विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 7 May 2020

बहिर्जी नाईक : स्वराज्याचे गुप्तहेर

बहिर्जी नाईक : स्वराज्याचे गुप्तहेर

बघायला गेलं तर बहिर्जी कुठे आणि राजमहालात जन्मलेले शिवराय कुठे.?????नियतीने कशा गाठी भेठी ठरवून आणल्या असतील देवच जानो...असा हा बहिर्जी त्याने शस्त्र नाही पण बुद्धीचे अस्त्र चालवले.आणि शिवरायाना मदत केली...तो बहिर्जी नाईक रामोशाचं पोर... कधी पोटाची खळगी भरायला, कधी मित्रांना हसवायला, नकला करायचा .रुपं धारण करायचा.तर पोट भरन्यासाठी रानावनात शिकार करायचा. निसर्गा सारखा गुरू नाही आणि अनुभवा सारखं शिक्षण नाही. बहिर्जी लहानपणापासूनच खेळकर वृत्तीचा ..गावातील बारा बलुतेदाराच्या घरी चाललेली कामे बघायचा... ते काम करायला मदत करायचा.आपल्याला तसं काम येतय का पहायाचा.कधी गावात येनारे गोसावी.. नंदीवाले.., कोकावाले ,बैरागी, मरीआई, भिकारी, खेळनीवाले, वाळ्या मनगट्यावाले.जे कोणी येतील त्यांचे निरीक्षण करावे.त्यांचे आवाज हुबेहुब काढावे. त्यांचे पोशाख मनात साठवायचा. आणि तेच खेळ करायचा .त्यांचे हुबेहुब आवाज काढायचा. लोकांची गमतीशिर भविष्य सांगायचा.पण कोणाला ठाऊक ह्याचे भविष्य काय लिहले असेल???.जर त्यावेळी त्याला कोणी म्हंटले असते...तू शिवरायांच्या सैन्यात जाशील...नाही तरी तू शिवरायाचां एक दिवस मित्र होशील असं सांगितले असते तर बोलनाराला वेड्यात काढला असते .पण नियतीने बहिर्जीच्या भविष्यात काय लिहले होते.ते त्या बापड्यालाही माहीत नव्हते.. काही बालकांकडे जन्म जात काही गुण असतात. हे विज्ञानानं सिद्ध केलय.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.आणि तसच झालं...शिवराय पुण्यात रहायाला आले.त्यावेळी लोक पुण्यात रहायाला घाबरत होते.लोक रहायला यावे म्हणून जो कोणी पुण्याच्या रानात माजलेला लांडगा मारून आणेल त्याला जिजाऊ आईसाहेब शिवरायांच्या हातून सोन्याचं कडं द्यायच्या.बहिर्जीला ही बातमी कळाली. लांडगं मारने असो वा रानातली इतर प्राण्यांची शिकार असो बहिर्जीच्या डाव्या हाताचा खेळ...मारलं लांडगं .कापली शेपटी..आणि गाठला पुण्याचा लालमहाल...शिवरायांना शेपटी दाखवायला उतावीळ झालेला हा पेंद्या कृष्ण भेटीला जसा उतावीळ व्हायचा ...तसा हा उतावीळ बहिर्जी जिजाऊ आईसाहेबाना विचारू लागला...मासाहेब राजं कुठयत. लांडगा मारून ही बघा शेपटी आणलीया...नाव काय तुझं ???मी रामुशाचा बहिर्जी...बहिर्जी नाईक म्हणत्यात मला.अरे पण राजं बाहेर खेळायला गेलेत...दाखवलीस ना शेपटी जा आता कडं घेऊन.पण आईसाहेब एकदा राजं भेटलं असतं तर??मग जा गावात..बघ मैतरांबर कुठं लगुरची खेळत असतील ..नायतर विटि दांडू ...त्या माऊलीला तरी कुठं माहीत होतं की आपण सांगितलेला कृष्णा जसा यमुनेकाठी पेंद्या वाकड्या सुदामाला घेऊन बाललीला करत होता...तसा आपला शिवकृष्णा ताना बाजी संभाजी याना घेऊन गनिमाना ठेचन्याची तलवार लिला इतक्या लवकर खेळेल ...बहिर्जी शोधत शोधत रानात आला...तेवढ्यात मोर ओरडल्याचा आवाज झालाआणि लगेच पोरांचा गलका ऐकू येऊ लागला.बहिर्जी पुढं गेला शिवाजी राजं आणि पोरं विटिदांडू खेळत होती.एवढ्यात बहिर्जी बोलला.तुमच्यात शिवाजी राजं कोण हायेत.एवढ्यात शिवराय पुढे झाले.कारे मिच शिवराय.काय काम आहे.राजं मुजरा तुम्हाला बघायचं होतं.मी लांडगा मारून आलोय.आईसाहेबानी कडं दिलं .