विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 20 June 2020

आबाजी सोनदेव

आबाजी सोनदेव - दादाजी कोंडदेवांप्रमाणें शहाजीराजेंच्या पदरीं असलेल्या सोनोपंत डबीरांचा हा मुलगा. हा दादोजी कोंडदेवांच्या तालमीत तयार झालेला होता. याचा भाऊ निळो सोनदेव याला १६४७ त शिवाजीराजेंनी आमात्य केलें. इ. स. १६४८ त आबाजींनी कल्याणवर अचानक हल्ला करून तेथील मुल्ला अहमद नांवाच्या सुभेदारास कैद केलें, व कल्याण आणि कल्याणच्या आसपासचे सर्व किल्ले हस्तक करून घेतले. तेव्हां शिवाजीराजे खूष होऊन याची फार प्रशंसा केली व त्यास त्यांनी जिंकलेल्या मुलुखाचा सुभेदार नेमिलें. मुल्ला अहमदास पकडल्यावेळी आबाजीनें त्याची सुंदर सूनहि हस्तगत केली होती.ती महाराजांन समोर हजर करण्यात आली .महाराजांनी आबाजी सोनदेव यांना तसेच सर्वांना पुन्हा संदेश दिला की महीलांचा सन्मान झालाच पाहिजे हा कडक संदेश मावळ्यांना दिला ,व कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणानारळाने ओटी भरुन सन्मानाने त्यांच्या घरी सोडण्याचा आदेश दिला. या घटनेमुळे शत्रुच्या मनात शिवरायांच्या बद्दल वेगळा आदर निर्माण झाला व महाराजांचे राज्य महिलांसाठी किती सुरक्षित आहे हे सिध्द झाले . कारण छत्रपतींच्या गुरु जिजाऊसाहेब होत्या.
ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांगच आहे,’ हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे शिवाजी महाराजांनी जाणलं होतं. इसवीसन १६५७ च्या सुमारास महाराज कोकणात उतरले, त्यावेळी त्यांनी समुद्र जवळून पाहिला. त्या वेळच्या परकीय सत्तांमध्ये मोघल, जंजिऱ्याचे सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे प्रामुख्यानं होते. यापैकी मोघल सोडले, तर इतर तिघांचा पश्चिम किनाऱ्यावर मोठा धाक होता. या तिघांना कर दिल्याशिवाय कोणत्याही नौका समुद्रात विहार करू शकत नसत. मराठ्यांच्या व्यापाराला हा मोठा अडथळा होता. शिवरायांनी आरमारनिर्मितीचा विचार केला. सुरुवातीला खोल समुद्रातल्या दळणवळणापेक्षा किनाऱ्याचं संरक्षण व्हावे, या उद्देशानं वीस गुराब त्यांनी बांधायला सुरूवात केली.

कल्याण, भिवंडी, पेण या ठिकाणी हे काम सुरू झालं. ही बांधणी दर्जेदार व्हावी, या उद्देशानं हे काम पोर्तुगीज खलाशी लुई व्हेगास आणि त्याचा मुलगा फेर्ना व्हेगास यांच्यावर सोपवण्यात आलं. आबाजी सोनदेव यांना महाराजांनी त्यांच्यासोबत हुशार मराठी कारागीर देण्यास सांगितले.नौकाबांधणीचे कामाची वेवस्था लावुन महाराज राजगडावर परतले .काही महीन्यानतंर ते पोर्तुगीज रातोरात काम सोडून गेले ,आबाजी सोनदेव यांना काही कळेणा .महाराजांना काय उत्तर द्यायचे.महाराजांना निरोप देण्यात आला . नौका बांधणीचा भरमसाठ कच्चा माल तयार होता.महाराज कल्याण येथे आले.महारांजा शांत होते .आबाजी सोनदेव यांना पोर्तुगीजांच्या हाताखाली हुशार मराठी कारागींराना व्हेगास यांच्याकडून नौकाबांधणीचं प्रशिक्षण मिळावं, हा यापाठीमागचा उद्देश होता. आपल्या मराठी कारागीरांना बोलाविण्यात आले . महाराजांनी त्यांना विचारले नौकाबांधुशकाल का .त्यांनी होकार दिला व दोन नौका बांधल्या ही , आबाजी सोनदेव थक्क झाले व महाराजांना फक्त पाहत राहिले. महाराज म्हणाले आबाजी आम्हास अंदाजा होताच आज ना उद्या हे काम अर्धवट सोडुन ते परके पोर्तुगीज जाणार व म्हणुनच आम्ही तुम्हास हुशार मराठी कारागीर देण्यास सांगितले होते.
शिवरायांनी स्वतंत्र्य आरमार उभारून स्वराज्याला बळकटी आणली. समुद्रमोहिमा काढल्या. जेधे शकावलीत उल्लेख आहे : ‘शके १५८६ मध्ये माघ मासी राजश्री जाहाजात बैसोन बसनूरास गेले, ते शहर मारून आले.’ गोव्यातल्या कदंबांच्या राज्यानंतर सुमारे तीनशे वर्षं कोणत्याही एतद्देशीय सत्तेकडं आरमार नव्हते. शिवरायांनी ते उभं केलं, दर्या प्रसन्न केला. जनहिताचं शिवराज्य निर्माण करायला समुद्रानं साथ दिली. शिवरायांचं आरमार पाहिल्यावर त्यांची विज्ञाननिष्ठा, आधुनिकता आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आपल्यासमोर उभी राहते.
महाराजांची दुरदृष्टी येथे प्रामुख्याने जाणवते.

रायरी ( रायगड ) ला राजधानीचें स्वरूप आणण्याकरितां सरकारी कामकाजासाठी अवश्य त्या इमारती वगैरे बांधण्याचें काम इ. स. १६६२ त याच्यांच देखरेखीखालीं सुरू होऊन १६६४ मध्यें तें संपविण्यांत आलें.

इ. स. १६६६ त ज्या तीन गृहस्थाकडे राज्याचा कुलअखत्यार देऊन शिवराय औरंगजेबाच्या दरबारी आग्रास गेले त्यांत आबाजी सोनदेव होते. १६७० त मोरोपंत पिंगळे याजबरोबर आबाजी माहुली किल्ला व कल्याण प्रांत सर करून आला. राजारामांनी १६९२ मध्यें आबाजीस रायगड घेण्यास पाठविल्याचा उल्लेख रा. खं. त सांपडतो ( ८.४३ )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...