दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण, व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी
लिहिले गेले आहे.
सर्वसामान्यांच्या विकासासाठी त्यांनी मोठे कार्य
उभे केले. अनेक ठिकाणी अन्नछत्रे उघडली, विहिरी बांधून दिल्या. उन्हाळ्यात
प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोईच्या सुविधा, धर्मशाळा, आश्रयशाळा बांधल्या,
जनावरांसाठी डोण्या बांधल्या, पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था,
रुग्णांवर उपचाराची व्यवस्था केली. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे नाव
इतिहासात अजरामर झाले आहे. रामेश्वरम पासून ते काश्मीर पर्यंत शेकडो
प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आसेतुहिमाचल अशी बांधकामे करणारा
राज्यकर्ता म्हणून भारताच्या ज्ञात इतिहासात केवळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर याच आढळतात.
३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला त्यांचे वडील #माणकोजी_शिंदे हे त्या गावचे पाटील होते त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांचा वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. खरंतर पती गेल्यानंतर त्या काळी पत्नीने सती जाण्याची प्रथा होती मात्र मल्हाररावांनी जणू भविष्य हेरले असावे म्हणूनच त्यांनी अहिल्याबाईना सती जाऊ दिले नाही.
स्वतःच्या कल्पकतेने दुरदृष्टी दाखवत अहिल्याबाईंनी प्रजे साठी धोरणात्मक
कामे करण्याचं ठरवत भारतभर अनेक कामे केली. भारताच्या अनेक भागांत सीमा व
हिस्सा न बघता अनेक नद्यांना घाट, तिर बांधले, अनेक बारवा बांधून दिल्या,
कित्येक मंदिरे व धर्मशाळा बांधून वाटसरू व प्रवाशी सुखी केले स्वत:ला
मिळालेल्या संधीचा समर्थपणे उपयोग करून इतरांच्या सुखसोयी वाढविणारी, अडचणी
दूर करणारी राज्यकर्ती म्हणजे तेजस्विनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर होय.
अहिल्याबाई होळकराच्या कारकिर्दीत स्थापत्य, चित्रकला व कलेला प्रोत्साहन दिले गेले.
वास्तुशास्त्रज्ञ चिंतामण कांड म्हणतात, "मराठा राज्याच्या नावावर भव्य वास्तु देवळे किंवा राजवाडे नाहीत. दक्षिण भारत आणि राजस्थान येथील अशा वास्तु निर्माण केल्या. मोगलांच्या नावावर ही भव्य वास्तु आहेत पण मराठा राज्यानी आणि इतर राजांनी जे कार्य केले नाही ते अहिल्याबाई नी करून दाखविले. हे कार्य फक्त स्वतःच्या राज्यातच नाही तर इतरही राज्यात, संपूर्ण हिंदुस्थानात (रामेश्वरम-काशिविश्वेशर) केले आहे. मराठी माणसांला याचा अभिमान असायला हवा" दुष्काळात अनेकाच्या हाताला काम, कलादुष्टी असलेल्या कलाकारांच्या कलेला वाव व लोकांचे, प्रजेचे सार्वजनिक कल्याण हाच त्यांचा ऊद्दात हेतू, दुष्टीकोन होता.
महाराष्ट्रातिल चांदवड (नाशिक) ही होळकरांची उपराजधानी, अहिल्याबाईंच्या कारकिर्दीतील एक स्थापत्याचे ऊत्तम उदाहरण मानली जाते. चांदवडला अहिल्याबाईचे दोन वाडे आहेत एक जुना वाडा, तर नवा वाडा म्हणजे 'रंगमहाल' आहे. रंगमहाल तीन मजली आहे. संपूर्ण काम लाकडात केले असून लाकडावर सुंदर नक्षीकाम आहे. रंगमहालाची चित्र अप्रतिम आहेत. सर्व राजपूत शैलीत असून रामायण, महाभारतातील प्रसंग आहेत. मात्र या चित्रांत स्त्री पुरुषांची वेशभूषा मराठे शाहीची आहे, युद्ध द्रूश्याचे चित्रांकणही मराठा मेवाड शैलीत आहे. वाडा १००फुट ऊंच आहे, दगडी कमान प्रवेशद्वार ला व आजुबाजुला ४ ऐकर परीसरात भव्य दगडी तटबंदी केलेली आहे. या वास्तुबरोबरच अनेक विहीरीचे बांधकाम केले आहे.
चांदवड येथे बांधलेल्या विहिरी वैशिष्ट्यपूर्ण असुन रंगमहालाच्या बाजूला असलेली विहीर सुंदर व प्रेक्षणिय आहे. मुख्य इमारतीच्या पश्चिमेला असलेली ही ऐतिहासिक विहीर कित्येक दुष्काळात चांदवडला, अनेक गावाला पाणी पुरविण्यात आले.विहीरीला एकदंरीत तीन कमाणी आहेत. विहिरीत उतरत जाणाऱ्या पायर्या चौकोनी चिरेबंदी हौदात संपतात. हा हौद २०/३० फूट खोल आहे नंतर ६×८ चा कुंड आहे. त्यातील कधीही न संपना-या जलामुळे खोलीचा अंदाज येत नाही. नरोटी बारव, विठोबा बारव, गढीबाग ही विहिर दोन मजली असून ५० पाय-या आहेत. बांधकाम काळ्या घडीव दगडांचे आहेत. रेणुका मंदीराजवळील एक पायविहीर व शिलालेख कोरलेला आहे.
संदर्भ-
चांदवड स्मरणिका- एस. के.पवार.
माहिती साभार :- वर्षा मिश्रा ( Varsha Mishra )
फोटो साभार :- अमरजीतराजे बारगळ-जहागीरदार
No comments:
Post a Comment