छत्रपति शिवाजी महाराजांची
व्यक्तिरेखा जितकी शोधावी तितकी वेगळी भासत राहते. साडे तीनशे
वर्ष होऊन हि या राजाबद्दलची चिकित्सा कमी न होता वाढतच
चाललेली आहे. शोधाव तर काय ? जगात जितका वारा आहे तितका
शिवाजी महाराजांचा पराक्रम होऊन गेलेला आहे. त्यात शोधेल तितका
सापडेल असा इतिहास आहे. महाराजांची ते हयात असताना आणि
नसताना अशा दोन्ही काळात त्यांची चित्रे काढण्यात आली. जी काही
तंजावर शैलीत आणि मुघल शैलीत काढण्यात आली. त्या आधी जरी
हुबेहूब चित्रे काढण्याची कला जन्म घेऊन दीडशे वर्ष आधी आली
असली तरी ती कला भारतात आत्ता अलीकडे दहा एक वर्ष आधी
समृद्ध झाली आहे. लिओनार्डो द विन्सी, मायकल अन्जेलो सारख्या
चित्रकारांनी महाराज जन्माच्या आधी दीडशे वर्ष आधी चित्रकला
समृद्ध केली. पण महाराजांची चित्रे काढताना मात्र ती द्विमितीय
काढण्यात आली. मीर महंमदने काढलेलं शिवाजी महाराजांचं
अश्वारूढ चित्र प्रसिद्ध आहे. बाहेरच्या देशात असलेल महाराजांचं एका
बाजूला चेहरा असलेल चित्र भारत सरकार मान्य आहे. त्यावरून एक
अंदाज माहित आहे कि, महाराजंची उंची ५.५ फुट इतकीच आहे.
महाराज जिरेटोप घालत. गळ्यात कवड्याची माळ. हातात सोन्याचे
कंडे. अंगात अंगरखा. पायजमा. राजेशाही पायात मोजडी. कमरेच्या
पट्ट्यात खोचलेली कट्यार. आणि बाजूला अडकवलेली तलवार.
कपाळाला लावलेली फिकटशी चंद्रकोर. नाक अगदी सरळ. म्हणजे
कपाळातून बाहेर येऊन थेट ओठांच्या वर थांबलेलं. मिशी अगदी
तिरकस आणि त्याला धनुष्यबाणासारखा पीळ, हनुवटीला टोकदार
दाढी. आणि भले मोठे पण अगदी रेखीव गोलाकार कल्ले. शांत गंभीर
डोळे आणि एका स्त्री सारखे कोरीव भुवया. तेही त्रिकोणी. अशी
काहीशी महाराजांची प्रतिमा त्यांची चित्र बघून डोळ्यांसमोर येते.
आणि आपल्याला माहित आहे. पण सध्या महाराजांच्या तयार
पुतळ्यांकडे बघितल असता महाराजांचे चेहरे हे म्हातारे आणि अगदी
मलून झालेले दिसतात. वाईट वाटत. कुणा कोणत्या लोकांचे पुतळे
अगदी देखणे आणि चेहऱ्यावर काही न मोठ काम करता आलेल तेज
बघून उगाच मनातून रडतो मी महाराजांकडे बघून. बर आता चित्र
झाल. पण काही तेव्हाच्या लोकांनी महाराजांचे वर्णने लिहून ठेवले
आहेत.
जगातलं महाराजांचं पाहिलं चरित्र हे मराठी नाहीतर पोर्तुगीज भाषेत
१६९५ ला म्हणजे महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर पंधरा वर्षांनी
प्रसिद्ध झाल. कोस्मी द गार्द हा त्या चरित्राचा लेखक होता. त्याने स्वतः
महाराजांना बघितलेलं होत. महाराज सुरतेच्या मोहिमेला असताना
त्याने महाराजांना अगदी निरखून बघितलेलं होत. त्यातली त्याची एक
नोंद आहे कि, शिवाजी महाराज सुरतेत असताना पायी शत्रुत फिरत.
#shivajimaharaj
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment