विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 May 2020

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 87

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 87
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
शेवट------------------------------------------------------------------------------1

डाची परिसमाप्ति होऊन सर्वत्र शांतता झाल्यानंतर महाराणी बायजाबाईसाहेब ह्या ग्वाल्हेर मुक्कामींच महाराज जयाजी४ राव शिंदे ह्यांच्याजवळ राहिल्या होत्या. बायजाबाईसाहेबांचे वय पाऊणशे वर्षांपर्यंत पोहोचले असून, दिवसेंदिवस वार्धक्याचा अंमल त्यांच्या शरीरावर सृष्टिधर्माप्रमाणे जास्त जास्त येत चालला होता. तथापि त्यांचा नित्यक्रम, पूजाअर्चा, कथापुराण वगैरे सर्व गोष्टी सुयंत्रित चालल्या होत्या. दिवसेंदिवस त्यांची देहयष्टि शक्तिहीन होत चालल्यामुळे त्यांचा घोड्यावर बसण्याचा व्यासंग कमी झाला होता. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांची ह्या वृद्ध पूज्य महाराणीवर केवळ मातेप्रमाणे भक्ति असून, त्यांनी त्यांच्या शुश्रूषेत किंवा सन्मानांत यत्किंचितही अंतर पडू दिले नाही. महाराज जयाजीराव हे बायजाबाईसाहेबांची वारंवार भेट घेत असत त्यांच्याशी दोन प्रेमळ शब्द बोलून त्यांच्या मनास समाधान देत असत. अशा रीतीने बंडानंतर सुमारे तीन चार वर्षे लोटलीं. पुढे बायजाबाईसाहेबांची प्रकृति पिकल्या पानाप्रमाणे अगदीं क्षीण होत जाऊन . . १८६३ च्या मे महिन्यांत त्या फारच अशक्त झाल्या, त्यांचा काल अगदीं समीप आल्याची चिन्हे दिसू लागलीं. त्यामुळे महाराज जयाजीराव ह्यांस विशेष चिंता उत्पन्न होऊन, त्यांच्या१९२ आयुर्वृद्धीकरिता त्यांनी दैवी मानवी उपाय सुरू केले; तत्प्रीत्यर्थ पुष्कळ द्रव्य खर्च करण्याचा संकल्प केला. ह्या समयाची हकीकत ता. जून . . १८६३ च्याज्ञानप्रकाश ' वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली आहे. ती वाचली ह्मणजे बायजाबाईसाहेबांच्या अंतकालीं महाराज जयाजीराव ह्यांनी त्यांच्याविषयी आपली भक्ति कशी व्यक्त केली, हे दिसून येते. ती हकीकत येणेप्रमाणेः
  • श्रीमंत बायजाबाईसाहेब शिंदे यांस कितीएक दिवस दुखणे लागून त्यांची प्रकृति हल्ली फारच बिघडली आहे. वैद्य हकीम, अनुष्ठाने करणारे भट, ग्रहांची पीडा घालविणारे जोशी, देवऋषी, पंचाक्षरी वगैरे लोकांचा रोजगार पिकून हजारों रुपयांची त्यांस प्राप्ति होत आहे. श्रीमंत शिंदे सरकार त्यांचे कारभारीमंडळ बाईसाहेबांच्या शुश्रूषेत काळजींत निमग्न झाल्यामुळे आठ दहा दिवस दूरबार नाहींसें झालें आहे. बाईसाहेबांची प्रकृति अत्यावस्थ झालेली पाहून अलिजाबहादुर जयाजीराव यांणीं सर्वांसमक्ष त्यांस विनंति केली की, “आपण मनास वाटेल तितका दानधर्म करावा. या कामांत जो पैसा लागेल तो खजिन्यांतून मागून घ्यावा. त्याच वेळेस महाराजांनीं एक लाख रुपये आणून दाखल केले; आणि असेही सांगितले की, “उज्जन परगणा आपला आहे. हा आपण कोणास बक्षीस देण्यास इच्छित असल्यास तसे करावे. त्यांत माझा नकार नाहीं. मी सर्वस्वी आपला अंकित आहे.” हे भाषण ऐकून बाईसाहेबांस मोठा गहिंवर आला; आणि मोठ्या ममतेने त्यांनी महाराजांचे मुखावरून हात फिरवून सांगितले कीं, तुह्मांस जसे नीट दिसेल तसे करावे. श्रीमंत चिमणाराजा-शिंदे सरकारचे कुटुंब-यांचे नांवाने सर्व मालमत्ता उज्जनी परगणा देण्याचा आपला मानस बाईसाहेबांनी प्रकट करून, त्या गोष्टीस कांहीं अंशीं इंग्रज सरकारची मंजुरी जरूर असल्याकारणानें, मेजर मीडसाहेब मध्य
१५३ हिंदुस्थानचे एजंट यांजकडे वकील रवाना केले. आजी नातू यांचे हे वास्तविक प्रेम पाहून फार संतोष वाटतो. ) ह्याप्रमाणे बायजाबाईसाहेब ह्यांच्या अस्वस्थतेचे वर्तमान सर्वत्र प्रसिद्ध होतांच, त्यांचा समाचार घेण्याकरिता त्यांच्या परिचयाचे त्यांच्याविषयीं पूज्यबुद्धि बाळगणारे अनेक लहानमोठे लोक ग्वाल्हेरीस आले. Maharajah Of Gwalior Stock Photos & Maharajah Of Gwalior Stock ...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...