विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 1 April 2020

कामराज राजे -घाटगे

कामराज राजे -घाटगे
सूर्यवंशाचे राष्ट्रकूटघराणे यांची काही शाखेचे राजस्थान प्रांतात राज्यकर्ते होते व गेल्याचे पुढं त्यांना रजपूत राठोड म्हणून ओळखले गेले व राठोड कुळी नामांकित होत गेली .घाटगे घराणे राजपुततातील नामांकितउंच कुलीन राठोड कुळीतील होते हें राठोड वंशाने सूर्य वंशा चे होते.यांची काही घराणी दक्षिणेत लष्करी ताकद अजमवन्यासाठी आली होती.त्याचं घाटगे याचें वंशज होते.13व्या शतकात बिदरच्या बादशाहा हसन गणू बहामनी यांच्या दरबारात बलाढ्य मनसबदार व सरदार घाटगे यांचा मुळं पुरुष कमराज होते.त्यावेळी कामराज राठोड हें सूर्य वंशाचे म्हणून ओळखले जात होते .कामराज यांच्या विशेष नामांतराला विशिष्ट कारण होते .प्रथम घाटगे हा किताब कामराज यांनी मिळवला ते म्हणजे आभ्यासक फेरीस्ता, पारसनीस यांनी मांडले आहे.शिवाय या घाटगे घराण्याची येक शाखेचे वंशाचे लाखमोजी व रामाजी रसद घेऊन बंदरास जात असताना शत्रू नि अडवले त्यामुळे त्याच्या मधे जोरदार युध्द केले व त्या जागी असणारा घाट पराक्रम करून जिंकला .व तों घाट दळणवळणाच्या साठी मोकळा केला .त्यामुळे घाट जिंकणारे घाटगे घाडगे असा नांवात अपभ्रंश होत गेला .शिवाय नंतर च्या काळात काळानुसार घाटगे यांचा मोडी लीफी ट व ड सारखे असल्याने मुळं वतनावर घाटगे यांच घाडगे अपभ्रंश होत गेला .त्यात करनास बोली भाषा पण महत्वाची आहे.घाटगे यांच्या मुळं वतने असणाऱ्या गावे च्या गावे आत्ता घाडगे या नांवाने आहेत. मुळं पुरुष कामराज घाटगे यांना मलवडी व ललगुण महालाची परंपरागत देशगत होती. लेखक :नितीनघाडगे 8888494588
कामराज राजे -घाटगे" (मलवडी)खटाव मान वारले यांना 6पुत्र होते
1)परसनाक
2)लोहनाक
3)नयनाक
4)जेतपळनाक
5)बगडनाक
6)लोकनाक
1)परसनाक :-
हे कामराज घाटगे यांचे प्रथम पुत्र होते.पराक्रमाने सरदार की मिळवली.ते मलवडी व बूध् येते जागीर पहात होते.
2)लोहनाक :-सरदार लोहनाक हे पराक्रमी होते. यांना सरदार कडतोजीराजे घाटगे हे पराक्रमी पुत्र होता.हा पराक्रमी वंश आहे.कडतोजीस चयाजी घाटगे हा पुत्र होता.
सरदार बालोजी घाटगे निजामशाहीत होते.मालोजी राजे यांचा मेहुणा वणगोजी निंबाळकरानी (बरा वजीरानचा काळ )आपली मुलगी बलोजी राजे -घाटगे यांना दिली.बलोजी हे मानसबदार कामराज घाटगे (खटाव मान )यांच्या वंशातील होते ,
1)"सरदार लोकंनाकराजे घाटगे" पुत्र
2)"सरदार कड्तोजिराजे घाटगे "पुत्र
3)"चयाजीराजे घाटगे" यांचा पुत्र होता
4) "सरदार बालोजीराजे घाटगे."
बलोजीस 7पुत्र होते.
1)सरदार कोरपाळजीराजे घाटगे
