विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 June 2020

साताराचा बहादूर मर्द व्हक्टोरिया क्रॉस विजेते : यशवंत घाडगे


साताराचा बहादूर मर्द

व्हक्टोरिया क्रॉस विजेते : यशवंत घाडगे

आता पर्यंत आपण पाहिलं लाईट इन्फन्टरी म्हणजे काय. याची भारतात सुरवात कशी झाली. आता यातील पराक्रम गाजवलेल्या योध्यांविषयी थोडी माहिती पाहू.

इंग्रजांच्या राज्यात व्हक्टोरिया क्रॉस या पदकाला खूप महत्व आहे. ब्रिटिश सैन्यातील अतुलनीय शैर्य धाडस दाखवणाऱ्या सैनिकांन हे पदक दिलं जातं. या पदकाची सुरवात व्हिक्टोरिया राणीने २९ जानेवारी १८५६ साली केली. वर्णभेदामुळे सुरवातीला हा पुरस्कार फक्त गोऱ्या लोकांना देण्यात येई. पण भारतीय उपखंडातील सैनिकांची कामगिरी पाहून १९११ पासून या पुरस्कारासाठी काळ्या लोकांना म्हणजे भारतीयांनाही (भारतीय उपखंड) ग्राह्य धरण्यात येईल अशी घोषणा करण्यात अली. आणि १९१४ साली दरवान सिंग नेगी नावाच्या भारतीयाने भारतातील प्रथम व्हक्टोरिया क्रॉस पटकावलं ते हि फ्रान्स मध्ये झालेल्या युद्धासाठी.


मराठा लाईट इन्फन्टरी मधील २ योध्यांनी व्हक्टोरिया क्रॉस पटकावले त्यापैकी एक म्हणजे यशवंत घाडगे. यशवंत घाडगे यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२१ रोजी पळसगाव सातारा येथे झाला. १९४१ साली घाडगे ५ मराठा लाईट इन्फन्टरी मध्ये शिपाई म्हणून भरती झाले. यशाची एक एक पायरी चढत वयाच्या २२ वर्षच ते नाईक पदापर्यंत पोहचले. त्यांचा क्रमांक होता ९१९२.

दुसऱ्या महा युद्धात भारताने ब्रिटिशांच्या बाजूने उडी घेतली. आणि ब्रिटिश सैन्याच्या भारतातील बऱ्याच तुकड्या युरोप, आणि मध्य पूर्व आणि पूर्व भागात युद्धासाठी उतरल्या . ५ मराठा लाईट इन्फन्टरी युरोपात होती आणि त्यात होते यशवंत घाडगे.

१० जुलै १९४४ रोजी जर्मन सैन्याच्या ताब्यात असलेली छावणी ताब्यात घेण्यासाठी साठी, यशवंत घाडगे आणि त्यांची तुकडी अप्पर टिम्बर व्हॅली इटली येथे दाखल झाली. ब्रिटिश सैन्याने जर्मन छावणीवर हल्ला केला. या हल्ल्याच्या वेळेला यशवंत घाडगे रायफल तुकडीचे नेतृत्व करत होते. त्यांच्या या हल्ल्याला जर्मन पोस्ट कडून कडवा प्रतिकार मिळत होता. जर्मन सैन्याकडून होणार मशीन गनचा प्रतिकार एवढा जबरदस्त होता कि घाडगे यांच्या तुकडीतील बहुतांश सैनिक शाहिद झाले वा जबर जखमी झाले. यशवंत घाडगे एकटेच त्या पोस्ट समोर लढत उभे राहिले. अशाही परिस्थितीत माघार ना घेता हा पठ्या कडवी झुंज देता राहिला. त्यांनी सर्वात आधी हातगोळा त्या पोस्टवरील मशीन गन च्या दिशेने भिरकावला. त्यात अचूक हल्यात माशिन गन आणि ती चालवणारा गार झाले. त्या नंतर त्यांनी हातातील टॉमी गनच्या साह्याने आजून दोन शत्रू टिपले. शेवटी टॉमी गनची मॅगझीन संपली ती भरण्यात, बदलण्यात वेळ ना दवडता. हा गडी ती रिकामी गन घेऊन पोस्टवर धावुन गेला आणि राहिलेल्या दोघांना रिकाम्या गनच्या दस्त्याच्या यम सदनी पाठवलं. एकट्याने एकहाती पोस्ट घेतली पण तेवढ्यात शत्रूच्या स्नाइपरने त्यांचा लांबुन अचूक वेध घेतला. यशवंत घाडगेना पाठीत व छातीत गोळ्या लागल्या आणि त्यांनी जिंकलेल्या पोस्टवर त्यांनी देह ठेवला. त्यांच्या या अतुलनीय पराक्रमा बद्दल त्यांना १९४४ साली मरणोपरांत व्हक्टोरिया क्रॉस बहाल केला गेला.

३१ ऑक्टोबर १९४४ रोजी छापलेल्या लंडन गॅझेट मध्ये त्यांची शौर्य कथा छापून अली होती खालील प्रमाणे.

'The KING has been graciously pleased to approve the posthumous award of the VICTORIA CROSS to:—

No. 9192 Naik Yeshwant Ghadge, 5th Mahratta Light Infantry, Indian Army.

In Italy, on 10th July, 1944, a Company of the 5th Mahratta Light Infantry attacked a position strongly defended by the enemy.

During this attack a rifle section commanded by Naik Yeshwant Ghadge came under heavy machine-gun fire at close range, which killed or wounded all members of the section except the commander. Without hesitation, and well knowing that none were left to accompany him, Naik Yeshwant Ghadge rushed the machine gun post. He first threw a grenade which knocked out the machine gun and firer, after which he shot one of the gun crew with his Tommygun. Finally, having no time to change his magazine, he grasped his gun by the barrel and beat to death the remaining two men of the gun crew. Unfortunately Naik Yeshwant Ghadge was shot in the chest and back by enemy snipers and died in the post which he had captured single handed.

The courage, determination, and devotion to duty of this Indian N.C.O. in a situation where he knew the odds against him gave little hope of survival, were outstanding.'

सोबतची छाया चित्र
१) यशवंत घाडगे
२) व्हिक्टोरिया क्रॉस

साभार
अभिजित वाघ

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...