संपुर्ण महाराष्ट्र जेंव्हा मुघलशाही, आदिलशाही आणि निजामशाहीच्या टाचे खाली दबला जात होता. त्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वाभिमानाने उभं केलं, इथल्या तरुणांना संरक्षण दिलं त्यांना तसेच स्वतःसाठी आणि मातीसाठी लढायला शिकवलं.
सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेंव्हा आपल्या सवंगाड्यांना सोबत घेऊन जेंव्हा स्वराज्याची संकल्पना मांडली तेंव्हा त्यांच्या नजरेसमोर सर्वात महत्वाचं लक्ष होत स्वराज्याच्या किल्ल्याच. स्वराज्यला राखण्यासाठी सह्याद्रीच्या अभेद्य पर्वत रांगेचा मोठा हातभार होता.
पुणे परगण्यातील त्यावेळचा मोठा किल्ला शिवरायांनी हेरून ठेवला होता. तोरणा किल्ल्याचा डोंगर हा खुप उंच आणि अवघड असून महत्वाच्या अश्या मोक्याचा जागेवर होता.
आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून तसाच सोडून दिला होता. किल्ला अर्धवट असल्याने यावर कोणाच्या नजरेखाली नसल्याने किल्ल्यावरही पहारा बऱ्यापैकी शिथिल होता, तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हाच किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले.
सर्व नियोजन स्वतः शिवरायांनी आपल्या सवंगाड्यांना सांगितले. त्यानुसार योजना आखली गेली. आणि अखेर प्रत्यक्ष हल्ल्याचा दिवस उजाडला शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले, मिळेल त्या अवजारांची झालेली हत्यार यांच्या जोरावर शिवरायांनी प्रचंडगडावर हल्ला केला. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते, कि पाहिजे तेवढा दारुगोळा नव्हता.
शिवरायांनी हे हेरलं आणि साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने आणि हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी सुध्दा भराभर ठरल्याप्रमाणे मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारले. आणि गड काबीज केला, तोही वयाच्या अवघ्या १६ वय वर्षी. स्वराज्याच पहिलं तोरण बांधलं गेलं.
या स्वराज्याच्या तोरणाची आठवण म्हणूनच की काय प्रचंडगडाचे नामांतरण “तोरणा” करण्यात आले असावे. तोरणा किल्ला तसा मजबूत किल्ला. किल्ल्यावर दोन भक्कम माच्या आहेत एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी झुंझारमाची वरून एकच अरुंद वाट आहे. हि वाट अतिशय अवघड आहे. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो.
हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा भांड्यांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचा कारभार सुरु झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला किल्ला म्हणजे किल्ले तोरणा. स्वराज्य स्थापनेचं तोरण या किल्ल्यापासून झालं म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणा पडलं असं म्हणतात पण हे तितकं बरोबर नाही. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा असं म्हणतात.
महाराजांनी गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रागेंतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. या किल्ल्याला प्रचंडगड, नबीशाहगड, ‘फुतूहल्घैब म्हणजेच दैवी विजय’, गरुडाचे घरटे असे देखील म्हटले जाते.
No comments:
Post a Comment