विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 June 2020

#पंचभैय्या_सरदार_श्रीमंत_नानासाहेब__पाटील_होळकर_


#पंचभैय्या_सरदार_श्रीमंत_नानासाहेब__पाटील_होळकर_
नाशिक जिल्ह्यातील निफाड गावाचा उल्लेख येताच आपसुक तिथला भुईकोट आणि श्रीमंत नानासाहेब होळकर यांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते नानासाहेब होळकर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कन्या श्रीमंत मुक्ताबाई सरकार फणसे यांच्या वंशातील असुन ते होळकरांच्या ओटीत गेल्याने फणसे ऐवजी होळकर अशीच ओळख.
फणसे आणि होळकर घराण्यांचे जुने वैवाहिक नातेसंबंध असून सुभेदार मल्हारराव होळकर यांचेसोबत उत्तरेत गेलेल्या प्रमुखांत गोविंदराव फणसेचा समावेश होता होळकरांच्या लष्करात फणसेंचे मोठे दल होते. फणसे हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील मात्र शिलेदारीसाठी सुभेदाराबद्दल उत्तरेत स्थिरावलेले पराक्रमी सरदार आणि पाटीलकी असलेले राजघराणे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपली कन्या मुक्ताबाई यांचा विवाह होळकरांच्या फौजेत सरदारकी करणाऱ्या पराक्रमी यशवंतराव होळकर यांचेबरोबर लावुन दिला होता मुक्ताबाई यांना निफाड, लासलगाव, चांदवड, तराणा आदी ठिकाणं आदंन स्वरुपात दिली होती. यशवंतरावाच्यां नंतरची सर्व फणसे सरदार इंदौर आणि आसपास स्थिरावले होते याचदरम्यान सुभेदार तुकोजीराव होळकर यांनी होळकर राजघराण्यांच्या कुळप्रशस्तीसाठी "पंचभैय्या " नावाची परंपरा सुरू केली सुभेदारांच्या भावकीतील पाच वेगवेगळ्या होळकरांना राजघराण्यातील सर्व धार्मिक कार्य-विधी-सण उत्सव-महत्त्वाची कौटुंबिक बोलणी,परंपरांची अमलबजावणी करण्यासाठी नियुक्त करुन त्यांना प्रत्येकाला स्वतंत्र मान आणि इनाम देत पेन्शन बहाल केले पुढे या घराण्यांची ओळख पंचभैय्या होळकर अशी उदयास आली.
फणसे घराण्याचा मोठा इतिहास असून त्यांच्या सरंजामाबद्दल अवधुत लाळगे आणि माझी एक पोस्ट यापूर्वी शेअर केलेली आहे.
पंचभैय्या होळकर मानकरी श्रीमंत नानासाहेब होळकर यांचा जन्म दि.15 जुन 1941 रोजी सौभाग्यवती जनाबाई मार्तंडराव होळकर यांच्या पोटी झाला मार्तंडराव हे होळकरांकडे सरदारकी करीत निफाड लासलगाव येथे त्यांचे वाडे असून निफाडच्या जुन्या वाड्यात होळकरांचे फोटो, शिक्के,शिलालेख शस्त्र पहायला मिळतात. त्यांना पंचभैय्या कमिटी मध्ये अंत्यविधी व्यवस्था करणे, सुतक पाळणे,दहावा,तेरावा घालण्याचा मान होता सवाई महाराजा यशवंतराव होळकर यांच्या निधनानंतर उत्तर कार्य हे नानासाहेब यांनीच केले.श्रीमंत नानासाहेब हे माळकरी असुन पंढरीच्या पांडुरंगाचे निस्सीम सेवेकरी आहेत त्यांच्या घरात दोन देवघर असुन एकात होळकरांची गादी,बांडे निशाण ,पंचभैय्या पगडी,खंडा आणि दुसरीकडे पांडुरंगाची मुर्ती आहे गळ्यात तुळशीची माळ कपाळावर अष्टगंध आणि बुक्याचा टीळा ,मुखात सतत जयहरी वयाची 79 वर्षे त्यांनी ओलांडली असून चिरंजीव मुकुंदराजे हे निफाड चे नगराध्यक्ष होते सध्या नगरसेवक आहेत पंचक्रोशीत दोघेही पितापुत्रांचा लौकिक आहे.
अहिल्यादेवी आणि खंडेराव होळकर यांचे जावई यशवंतराव फणसे यांचा वारसा कार्यकर्तृत्वाने पंचभैय्या सरदार श्रीमंत नानासाहेब पाटील होळकर हे यशस्वीपणे सांभाळीत असुन होळकर रियासतीमधील यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा.....!
श्री.रामभाऊ लांडे अभ्यासक होळकर रियासत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...