विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 July 2020

## एक होता राजा ## राजा भवानराव पंत प्रतिनिधी-------------2






## एक होता राजा ##
राजा भवानराव पंत प्रतिनिधी-------------2

postsaambhar :Udaykumar Jagtap

एक दिवस राजा वार्षिक भेटीसाठी ओगलेवाडीला गेला होता ओगले औंध संस्थान मधलेच १९१६ साली ओगलें स्थायिक झालेले . त्यांच्या एक भाऊ काही काम करीत न्हवता त्याला पाहून राजा म्हणाला "व्यंकोबा आम्ही अजंठा येथील फ्रेस्कोची नकला करण्याकरिता महाराष्ट्र गुजरात बंगाल मधिल ५ चित्रकारांना बोलावले आहे . तू चित्रे उत्तम काढतोस तू ये आम्ही तुझी चित्रे विकत घेऊ"
. राजा सर्वाना सांगे यंत्राचे , शास्त्राचे युग येत आहे तयार व्हा . १९२५ सालापासूनऔन्ध संस्थान मधीलच तयार झालेला कापडा वापरायचा असा राज्याने निश्चिय केला. राज्याची अर्थ शास्त्राची एक चतुःसूत्री होती ." पक्का द्यावा कच्चा घ्यावा. पक्का घेऊ नये कच्चा देऊ नये "हे व्रत राज्याने १९५१ पर्यंत चालवले संस्थानात उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले .
किर्लोस्करबंधू त्यावेळेस बेळगावात होते . लक्ष्मणराव नांगराचे फाळ तयार करू लागले बेळगावात किर्लोस्करांना राजा भेटला १९१० साली कुंडलच्या माळरानावर कारखाना सुरु झाला . व पुढे सर्व जगविख्यात किर्लोस्कर उद्योगाचा वृक्ष फोपावला .
राजा नेहमी म्हणे," इंग्रजांनी सुरु केलेले कारकून व कारकुनी वृत्ती तयार करण्याचे शिक्षण अगदी कुचकामी आहे . उद्योगधंदा, कला, पैसे कसे मिळवावेत. समाज संपन्न कसा करावा .व्यापार कसा करावा हेच शिक्षण हवे . खरा पुरषार्त करावयाचा असेल तर हस्तव्यवसाय व् यंत्र शास्त्रात निपुणता येण्याचे शिक्षण दिले गेले पाहिजे ."
" उद्योगधंद्याबरोबर पैसे मिळवण्याबरोबरच नफा करण्याबरोबरच किंवा त्याच्या आधी माणसाला सुसंस्कृत होण्यासाठी संस्कार केले गेले नाही,तर तो राक्षस होऊ शकतो व समाजाचा नाश होऊ शकतो ."
आधी अधिष्ठान भगवंताचे समाज ज्यामुळे समतोल राहून सुधारतो सर्वांना सुखी करतो ती कर्तव्य परायणता . म्हणजेच खरा धर्म .
१९२० सालापासून शिक्षण सक्तीचे व मोफत सुरु केले . बोर्डिंग ची व्यवस्था केली . मोफत राहणे व भोजनाची व्यवस्था असे .. साने गुरुजी सुद्धा एक वर्ष येथे राहिले होते नामवंत लेखक, कवी, चित्रकार,, शास्त्रज्ञ अनेक क्रीडापती, उद्योगपती औधच्या बोर्डिंग मध्ये अन्न घेऊन देवीचा प्रसाद घेऊन पुढे पराक्रमी निघाले .
राज्याचा कटाक्ष असे कि बहुश्रुत असल्याशिवाय सुसंस्कृतपणा नाही . म्हणून शाळेत गाणे ,चित्रकला, ड्रिल ,कुस्ती, खेळ हे कम्पलसरी होते . औंधचे वातावरणच चित्रमय होते .
राज्याचा चित्रांचा, मूर्तींचा, पोथ्यांचा संग्रह सर्व हिंदुस्थानभर गाजला पंडितजी सातवळेकर हे तर संथानातच स्थायिक होते
शिवाय शंकरराव किर्लोस्कर, धुरंदर, बाबुराव पटेल, हळदणकर हे व अनेक इतर औंधला नेहमी येत .
" बारमाप्पा कोट्याळ 'हा औंध संस्थानातील कोट्याळ गावाचा कुंभार एकदा राज्या कोट्याळला गेला असता (१९२१)त्याने काही त्याच्या मूर्ती बघितल्या , राज्याला काही चित्रे समोर काढून दाखवली. आनंदाने राज्याला गहिवरुन आले व बारमाप्पाला २० वर्ष औधला आणून राजवाड्यात ठेवले .
आजही बारमाप्पाच्या चित्रांचा उत्तम संग्रह औंधच्या म्युझियम मध्ये आहे
.
राजा मोठा भावनाप्रधान ,पण व्यायाम व शिस्त अत्यंत कठोर असल्याने तो लोकांना वर वर तो शांत वाटे हातातोंडाशी आलेला मुलगा वयाच्या ३०व्य वर्षी वारल्यानंतर राज्याच्या डोळ्यात अश्रू कोणी पहिले नाहीत .
पूजा ,अर्चा, आरती, नैवेद्य, उत्सव मोठ्या श्रद्धेने उत्साहाने करी. पण अअंधश्रद्धेचा मागमूस न्हवता . संस्थानात धर्माच्या नावाखाली भोंदूपणा, पिळवणूक करणारे संन्यासी, संत, महंत याना त्यांनी कधीच थारा दिला नाही . मंत्र मांत्रिकांपासून दूर राहिला .
राज्याची ३ श्रध्दास्थाने होती एक जगदंबा ,दुसरे छत्रपती शिवाजी महाराज ,तिसरे म्हणजे वडील श्रीनिवास महाराज. या तिघांशिवाय खाली वाकून राज्याने कोणाला प्रणाम केला नाही कि कोणाची गुरुपूजा केली नाही.