पण म्या म्हणलं मला राजानां भेटायचय.तर त्या म्हणाल्या गावात खेळायला गेल्यात.आणि तुम्ही तर सगळे रानात.राजं मी येवका तुमच्यात खेळायला.तुला काय काय येतं मला सगळं येतं.मी शिकार करतो.तलवार चालवतो कुस्ती खेळतो आणि बरका मी भविष्य पण सांगतो...तेवढ्यात सगळी पोर वरडली मग सांग बघू आमचं भविष्य आणि बहिर्जी सांगू लागला .मी यायच्या आधी तुम्ही तलवार तलवार खेळत होता.मी येताच मोर वरडला तो मोर नव्हता तो झाडावर बसलेला एक पोरगा हाये आणि तुम्ही लपवलेल्या तलवारी जाळीत हायता.महाराज थक्क झाले.आणि विचारले कारे, तुझं नाव काय? राजं, मला बहिर्जी नाईक म्हणत्यात.खरच तु भविष्य जाणतोस .त्यावर बहिर्जी हसला ..राजं त्यात काय अवघड ..आहो आता वैशाखाचा महिना.या महिन्यात मोर वरडत नाय मग मी वळाखलं हितच पोरं असनार.मी यायच्या आधी तुम्ही तलवारीचे डाव खेळत होता.मी येताच तलवारी लपवल्या. पण तुमच्या डोक्याला मुंडासं हायती.मुंडासं बांधून जिवरी कोन खेळत का???महाराज आणि मला पक्ष्याचं आवाज बी काढता येत्यात .आणि रानातला कोणता पक्षी प्राणी कसा आणि कधी ओरडतो त्या आवाजावरनं मी त्याना ओळखतो.शिवराय खुश झाले.आणि म्हणाले तू आज पासून आमचा मैतरगडी.बहिर्जी खूश झाला.आणि म्हणाला मी माझ्या बा ला विचारून ऊद्या येतो.पण महाराज एक विनंती हायं...ह्या झाडाव बसलेल्या पोराला सांगा मोराचा आवाज आज काढू नगस.पावसाळ्यात मोर आणि उन्हाळ्यात पावशी वराडती.तवा पावशीचा आवाज काढ नायतर मोठ्या माणसानां सौंशव येईल...ही बुध्दीमत्ता पाहून महाराज थक्क झाले.आणि एक नवा सवंगडी मिळाल्याने आनंदित झाले.शिवराय आता बहिर्जी बरोबर तलवार बाजी तर खेळत होतेच पण आता रानातल्या वाटा, चोरवाटा,डोंगर चढने, उतरने, याचं खेळ खेळू लागले.. .आणि यात पुढं असायचा तो बहिर्जी.रानातून वाट कशी काढावी.. चुकले तर जागा शोधावी कशी...असे अनेक प्रकारचे शिक्षण वजा माहीती बहिर्जी पुढं लागून करायचा.आणि म्हणूनच तो बालवयातच महाराजांच्या लुटूपुटूच्या लढाईपासून ते एखाद्या किल्ल्याची माहीती हातोहात काढून आणन्याचं काम करायचा.. तेव्हापासूनच शिवराय त्याला गुप्त हेर म्हणायचे. शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली.तेव्हापासून बहिर्जीच्या कार्याला सुरुवात झाली.सुरुवातीला जे जे किल्ले महाराजांनी घेतले त्याची सगळी माहीती बहिर्जी पुरवायचा.इतकेच काय जावळीचा पाडाव करायच्या आधी जावळीची बित्तमबातमी आणि मुरारबाजी सारखं सोनं जावळीत आहे. आणि ते आपल्याला हवं. हे बहिर्जीनंच सांगितले.आणि बाजीप्रभुसारखे हिरे कृष्णाजी बांदल कडून स्वराज्यात आणले.ज्यावेळी अफजलखान प्रतापगडावर आला.त्यावेळी पंढरपुर पासून बहिर्जी अफजलखानाच्या सैन्यात होता.अफजल महाराजांचा निमित्त करून घातच करायला आलाय.तेव्हा त्याला शस्त्रानेच
उत्तर द्या. हे नाईकानीच सांगितले .आणि तो येताना आपल्या जनानखान्यातील सगळ्या बायका मारुन आलाय.तो शिवरायाना खूप घाबरलाय.याचा ही फायदा घ्या. ही माहीती काढनारा बहिर्जीच होता... शाहिस्तेखान लाल महालात शिरण्या आधी करतलब खानाला उंबरखिंडीत मारायला बहिर्जींचाच सल्ला होता.शाहिस्तेखान लालमहालात शिरला तेव्हा त्याच्या उठन्या बसन्याच्या तपशिलासह सगळी माहिती शिवरायांना ह्या बहाद्दराने कळवली होती.आणि म्हणूनच महाराज शाहिस्त्याला धडा शिकवू शकले.