विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 July 2020

## एक होता राजा ## राजा भवानराव पंत प्रतिनिधी-------------1



## एक होता राजा ##
राजा भवानराव पंत प्रतिनिधी-------------1

postsaambhar :Udaykumar Jagtap


एक होता राजा. तसा जरा म्हातारा ७० वर्षाचा, चाले रुबाबदार . तरुणपणी खूप व्यायाम करायचा. घोड्यावर बसायचा, डोंगरावर देवीचे देऊळ होते तेथे रोज पळत जायचा, तालिम कुस्ती जोर बैठकीचा षोक .दार आठवड्याला दोन उपवास करी हा राजा .
शरीर व मन शुद्ध आणि उत्तमस्थितीत ठेवण्याचा त्याला छंद होता . दर सोमवारी व मंगळवारी दिवसभर उपवास. नवरात्राचे ९ दिवस पूर्णपणे फळावरच राहायचा . शरीर आणि मन इतके कमावले कि ७० वर्ष झाली तरी ताठ चालायचा.
त्यांचे समवयस्क "बाळासाहेब पटवर्धन" मिरज संस्थांनचे यांच्या सांगण्यावरून सूर्य नमस्कार घालण्यास सुरवात केली . २५ वर्षे रोज ३०० नमस्कार घाली .दोन तास लागत. सूर्य नमस्कार व सूर्योपासना या राजाने सतत केल्यावर त्याचा प्रचार करण्यास सुरवात केली .
संस्थानच्या सर्व शाळांमध्ये रोज २५ समंत्रक ,सप्राणायाम नमस्कार घालण्याची सक्तीही केली . हजारो तरुण मुलं मुलींवर यामुळे उत्तम संस्कार झाले . अनेकांनी या सूर्य नमस्कार-- राज्याला धन्यवाद दिले .

त्या राज्याचं नाव होत. भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी आणि त्याचं संस्थान होतं औंध .....
. या सूर्यनमस्काराचा प्रचार परदेशातही झाला . ten points way to health हे पुस्तक १९३७ मध्ये लुईस मॉर्गन हिने प्रसिद्ध केले .या पुस्तकाच्या २२ आवृत्ती निघाल्या आहेत.
व्यायामाबरोबरच स्वछ हवा व ,सात्विक माफक आहारावरही या राज्याचे लक्ष असे . शाळेशाळातून स्वतः जाऊन राजा मुलांनी काय खावे, कसे खावे, केंव्हा खावे या विषयी व्याख्यान देत असे .
गरीब मुलांना ताक, दूध दही, मिळत नाही .तर त्यांनी आपली स्वतःची मूठ भरून हरबरे रात्रभर भिजवून रोज सकाळी धुवून गुळाबरोबर खावेत. म्हणजे शेरभर दूध पिण्याइतके सत्व मिळते असे तो सांगे.
सहज ,सोपा ,सात्विक आहार व नियमबद्ध आणि वक्तशीर वागणे हीच आनंदाची व निरोगीपणाची किल्ली आहे असे तो सारखे सांगत असे .

