मराठा इतिहासातील राजनिष्ठ घराणीं.
(४ जानेवारी १७५० सातारच्या गादीवर श्रीमंत छत्रपती रामराजे यांचा राज्याभिषेक झाला. त्यानिमित्ताने या रामराजांचा गुप्तपणे सांभाळकरणाऱ्या दर्याबाईसाहेब नाईक निंबाळकर व त्यांचे पती सरलष्कर निंबाजी नाईक निंबाळकर (वैराग) यांची माहिती करून घेऊया. कोल्हापूरच्या छ. ताराबाईराणीसाहेबानी गृहकलहानंतर कोल्हापूर सोडले व सातारा येथे येऊन राहिल्या होत्या, व आपला नातू रामराजा यास त्याच्या बहिणीकडे (दर्याबाई नाईक निंबाळकर) वैरागजवळील पानगाव मधे गुप्तपणे ठेवले होते. कारण कोल्हापूरच्या राजसबाईंचे कडून त्यास धोका होता.
ज्यावेळी सातारचे छ. शाहूमहाराज यांचा वृद्धापकाळ आला होता व अपत्य नसल्याने गादीला वारस बघण्याचे चालू होते.गादीचा वारस म्हणून ताराराणी साहेबानी रामराजे यांचे नाव सुचविले व ते छ. शाहू महाराज यांनी मान्य केले कारण छ. शिवाजीमहाराज यांचा वंशजच गादीला मिळत होता.
दर्याबाई नाईक निंबाळकरांनी सातारच्या गादीचा वारस सांभाळण्याचे मोठे दिव्य पार पाडले. सन १७४५ ते १७५० एवढ्या कालावधी मध्ये त्यानी त्यांचा सांभाळ केला . दर्याबाई स्वतः लढवय्या होत्या तर त्यांचे पती निंबाजी नाईक निंबाळकर यांची छत्रपती व पेशवे यांनी सहमतीने सरलष्कर पदावर नेमणूक केली होती. निंबाळकर घराण्यातील व्यक्तींनी स्वातंत्र्यानंतरहि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. काकासाहेब नाईक निंबाळकर हे सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते . चंद्रकांत दत्ताजीराव निंबाळकर विधासभा सदस्य होते. श्री कृष्णराव निंबाळकर सहाय्यक आयुक्त होते. तर त्यांच्या पत्नी डॉ .सौ .सुवर्णताई निंबाळकर शैक्षणिक क्षेत्रात काम करतात व त्या लेखिका आहेत त्यांनी लिहिलेली महाराणी ताराबाई व महाराणी येसूबाई यांची चरित्रे नुकतीच प्रकाशित झाली आहेत. खाली वैराग येथील वैभवाची साक्षीदार भव्य दरवाजे.
लेखक : श्री. माधव विध्वंस, सातारा
Article on FB page.
No comments:
Post a Comment