विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 May 2020

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 88

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 88
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
शेवट------------------------------------------------------------------------------3


इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर ह्यांची बायजाबाईसाहेबांविषयीं फार पूज्यबुद्धि असल्यामुळे, त्यांनी त्यांच्या अस्वस्थेतेचे वृत्त ऐकतांच, आपले बंधु काशीराव दादा ह्यांस मुद्दाम ग्वाल्हेरीस बाईसाहेबांच्या समाचाराकरिता पाठविले. त्याचप्रमाणे ग्वाल्हेर येथील रेसिडेंट इतर युरोपियन लोक बाईसाहेबांच्या समाचाराकरितां येऊ लागले. ह्याप्रमाणे बायजाबाईसाहेबांविषयीं जिकडेतिकडे सहानुभूति व्यक्त होऊन, त्यांच्या प्रकृतीस आराम पडावा अशी इच्छा सर्वत्र दिसू लागली. त्या इच्छाप्रभावाने ह्मणा, किंवा औषधिगुणामुळे ह्मणा, परंतु बाईसाहेबांस मध्यंतरीं आठ पंधरा दिवस चांगला आराम पडला. हे पाहून महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस अखिल नागरिक जनांस अत्यंत आनंद झाला. त्याच संधीस शिंदे सरकारास पुत्ररत्न प्राप्त होऊन तो आनंद द्विगुणित झाला. त्यामुळे महाराजांनीं गंगा दशहाराचा उत्सव फार थाटाने केला; मुद्दाम ब्रह्मवर्तास जाऊन तेथे ब्राह्मणभोजनें सुवर्णदाने केली. ह्याप्रमाणे मध्यंतरीं कांहीं दिवस बाईसाहेबांबद्दलं पुनः आशा उत्पन्न झाली. परंतु ती आशा अगदी अल्पकालिक होऊन कविकुलगुरु कालिदास ह्यांच्या उक्तीप्रमाणेमरणं प्रकृतिः शरीरिणाम् ह्मणजे जन्मास आलेला प्राणि हा हें नाशवंत जग सोडून जावयाचाच, ह्या नियमाप्रमाणे, बायजाबाईसाहेब ह्यांच्या निधनकालाचा प्रसंग लयकरच प्राप्त झाला. ता. २७ जून . . १८६३ रोजीं, ही ग्वाल्हेरच्या इतिहासांत एकसारखी गाजत असलेली राजकारस्थानी शहाणी ई१५४ स्त्री हा नश्वर देह सोडून कैलासपदीं गेली. ह्या दिवशी हिंदुलोकांचा अत्यंत पवित्र पुण्यकर असा महाएकादशीचा ( ह्मणजे आषाढ शुद्ध एकादशी शके १७८६ हा ) दिवस होता. त्या दिवशीं अत्यंत 'समाधानाने ही राजस्वी मृत्यु पावली. त्यामुळे सर्व प्रजाजन दुःखाने फार हळहळले. त्यांच्या मृत्यूबद्दल दुःखप्रदर्शनार्थ ग्वाल्हेर येथील झांशीबाजार तीन दिवस बंद ठेवण्यात आला होता. महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांच्या मृत्यूने महाराज जयाजीराव ह्यांस फार दुःख झाले. त्यांनी आपल्या घराण्याच्या ह्या राजस्त्रीच्या मोठेपणास साजेल अशा रीतीने त्यांचा अंत्यविधि केला. महाराजांनी बाईसाहेबांच्या इच्छेप्रमाणे बहुत दानधर्म केला, त्यांच्या उत्तरकार्याचे दिवशीं हिंदुस्थानांतील सर्व क्षेत्रांमध्ये एक लक्ष ब्राह्मणभोजन घातलें. त्याचे स्मरण क्षेत्रोक्षेत्र अद्यापि जागृत आहे. ह्याप्रमाणे ह्या स्त्रीच्या पुण्याईने तिचा शेवट उत्तम प्रकारचा झाला. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनी बायजाबाईसाहेबांची ग्वाल्हेर येथे छत्री बांधिली असून, तत्प्रीत्यर्थ कांहीं कायमचे उत्पन्नही करून दिले आहे. ही छत्री कै० दौलतराव शिंदे ह्यांचे छत्रीजवळ असून, तेथे बायजाबाईसाहेबांची उत्तम शिल्पकाराकडून तयार केलेली संगमरवरी दगडाची मूर्ति स्थापन केली आहे. तिची पूजाअर्चा वार्षिक उत्सव अद्यापि चालत आहे. ह्याशिवाय पंढरपूर येथेही द्वारकाधीशाच्या देवालयामध्ये बायजाबाईसाहेबांची एक मूर्ति असून तिच्याही पूजानैवेद्य वगैरे नित्यखर्चाबद्दल शिंदे सरकाराकडून स्वतंत्र उत्पन्न वर्षासन अद्यापि चालत आहे. ह्याप्रमाणे ही स्त्री मृत्युपश्चात् देखील सर्वांच्या पूजेस वंदनास पात्र झाली