संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण यांनी.
११ मार्च १६८९ रोजी औरंजेबाने शंभुराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर १६९० मध्ये औरंगजेबाने येसूबाई राणीसाहेब, शाहू महाराज आणि राणूबाईसाहेब (राणूआक्का) यांना कैद करून नेले. त्यानंतर १७०७ मध्ये औरंगजेब मेला. येसूबाईंना उमेदीच्या काळात तब्बलं २९ वर्षे मुघलांच्या कैदेत राहावे लागले आणि या २९ वर्षातील १७ वर्षे औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील छावणीत नजरकैदेत राहावे लागले. १७१९ मध्ये मराठ्यांनी राणीसाहेबांना सोडवून घेतले. राणीसाहेब आणि शाहु महाराज यांच्या स्वराज्यनिष्ठेला तोड नाही.
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रावरील औरंगजेब बादशहाचे आक्रमण अधिकच तीव्र होत गेले. ते इतके की नवे छत्रपती ‘राजाराम महाराज’ यांना आपल्या काही सहकाऱ्यांसह कर्नाटकात आश्रय घ्यावा लागला. कर्नाटकात जाताना त्यांनी महाराष्ट्राच्या स्वराज्याचा कारभार “रामचंद्र पंत”, “शंकराजी नारायण”, “संताजी घोरपडे”, व “धनाजी जाधव” या चौघांवर सोपवला होता. या चौघांनी संभाजी महाराज यांच्या हत्येने खचून गेलेल्या मराठ्यांमध्ये पुन्हा शत्रूशी लढण्याचा उत्साह पैदा केला आणि हळू हळू मोघलांच्या ताब्यात गेलेला मुलुख सोडविण्याचा प्रारंभ केला. ते विजया पाठीमागून विजय मिळवत गेले.
मावळ्यांचे नीतीधैर्य वाढावे, मुघलांना एक दणका द्यावा, येसूबाईंच्या कैदेचा बदला घ्यावा, शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यावा व आपले वडील म्हाळोजी घोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घ्यावा यासाठी त्या वेळचे स्वराज्याचे सेनापती संताजी घोरपडे यांनी औरंजेबाच्या छावणीवर हल्ला करण्याचा धाडसी बेत आखला आणि हल्ला केला देखील पण दुर्दैवाने त्यावेळी औरंगजेब छावणीत नव्हता.
मराठ्यांनी गडकिल्ले आपल्या कबज्यात आणण्यासाठी एक जंगी मोहीम आखली या मोहिमेचे नेतृत्व रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव अशा चौघांनी केली होती. आणि या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे मोघलांनी जिंकून घेतलेले संगमेश्वर (जिथे शंभुराजांना कैद झाली) पुन्हा आपल्या ताब्यात आणणे हा होता.
संगमेश्वरवर हल्ला केल्यावर याच ठिकाणी शंभूराज्यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याच्यावर शंकराजी नारायण आणि संताजी घोरपडे यांनी अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका जोरदार होता की मुकर्रबखान काहीच करू शकला नाही. जखमी मुकर्रबखान जिवाच्या आकांताने पळत होता आणि संताजी घोरपडे त्याचा घोड्यावर बसून पाठलाग करत होते संताजी घोरपडे व नारायण यांनी इतकी मारहाण केली की तो तडफडून मेला. शेवटी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येला जवाबदार असणाऱ्या मुकर्रबखानाचा अंत झाला.
|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे || 🚩🚩🚩
No comments:
Post a Comment