त्याकाळी गुप्त हेर संघटना म्हणजे जसा श्री शंकराच्या कपाळावर असलेल्या तिसरा डोळा संकटाच्या वेळी उघडला जायचा.तसा महाराजांचा हा तिसरा डोळा होता.त्यात सुमारे तीन एक हजार गुप्तहेर होते.महाराज आग्राभेटीच्या अगोदर औरंगजेब बहादशहा बरोबर हा पठ्ठा पानविडा खाऊन आला होता आणि म्हणूनच महाराज आगऱ्यात बंदीखान्यात असताना त्याना दुसऱ्या ठिकाणी नेऊन वध करा हा बादशहाचा आदेश पकडला आणि जलद हालचाली करून महाराजाना आगऱ्यातून बाहेर काढले आणि स्वराज्य वाचवले.महाराजाना आगऱ्याला जाताना तीन महिने लागले. पण येताना चाळीस दिवसात महाराष्ट्रात आले...आणि येताना आनंद बैरागी बणवन्याची योजना ही यांचीच होती साक्षात जिजाऊ माऊली हीआपल्या पोटच्या गोळ्याला ओळखु शकली नव्हती.अशी सारी करामत केली होती बहिर्जी नाईकानी.पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करण्यासाठी महादेव हेराला बैरागी बणून पाठवला होता.सुरतेची लुट करताना देवळे.मंदिरे मशिदी ,चर्च, आपले परके.आणि लुटायचं कुणाला ते नावानिशी महाराजांना यानीच कळवलं होतं .बैरागी ते भिकारी बणन्यात त्यांचा हातखंडा असे.सुरत लुटते वेळी सुरतचा इंग्रज वखारवाला जाँर्ज ओग्झेन्डन याच्या आँफीसच्या दारात एक भिकारी एक महिनाभर भिक मागत होता.आणि हा इंग्रज अधिकारी त्याला दररोज एक नाने द्यायचा. दररोज चेहरा बघून हा भिकारी ओळखीचा झाला होता.सुरत लुटल्या नंतर हा भिकारी गायब झाला.आणि त्यानंतर ज्यावेळी हा अधिकारी शिवराज्य भिषेकाच्यावेळी रायगडावर आला त्यावेळी एक चेहरा त्या आधीकाऱ्याला ओळखीचा वाटला आणि ज्यावेळी अष्टप्रधान मंडळातील एकेका प्रधानाचे नाव घेतले आणि ज्यावेळी या ओळखीच्या चेहऱ्याचे म्हणजेच बहिर्जी नाईकांचे नाव घेतले. त्यावेळी इंग्रज अधिकारी जॉर्ज ओग्झेन्डन याने कपाळाच हात लावला.आणि मटकन खालीच बसला .कारण एक महिना वखारीच्या दारात भिक मागनारा दुसरा तिसरा कोणी नसून तो बहिर्जी नाईक होता.आणि याचे वर्णन त्याने आपल्या पत्रात करून ठेवले आहे.शिवरायाना कदाचित उद्या देव ही मानतील आणि ते आपले देवच आहेत. पण बहिर्जीने त्याना आगऱ्यात आणि विजापुरात देवच बनवले होते.आणि म्हणून आग्रा भेटीच्या वेळी शिवरायांना बघायला लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती.असा हा बहिर्जी याने आदिलशहाला आपल्या हाताने मदिरेचा ग्लास दिलाय आणि माहिती काढून आणलीये. बहिर्जी जसा सोंगे आणन्यात माहिर होता.तसाच अनेक भाषा बोलन्यात चतूर होता.बिलबरा सारखे वाक्चातुर्य बहिर्जीच्या ठायी होतं .आणि म्हणूनच कुणाकडून काय माहिती हवी ती तो चटकन काढायचा.कधी कधी मृत्युचा दरवाजा तो ठोठवून शिवरायांसाठी माहिती गोळा करी.शिवरायाच्या इती पासून अंतःपर्यत स्वराज्य हेच आपले ध्येय माणनारा हा वीर शेवटी शिवरायांच्या निधनानंतर कोलमडलाच आणि आयुष्य भर महादेवाचा जसा नंदी तसा शिवरायांना नंदी बनुन साथ देनारा हा वाटाड्या शेवटी भुपाळगडावर लढताना जखमी झाला. आणि भुपाळगडच्या पायथ्याशी येऊन श्री शंकराच्या मंदिरात ह्या शिवबांच्या नंदींनं आपला प्राण सोडला...
इतिहासात बहिर्जीबद्दल अगदी त्रोटक माहिती आहे.. कदाचित यातच एक गुप्तहेर म्हणुन बहिर्जी यशस्वी झाले असं मला तरी वाटते .. जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳 जय महाराष्ट्र ..जय शिवराय 🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...