संस्थानातील सर्व मुसलमान जमातीचा तो काझीही होता. खुतबा स्वतः घेत असे .मशिदीत जो नमाज पढण्यास जाणार नाही त्यास तो दंड करी. डोल्याच्या मिरवणुकीस स्वतः राजपुत्राला नाचण्यासाठी पाठवी.
शिवाजी महाराज नुसते आदर्श पुरुषच नाहीत तर सांब शिवाचे अवतार होते असे तो मानी . खरा मानवधर्म शिवाजी महाराजांनी प्रस्थापित करून केली . व वेगवेगळ्या प्रकृतीच्या ,प्रवृत्तीच्या, शूर ,स्वार्थत्यागी, निष्णात व्यक्तींना चेतना देऊन एका स्वराज्य कार्याला जुंपणे हि शिवरायांची शिकवण पूर्ण उपयोगी आहे असे तो समजे .
सातारचे छत्रपती अवघे ४ वर्षाचे पण कोठे गाठ पडली तर खाली वाकून महाराष्ट्रीय मुजरा त्यांना करी व म्हणे" महाराज आम्ही आपली प्रतिनिधी आपलेच अन्न खातो आहो "
"मराठा तितुका मेळवावा "हे छत्रपती शिवरायांचे स्वप्न छोट्या औंध मध्ये साकार करावे हिंदू ,मुसलमान ,ब्राम्हण -ब्राह्मणेतर ,मराठा ,हरिजन वाणी शिंपी रामोशी मातंग या सर्वानी आपापला स्वधर्म म्हणजे समाजासंबंधीचे आपापले कार्य जे ते उत्तम रीतीने करू शकतील सेवा बुद्धीने समाजाची सुधारणा व सुस्थितीला हातभार सहकार्याने लावतील अशी शिकवण राज्याला द्यायची होती
शिक्षकांत हरिजन मुसलमान असेल तर तो त्यांना ब्राम्हणच समजे . का कि हा तो त्याचा स्वधर्म झाला.
अस्पृश्यता राज्याने मानलीच नाही . वाड्यात खुद्द राणीच्या स्वयंपाकाचे काम करणारी स्त्री हरिजन होती . क्रमश:

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...