आहे. महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांची कीर्ति हिंदुस्थानामध्ये सर्वत्र पसरलेली असून, जुन्या वृद्ध लोकांच्या तोंडून त्यांचे वर्णन ऐकू येते. परंतु त्यांच्या -या चरित्राच्या किंवा इतिहासग्रंथाच्या अभावामुळे त्यांचे इ१९९ यश दंतकथांच्या योगाने मंद मंद होत चालले आहे. तथापि, कांहीं पाश्चिमात्य ग्रंथकारांनीं रसिक विद्वानांनी त्यांच्याबद्दल जे उद्गार काढिले आहेत, ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करीत आहेत. ग्वाल्हेरचे जुने रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी बाईसाहेबांच्या राज्यकारभाराची प्रशंसा केली असून, दौलतराव शिंद्यांनी त्यांच्याबद्दल शहाणी बायको (a woman of sense ) ह्मणून जे उद्गार काढले होते, त्याचा वेळोवेळी मोठ्या कौतुकाने उल्लेख केला आहे. शिंद्यांच्या दरबारचे दुसरे रेसिडेंट मेजर सदरलंड ह्यांनी त्यांच्यासंबंधानें (* चतुर स्वाभिमानी बायको' ह्मणून त्यांची स्तुति केली आहे. शिंद्यांच्या दरबारचे युरोपियन डाक्टर मि० होप ह्यांनी, त्या काळची फार नामांकित स्त्री ? ह्मणून आनंदभराने त्यांचा गौरव केला आहे. मिसेस ड्युबर्टी नामक आंग्ल युवतीने, “बायजाबाई ही फार कार्यक्षम साहसी असून हिंदुस्थानांतील फार प्रख्यात स्त्री आहे ? असे झटले आहे. आणि मिसेस फेनी पास ह्या बाईनें, बायजाबाईसारखी कृपाळू सुस्वभावी स्त्री पाहिली नाही, असा स्तुतिपर उल्लेख आपल्या रोजनिशींत नमूद करून ठेविला आहे. त्या वेळच्या वर्तमानपत्रांतूनही बायजाबाईसाहेबांसंबंधाने प्रशंसापर लेख प्रसिद्ध झाले होते. मुंबई ग्याझेट' पत्रांत बायजाबाईसाहेबांचे मृत्युवृत्त आले असून, त्यांत असे झटले आहे कीं, बेगम सुमरू, नागपुरची राणी, झांशीची राणी, लाहोरची चंदाराणी, आणि भोपाळची बेगम ह्या सुप्रसिद्ध स्त्रियांप्रमाणे ही राजस्त्रीही, आपल्या परीने, प्रख्यात असून, हिने अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशीं घोड्यावर बसून टक्कर दिली होती. अशाप्रकारे ह्या महाराणीच्या संबंधाने सर्वत्र स्तुतिपर उल्लेख दृष्टीस पडतात. ह्यावरून ह्या राजस्त्रीने कुवि तुलसीदास ह्यांच्या दोहा. सुरतसे कीरत बडी बिनपंख उड़ जाय। सुरत तो जाती रही, कीरत कबहू जाय ॥५६ ह्या उक्तीप्रमाणे आपल्या पश्चात् आपली कीर्ति हिंदुस्थानांत दुमदुमत ठेविली आहे, असे ऋणण्यास हरकत नाहीं. असे स्त्रीरत्न ज्या शिंदे कुलामध्ये प्रसिद्ध झाले, त्या कुलास एकंदर राष्ट्रास ते ललामभूत होय, ह्यांत शंका नाहीं. बायजाबाईसाहेबांनी ज्या ग्वाल्हेर संस्थानचा राज्यकारभार चालविला, त्याची सांप्रत सर्वप्रकारे सुधारणा होऊन ते चांगल्या भरभराटीच्या स्थितीप्रत पोहोचले आहे. त्याचे क्षेत्रफळ २९,०४६ चौरस मैल असून त्याची लोकसंख्या ३०,३०,५४३ आहे. ह्या संस्थानचे अधिपति श्रीमंत महाराज अलिजाबहादुर माधवरावसाहेब शिंदे हे आहेत. हे बायजाबाईसाहेबांचे पणतू होत. ह्यांजवर ब्रिटिश सरकारची पूर्ण मेहेरबानी असून, त्यांस त्याजकडून के. सी. एस्. आय्. ही बहुमानाची पदवी मिळालेली आहे. ह्यांच्याजवळ ५५०४ स्वार, ११०४० पायदळ ४८ तोफा इतकें सैन्य आहे. ह्यांनीं दक्षिण आफ्रिकेतील चीन देशांतील युद्धप्रसंगीं द्रव्यरूपानें सैन्यरूपाने सार्वभौम सरकारास चांगले साहाय्य केले आहे. ह्यांच्या हातून उत्तमप्रकारे राज्यकारभार चालून प्रजा सदैव सुखानंदांत राहो, शिंदे घराण्याचा लौकिक उत्कर्ष शुक्लॅदुवत् वर्धमान होवो, अशी परमेश्वराजवळ अनन्यभावें प्रार्थना करून हा चरित्रग्रंथ संपवितों. = --?ན་པ------ --, समाप्त. %Maharajah Of Gwalior Stock Photos & Maharajah Of Gwalior Stock ...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...