श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौ रिव राजते |
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखा सुद्धा कुणावरही सत्ता
चालिवते.
१४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर वर छत्रपती शिवाजी महाराज यांना एक तेजस्वी , ओजस्वी पुत्ररत्नची प्राप्ती झाली,
आपल्या मोठ्या बंधूंची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पुत्राचे नाव "संभाजी" ठेवले..
पुरंदर म्हणजे इंद्र,
पण नावाप्रमाणेच आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मराठी स्वाभिमानी
रक्ताच्या सिंहाच्या पावलावर पाऊल टाकत ते अद्वितीय पराक्रमाने छावा बनले..
इतिहासात एखाद्या राजपुत्रावर एवढी संकट येणे, एवढा दुःखाचा डोंगर कोसळणे हे पहिल्यांदाच घडले असावे पण या सर्वांवर मात मिळवणाऱ्या संभाजी महाराजांचा जन्मच पराक्रम गाजविण्यासाठी च झाला होता..
लहानपणीच मातृप्रेमाला पोरके झाल्याने
गाडे कुटुंबाची धाराऊ आई त्यांच्या दूध आई झाल्या.
माँसाहेब जिजाऊ साहेबांच्या छायाछत्राखाली वाढलेल्या अद्वितीय, गुणसंपन्न राजपुत्राला
ज्या वयात खेळायचं बागडायच वय असते त्या वयाच्या ९ व्या वर्षी मिर्झाराजाच्या छावणीत ओलीस म्हणून राहावं लागलं😢
वडिलांसोबत आग्रा भेट घेऊन,
वडिलांची त्या क्रूर कपटी पाताळयंत्री औरंग्याच्या कैदेतून सुटका करून वडिलांना सहीसलामत सोडवून,
स्वतः एक ब्राम्हण कुटूंबात राहून मरण तोंडावर असतानाही एवढ्या मोठ्या
संकटात ही वेदविद्या शिकणे हे या जगाच्या इतिहासात कोणत्याही राजपुत्राने
केलें नाही..
मरणाच्या अगोदरच अंत्यविधी झालेले पाहिले हे असे पहिलेच राजपुत्र😢.
बुद्धीच्या तल्लख धारेप्रमाणे ४ संस्कृत भाषेत ग्रंथ लिहून, तसेच कविसारखं मन आणि त्याच धारेच तेज तलवारी मध्ये ही कायम तसेच तळपत ठेवणारे राजपुत्र एकही लढाई न हारता कायमच आपल्या पराक्रमाचा झेंडा कायम फडकत ठेवलेल्या राजपुत्राने दक्षिणेत त्रिचनापल्ली पर्यंत मराठी साम्राज्य विस्तारित केले..
दंडराजापुरी जवळील मुरुड जंजिरा व समुद्राला किनाऱ्यामध्ये दगडांचा भराव करून सेतू बांधण्याचा प्रयत्न केला होता काही कारणांनी त्यात यश भेटले नाही पण अजिंक्यतेच्या गर्व असणाऱ्या जंजिऱ्याला जिंकण्यासाठी शंभूराजांनी रामायणातील सेतू ची शक्कल लढवली होती..
जस वडिलांनी समुद्राची खोली मोजण्याचा पराक्रम केला तसे पुत्राने समुद्राला बांध घालून सेतू बांधण्याचा पराक्रम केला..
प्रबळ इच्छाशक्ती आणि साहस जे मृत्यू ही नतमस्तक होईल जे मनुष्य जन्मात ही
कोणाला कधी विचारही येणार नाही असे पराक्रम करणारे शंभूराजे वडिलांच्या
मृत्यूनंतर ही खचून न जाता स्वराज्यधर्माचा विस्तार करत राहिले..
आपल्या पत्नीला आपल्या गैरहजेरीत राज्यकारभाराचे अधिकार देणारे संभाजी महाराज हे एकमेव छत्रपती होते..
उभ्या आयुष्यात ज्या गोष्टींचा काहीही तिळमात्र ही संबंध नसतानाही
धर्मद्रोही ,स्वराज्यद्रोही या सारख्या अनेक आरोपांना सामोरे जाताना आपल्या
पराक्रमाने त्या सर्व आरोपांना उत्तर देऊन धर्मासाठी , मराठी
स्वाभिमानासाठी
अतोनात यमयातना सहन करूनच, मृत्यूलाही भय वाटावे असा आयुष्याचा शेवट इतका गोड केला की ,
आज जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो
पर्यंत आणि त्या नंतर ही त्यांना धर्मवीर हे नावच राहील .
उभ्या आयुष्यात शंभूराजांनी हेच शिकवले की....
प्रपंच कशासाठी ??????
प्रपंच हा धर्मासाठी...🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
No comments:
Post a Comment