन जिंकून घेतो , असा म्हणणाऱ्या औरंगजेबाला , शंभराजांनी पूर्णतः हतबल केले , सन १६८५ नंतर त्याने स्वराज्याविरुध्द मोहीम रद्द करून , त्याने त्याचा मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे वळविला , एवढंच काय तर शंभूराजांच्या पराक्रमामुळे , त्याने त्याचा शाही किमौंश खाली ठेवला आणि
कसम घेतली , की जोपर्यंत संभाला कैद करत नाही वा ठार मारत नाही तोपर्यंत शाही किमौंश परिधान करणार नाही . सन १६८१ मध्ये औरंगजेब काही एकटा स्वराज्यविरुद्ध चालून नव्हता आला , त्याने सिद्दी , पोर्तुगीज , व टोपीकर इंग्रज यांना स्वराज्याच्या कुरापती काढण्यास चेतविल होतं , " एकाच वेळी , उत्तम
योजनाबद्ध नियोजनामुळे , शंभूराजांनी सर्वच आघाड्यांवर विजयश्री कायम बरोबर ठेवला " .

छत्रपती संभाजी महाराजांनी वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती सुद्धा साधली होती , मात्र प्रबळ बुद्धीच्या बळावर . राजांनी युद्धभूमीवरील गरज ओळखून , जगातील पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेटची निर्मिती केली होती , तसेच जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार केला , जझिरे - मेहरुब [ जंजिरा ] जिंकण्याकरिता महाकाय समुद्रात ८०० मीटर लांबीचा सेतू बांधला होता , आधुनिक शस्त्रांची निर्मिती सुद्धा राजे करत होते , स्वराज्याचे दारूगोळ्याचे कारखाने सुद्धा उभारले होते . हिंदवी स्वराज्याचे आरमार सुसज्ज करण्याकरिता परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य सुद्धा घेतले होते .

छत्रपती संभाजीराजे
, आदिलशाही आणि कुतूबशाहीचे पित्याप्रमाणे सांभाळ करत होते [ एका पोर्तुगीज अधिकारी याने लिहून ठेवले होते ] , तर राजे मोगलांचे कर्दनकाळ ठरले होते , आणि सिद्दी , पोर्तुगीज , टोपीकर इंग्रज यांना शक्तीच्या व प्रगल्भ बुद्धीच्या बळावर थोपवून ठेविले होते .

छत्रपती संभाजी
महाराजांनी प्रतिकूल काळातही , स्वराज्याला
आर्थिकदृष्ट्या संपन्न ठेविले होते . जगतगुरु
महान संतश्रेष्ठ तुकोबांच्या , " देहू ते पंढरपूर आषाढी वारीला संरक्षण आणि अर्थसाहाय्य दिले होते " .

एकंदर संपूर्ण भारत राष्ट्राचा , इतिहास अभ्यासला तर निष्कर्ष असा निघतो , महान व्यक्ती ही शास्त्रात किंवा शस्त्रात पारंगत असते , पण ह्या तत्वाला अपवाद ठरतात , मात्र " छत्रपती संभाजी महाराज " , त्यांनी जे महान ग्रंथ लिहले आहेत
[ बुधभूषण , नायिकाभेद , सातशातक , व नखशिखान्त ] , त्या ग्रंथ अभ्यासल्यावर विश्वातील रहस्यांचा उलगडा होता , तर त्यांची रणांगणातील युद्धे अभ्यासली तर त्यांच्या पराक्रमाबद्दल स्तुती करण्यासाठी शब्द सुचतच नाहीत , ही व्यथा आहे , खुद्द औरंगजेब सुद्धा म्हणोन गेला की , " संभाजीला रणांगणात हरवणे नामुमकीन " .

■ काही विशेष टिपणी : -

स्थितप्रज्ञता , युद्धकला , नीतिशास्त्र , पराक्रम , मुत्सद्देगिरी , दबावतंत्र , कुटनीती , आणि गनिमी कावा ह्या सर्वा गुणांमध्ये शंभूराजे आमच्याही पुढे आहेत ....

- छत्रपती शिवाजी महाराज .

जो काम करनेमे हमारे बहादूर सरदार और हमे करने के लिये महिनो लगते है , वो काम ये संभा
एक दिन या कुछ घंटो में ही पुरा करता है |

- आलमगीर औरंगजेब .

एक वेळ शिवाजी परवडला , पण संभाजी काही औरच आहे , जमणारच नाही .

- पोर्तुगीज व्हाइसरॉय .

युद्धासाठी सदैव सज्ज असेलला युवराज
[ संभाजी ] ....

- टोपीकर इंग्रज .

राजे अनेक झालेत , होतीलही परंतु महामहिम
छत्रपती संभाजी महाराजांसारखा , जगविजेता राजा [ राज्यकर्ता ] होणे शक्य नाही ....

- शंभूमाहितीगार .

" अखंड भारताचा विजय आहे " .

|| जय हिंद ||

~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)

ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 /
7741923346 .

----- × समाप्त × -----

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...