विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 June 2020

छत्रपति_शिवाजी_महाराज_यांची_शेवटची_लढाई

#
छत्रपति_शिवाजी_महाराज_यांची_शेवटची_लढाई
---------------------- छत्रपती संभाजी राजे पूर्वनियोजित योजनेनुसार मोगलांच्या दिलेर खानाच्या मौजेतून माघार घेऊन विजापूरला आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सेनापती हंबीरराव यांना संभाजी राज्यांना पन्हाळगडी घेऊन जाण्याचे आदेश दिले. शिवाजी महाराज ह्या वेळी जलनापुरात मोगलांवर चालून गेले.जालण्याची प्रचंड लूट झाली. ही बातमी मोगल सरदार रणमस्तखान ह्यास समजताच तो महाराजांच्या मागावर निघाला. लूट जास्त असल्यामुळे राजांच्या फौजेची गती संथ होती. मोगली फौजेने स्वराज्य सेनेवर आक्रमक केलं.शिवाजी महाराज, सेनापती हंबीरराव, धनाजी जाधव आघाडीवर होते , पण मोगलांचा जोर पाहता हंबीरराव ह्यांनी महाराजांना मागे घेऊन काही फौजेसह पट्टा गड जवळ करण्यास सांगितले आणि स्वतः मोगली आक्रमण थोपवू लागले. शिवाजी महाराज ह्यांनी पट्टा गडावर धावती विश्रांती घेतली म्हणून त्या गडास 'विश्रामगड' हे नाव ठेवलं. ह्यानंतर महाराज संभाजी राजांना पन्हाळगडी भेटण्यास गेले. दोघांमध्ये गुप्त चर्चा झाली आणि महाराज रायगडी निघाले. म्हणजे दक्षिण दिग्विजयाची सांगता होता होता "जालण्याची लूट" करताना झालेली लढाई ही महाराजांची शेवटची लढाई.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...