सरसेनापती हंबीरराव मोहिते...
सरसेनापती हंबीरराव मोहिते...
स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजीचे अगदी जवळचे घराणे झाले.
यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले.
इतिहासातील एकमेव व्यक्ती आपल्या दोन्ही छत्रपतींच्या काळात सरसेनापती पद अतिशय उच्चकोटीने भुशविणारे महान व्यक्ती.....
सरसेनापती प्रतापराव गुजर यांना वीरमरण आले होते ,त्यावेळेस शंभुराजांनीच
छत्रपती शिवाजीमहाराजांना हंबीररावांना सरसेनापती करण्याचे सुचविले
होते....
कोणत्याही पदांची अपेक्षानकरता स्वराज्याची व छत्रपतींची
,आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणारे सरसेनापती हंबीरराव
मोहिते...
स्वराज्याच्या प्रत्येक परीक्षेत स्वराज्याचे हित जपणारे
सरसेनापती हंबीरराव मामा ....
सोयराबाई यांचे सख्खे भाऊ ,ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन
झाले त्यावेळेस शंभुराजांना अटक करणार्यांसाठी कटकारस्थान चालु होते व
राजाराम रांजेना छत्रपती बनविण्याचा डाव चालु होता .सख्खे मामा असुन
शंभुराजेच छत्रपती होण्यात स्वराज्याचे हित आहे हि दुरदृष्टी असणारे
अव्दुतीय व्यक्तीमत्व म्हणजे सरसेनापती हंबीरराव मामा...
महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.
ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यन्त पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व
बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हम्बीररावांना दिला. ही
स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात,
बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकड पर्यन्तच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला.
यानन्तर (सन १६७६) सरसेनापती हम्बीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील
आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून
त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हम्बीररावांच्या
तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे
शंभुराजेंना
छत्रपतीं शिवाजीमहाराजांच्या नंतर सर्वात मोठा आधार हंबीरराव मामांचा होता.
जो पर्यंत सरसेनापती हंबीरराव मोहिते जिंवत होते तोपर्यंत औरंगजेब
स्वराज्याचे व शंभुराजांना काहीही करु शकला नाही.आपले सर्वांचे दुर्दैव
एवढेच कि. इ. स. १६८७ मध्यें हंबीरराव व मोंगलांनचा सरदार सरझाखान यांची
वाईजवळ लढाई होऊन तीत मोंगलांचा पराभव झाला. परंतु या लर्ढाईंत
हंबीररावांना तोफेचा गोळालागुन घायाळ होऊन मरण पावले.
No comments:
Post a Comment