आपल्या वयाच्या ७३ व्य वाढदिवशी राज्याने भर दरबारात घोषणा केली "सर्व संस्थानाचा कारभार आता लोकांनीच पूर्णपणे चालवायचा राजा लोकांचा आद्य सेवक व त्याच्या साविवेक बुद्धीचा विश्वस्थ म्हणूनच फक्त यापुढे राहणार ""
काळाची पावले ओळखूनच त्याने १९१७ साली रायतसभा नेमली कौन्सिलचे सर्व सभासद हे ग्रामपंचायतीचे सदस्य असत व कौन्सिल पुढे तो सर्व संस्थानाचा जमाखर्च ठेवत असे .
चांगल्या शहाण्या लोकांचा सल्ला घ्यावा ,कर्तबगार धडाडीने कामकारणाऱ्यांकडून मदत घ्यावी असे राज्याला नेहमी वाटे . इतकेच न्हवे तर आपल्यावर टीका करणाऱ्यालाही तो जवळ करी व आमचे कोठे चुकते सांगा, मला सुधारून सर्वांचे कल्याण करायचे आहे असे तो नेहमी सांगे
. याचाच परिणाम म्हणून इवल्याश्या औंध संस्थानात लक्ष्मणराव किर्लोस्कर ,पंडित सातवळेकर ,नानासाहेब चापेकर ,आत्माराम ओगले ,अण्णासाहेब जोशी अशी कर्तबगार व बुद्धिमान माणसे संस्थानाच्या सुधारणेच्या खटाटोपाला राजाला मदत करू लागली
.राज्याचे लक्ष संस्थानाची खेडी स्वावलंबी कशी करता येतील? इकडे लागलेले .
तो म्हणे" मी राजा ,लोकांचे पालनपोषण करणारा राजधर्माप्रमाणे सर्वाना सारखेच लेखणारा मीच" १९३८ मध्ये सर्व मालमत्ता लोकांच्या हाती दिल्यावरही "हि माझी लेकरे ,मीच वाढवली आहेत, आता वाढलेली आहेत ,आता उत्तम चालायला शिकलेली आहेत . त्यांना पुन्हा मांडीवर बसवून घेण्याची जरुरी नाही . "
अधिकाराचा गर्व वाटावा सत्ता लालुपता या राज्याच्या डोक्यात कधीच न्हवती. वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी व नंतर शिव जयंतीला एक पूर्ण आठवडा हिंदुस्थानातील नामवंत विचारवंतांना व पराक्रमी व्यक्तींना बोलावून त्यांचे विचार संस्थानच्या लोकांना ऐकवी
. नंतर विचारविनिमय घडवून आणी १९१७-१९४७ पर्यंत हा ज्ञानसोहळा दरवर्षी दोनदा औंधच्या प्रजाजनांना ऐकवास व अनुभवण्यास मिळे . या दोन मेळाव्यानंतर राजा स्वतः कीर्तन करी
. लोक म्हणत" हा राजा झाला नसता तर कीर्तने करूनही पोट भरू शकला असता ". राज्याचे प्रत्येक कीर्तन स्वतः लिहिलेले असे .
तो म्हणे "जीवनाची सर्व अंगे जाणली पाहिजेत ,अनुभवली पाहिजेत . जीवन जगण्यासाठी आहे ,उपभोगाकरीता आहे . पण जीवन व उपभोग सुसंस्कृत हवेत. हव्यास, अप्पलपोटीपणा ,अजीर्ण उपयोगी नाही. संयमाने सर्वाना बरोबर घेऊनच उपभोग हवा . एकट्याला तो पचत नाही."
गाणे बजावणे ,चित्रकला ,मूर्तिकला ,नाच ,घोडे हत्ती उंटावर बसणे ,मोटार विमान चालवणे हि सर्व उत्तम केली पाहिजेत त्याचा अट्टाहास .
एकदा आटपाडीला राजा गेला असताना कोणा एका विद्यार्थ्याने नाटकात उत्तम काम केले, नकला केल्या, कि राजा त्या रात्री मनापासून हसला व मुलाला बोलावून पाठ थोपटून त्याने बक्षीस दिले.
विचारले," कोणत्या इय्यतेत आहेस ? मास्तरांनी उत्तर दिले" गजानन माडगूळकर (ग ,दि.मा. )अभ्यास करीत नाही, सारखी टवाळी करतो ,गावात भटकतो .महाराजांनीच सांगावे आता याचे काय करावे "
. राजा म्हणाला "गजानन तू या मास्तरच्या नादी लागू नको. तुला अभ्यास जमायचा नाही. सिनेमात जा, जगदंबा ,तुझे कल्याण करील ."
तसेच एकदा राजा शाळा तपासणीसाठी कुंडलला गेला . एक उत्तम गाणारा गोजिरवाणा निकमांचा मुलगा राज्याच्या नजरेत आला . पोवाडा उत्तम म्हणायचा, नकलाही करायचा ,. पण महावात्रट .व सर्वांची चेष्टा कुचेष्टा करणारा क्लास मधुन राजा जातोन जातो तोच मोठा हशा राज्याला एकू आला राजा थांबला त्याचीच नक्कल निकम करीत होता .
राजा परत क्लास मध्ये गेला आणि मुलाच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला" अरे बाळ, जगदंबेने तुला उत्तम आवाज दिला आहे. गाणेही छान म्हणतोस, या दैवी देणगीचा उपयोग लोकसेवा, लोकजागृतीसाठी ,पतितोद्धारासाठी कर. तुझे कल्याण होईल, उगाच टवाळकी करणे सोडून दे "
. हाच पुढे १० वर्षाने शाहीर निकम झाला . ज्याने १९४२ मध्ये लोकजागृतीचे रान उठवले व हजारो लोक त्याचे गीत ऐकून तल्लीन होत असत ........ . . . . . . . क्रमश:

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...