2)सरदार बाबाजीराजे घाटगे
3)सरदार यालोजीराजे घाटगे
4)सरदार लखोजीराजे घाटगे
5)सरदार कडतोजीराजे घाटगे
6)सरदार रहोजीराजे घाटगे
7) सरदार मिटाजीराजे घाटगे
या 7जनात भाडने लागली व्यागोजी राजे निंबाळकर व विजापूरच्या वजीर कालीमखांन मार्फत वाटनी केली.वडिलांशी शीकयासाठी 5गावे व प्रत्यक मुलास 11गावे वाटून आली.ही वाटनी ई स वी सन 1566ला केली.
जहागिरदार बाबाजी राजे घाटगे
सरदार बाबाजी घाटगे यांना झुंजारराव ही पदवी आहे व वजीरकी भेटली होती.विजापूरच्या राज्यांतून त्यानी पराक्रमाने कमावली होती.सरदार बालोजी घाटगे पुत्र सरदार बाबाजीघाटगे व सरदार मितोजी घाटगे हे विजापुर दरबारी फार नावारूपास आले होते.
निजामशाहीचा दिवाण मलिक कबरने यकदा विजापुरास हल्ला चड़वला तेव्हा विजापूर तर्फे सरदार बाबाजी घाटगे व त्यांचे घाटगे भावकि फार उपयोगी पडली होती.विजापुर वर प्रसंग तशाच होता.
मलिक कबरने विजापूरवर छापा घालून विजापूरचे सर्व वजीर पकडून घेऊन गेला.त्यात रणदुल्लखान ,वजीर मानसूरखान ,खेतरखान ,याकुतखान सूजयातखान ,रहमतखान ,जानोजी पाढरे व पदाजी खाटें असे नामांकित वजीर पकडून दुलताबादच्या किल्यावर वेड्यात घालून बंदी केल.तेव्हा विजापूरचे बादशहा हताश होत गेला.त्यच्या जवळ खवास खान नामक सरदार होता.त्याने व मुरार जगदेवयांनी व बाबाजी घाटगे यांनी बादशहास अर्ज करून नामांकीत शिलेदार व मनसबदार जमून मालिका वर हल्ला करण्याची परवानगी घेतली.त्या वेळी अनेक मराठा शिलेदार स वजीर कीची वस्त्रे प्राप्त होत गेली.त्यात 1)वजीर आबाजी पदाजी घाटगे
2)वजीर साबाजी घाटगे
3)वजीर बाबाजी घाटगे
4)वजीर काणोजी चव्हाण
5)वजीर छमवा घोरपडे या सर्व मराठा विरानी हल्ले चड़वून विजापूरचे सर्व वजीर जिवंत सुखरूप सोडवल्याचा पराक्रम केला होता.
सरदार बाबाजीराजे घाटगे यांना 2पुत्र होते.
1)सरदार दवाजी राजेघाटगे
2)सरदार रजाजी राजेघाटगे
1)दवाजी राजे -घाटगे
दवाजी राजे बाबाजी राजे घाटगे यांचा कारभार पाहू लागले.बाबाजी राजे घाटगे यांचा दिवाण आवजी माँउजी नावाचा मातबर् माणूस होता.तो दवाजी राजे घाटगे यांच्या विरुद्ध होता.नंतर वाद वाडत गेला.विजापूर बादशाहाची चुकीचा समाज होत गेला त्याचा परिणाम दवाजी राजे घाटगे विजापूर सोडून शहाजीराजे यांच्या वतीन भागानगरास गेले.व कुत्बशाहीत सरदारकी करू लागले दवाजी राजे घाटगे यांना शहाजी राजे भोसले आपली मुलगी दिली होती.निजामशाहीचा वजीर त्यावेळी शहाजीराजे होते.बाबाजी राजे घाटगे ह्यांच्य घराणे त्यावेळीनावाजले होते . लेखन :नितीन घाडगे 8888494588

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...