विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 June 2020

मा. विलासराव देशमुखांच्या मामांची गढी...


मा. विलासराव देशमुखांच्या मामांची गढी...

मौजे भाळवणी ता. आष्टी जि.नगर येथे साहेबांचे आजोबा भाऊसाहेब आणि आजी गुणाबाई यांना नानासाहेब, साहेबराव आणि भैय्यासाहेब ही तीन मुले आणि गजराबाई, बाईसाहेब वा सुशीलाबाई या तीन मुली झाल्या..पैकी सुशीलाबाईंचा विवाह मौजे बाभळगाव ता.जि. लातूर येथील मा. दगडोजीराव देशमुखांशी झाला. त्यांच्याच पोटी मा. विलासराव व मा. दिलीपराव ही दोन मुले झाली. आई सुशीलाबाई सोबत विलासराव लहानपणी भाळवणीला नेहमी यायचे. मामा नानासाहेबासोबत त्यांचे पोहणे फिरणे घोड्यावर दौड मारणे व्हायचे. पुढील पिढीत व्याप आणि गॕप वाढला. तरी साहेब नाते जपणारे असल्याने मुख्यमंञी झाल्यानंतर आवर्जून मामाच्या गावाला लाल दिवा घेऊन आले..तेव्हा पहिला रोड तयार झाला.. खर्ड्याच्या लढाईत पराक्रम गाजवल्यानंतर भाळवणीची जहागीरी आप्पासाहेब निंबाळकरांना मिळाली. तीन एकरावरील किल्लेवजा भव्य गढी त्याला पाच बुरुज, पुढील बाजूस कचेरी आणि बाहेर तबेला पाण्यासाठी बारव आहे...

साभार सतीश कदम सर
उस्मानाबाद

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...