*गजेंद्रगडकर घोरपडे (हिंदुराव)*
मुळ सातारा चे रहिवाशी असलेले घोरपडे यांना शिवपूर्व काळात सातारा वतन म्हणून आदिलशाह ने दिले होते
मराठ्यांच्या इतिहासात घोरपडे घराण्याने बजावलेली कामगिरी अनेक अर्थांनी
अत्यंत गौरवास्पद आहे. उत्तरेकडून राजपुतांच्या इतिहासाशी संबंधित तर
महाराष्ट्रात मराठांच्या इतिहासाशी निगडित अशा या पराक्रमी राजघराण्याने
मोठाच इतिहास घडवला.
विशेषतः संताजी, बहिर्जी व मालोजी या त्रिवर्ग सख्ख्या बंधूंचे पराक्रम वगळून मराठ्यांचा इतिहास पुरा होऊ शकणारच नाही. औरंगजेब तसेच इंग्रज, फ्रेंच, हैदर व निजाम यांची पळता भुई थोडी या घराण्यातील पुरुषांनी केली आहे.
हिंदुराव हा किताब पूर्वापार या घराण्यात चालत आला होता. पण हाच
किताब रीतसर पद्धतिने खास दरबार भरवून बहिर्जी यांना छत्रपती राजाराम
महाराजांनी तुळापूर मधील कामगिरीनंतर बहाल केला. या तिन्ही बंधूनी सहकारी
विठोजी चव्हाण यांच्यासोबतीने औरंगजेबास जरब बसवण्यासाठी केलेल्या अचानक
हल्ल्याने मरगळलेल्या महाराष्ट्रात पुन्हा चैतन्य निर्माण केले.
औरंगजेबाच्या सैन्यावर या केलेल्या अचानक हल्ल्यामुळे राजाराम
छत्रपतींनी संताजीला ममलकतमदार, बहिर्जीला हिंदुराव व मालोजीला अमीर उल्
उमराव व विठोजी चव्हाण यांना हिम्मतबहाद्दर हा 'किताब बहाल केला. या
घराण्यातील पुरुषांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास शेकडो पानेही पुरणार
नाहीत. म्हणून आपण त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ.
- *म्हाळोजी* :- अत्यन्त पराक्रमी. भोसल्यांच्या तिन्ही पिढ्यांशी निकटचे संबंध. शहाजींसोबत आदिलशाहीत सरदार होते. बादशहाच्या हिंदूंबद्दलच्या जुलमी कारवाया पाहून शाहाजी व म्हाळोजी यांचे आपल्या धर्मरक्षणासाठी आपल्या फौजा तयार करायला पाहिजे यावर एकमत झाले. संभाजी राजांच्या दिमतीस म्हाळोजींना ठेवून संगमेश्वर येथे शहाजींनी देह ठेवला. हंबीरराव मोहित्यांनंतर सेनापतीपद पद सांभाळले.
- *बहिर्जी घोरपडे* :- म्हाळोजी यांचे द्वितीय पुत्र. मुघलांशी सतत १७ वर्ष लढा. राजाराम छत्रपतींना रायगड वेढ्यातून तसेच मोंगलच्या किल्ल्यात राणी चन्नमाची भेट घेताना पडलेल्या वेढ्यातूनही सुटका करण्यासाठी तिन्ही भावांनी अतुलनीय कामगिरी बजावली. बहिर्जी यांनी सर्व प्रवासात सर्व संकटाचा मुकाबला केला. मुंबई सेक्रेटरीएट मधील कागदपत्रांचे कामकाज पाहणारे जॉर्ज फॉरेस्ट म्हणतात की हिंदुराव हा किताब बहिर्जींकडचे राहण्याचे कारण त्यांची अतुलनीय कामगिरी आहे. गजेंद्रगडाची जहागिरी मिळाली. महाराणी ताराराणींची देखील मदत केली. काही काळ सेनापतीपद भूषवले. कर्नाटकात जाऊन गुत्तीचा किल्ला घेऊन गुत्ती - गजेंद्रगडाचे राज्य निर्मिले. राजमुद्रा उल्लेखनीय आहे. त्यात कुलदैवतेचा उल्लेख आहे.
- *सिदोजी*:- बहिर्जींचे पुत्र. गुत्तीचे साम्राज्य पूर्णपणे ताब्यात ठेवून सोंडूरचा प्रदेश घेतला. ताराबाईंनी सिदोजीस सेनापतीपद दिले. अंबाबाईच्या मूर्तीची सिदोजींच्या हस्ते पुनर्स्थापना करण्यात आली. संभाजी छत्रपतींनी नादगौडकीचे वतन दिले.
- *मुरारराव हिंदुराव घोरपडे* :- अत्यन्त कर्तबगार, महापराक्रमी. गुत्तीचे मोठे साम्राज्य निर्माण केले. मुराररावाकडे उत्तम घोडदळ होते. या जोरावर मुराररावने हैदर, इंग्रज, या सर्वांस जेरीस आणले.
धन्यवाद श्री. Indrajitsinh Ghorpade Gajendragadkar
No comments:
Post a Comment