## हरजीराजे महाडिक तारळेकर ##
postsaambhar :डॉ. उदयकुमार जगताप
कोकणात प्रसिद्ध पावलेले हे घराणे पूर्वी आदिलशाहाच्या पदरी चाकरी करताना दिसून येते.
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात हे घराणे स्वराज्याची इमाने इतबारे सेवा करताना दिसून येते.
या घराण्याचा मूळ पुरुष कृष्णाजीराजे यांचेकडे दाभोळ प्रांताची सुभेदारी होती .
कृष्णाजीराजे यांचा 1614 मध्ये अंत झाला.
त्यानंतर त्यांचे बंधू कान्होजी दाभोळ प्रांताचा कारभार पाहू लागले .
हे घराणे कोकणातील महाड( रायगड)मधून आल्यामुळे महाडिक नाव पडले असावे असे वाटते .
जावळीच्या मोऱ्यांनी आक्रमण करून दाभोळ जिंकून घेतले.
कान्होजी 1650 मध्ये मृत्यू पावले .
त्यानंतर या कुटुंबातील कान्होजींचा पुत्र परसोजी हा शहाजीराजे यांच्या सेवेत सामील झाले .
शहाजीराजे यांच्या बरोबर अनेक लढायांमध्ये यांचा उल्लेख आढळतो.
अनेक मोहिमांमध्ये त्यांनी आपली तलवार गाजवली आहे .
त्यामुळे शहाजी राजे यांची मर्जी महाडीकांवर होती.
परसोजी यांचे पुत्र हरजीराजे महाडिक यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी
आपली कन्या व पत्नी सईबाई हिची तिसरी मुलगी अंबिकाबाई हिचा विवाह
हरजीराजे तारळेकर यास दिली.
हरजी राजे यास जिंजी प्रांतात जहागिरी
देऊन त्या प्रांताची सुभेदारीही महाराजांनी त्यांच्याकडे सोपवली होती.
ऑक्टोबर1689पूर्वी हरजीराजे मृत्यू पावले व त्यांची जबाबदारी बाजी काकडे
यांच्यावर राजाराम महाराजांनी सोपवली .
तो दिवस होता 28 ऑक्टोबर 1689 .
छत्रपती संभाजी महाराज यांना मदतीस हरजीराजे येवू शकले नाहीत.
राजाराम महाराज जिजीस पोहोचण्यापूर्वीच युद्धात तोफेचा गोळा लागून29 सप्टेंबर1689 रोजी हरजीराजे मृत्यू पावले.
होते.
हरजीराजे यांचे पुत्र शंकराजी याना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली कन्या भवानीबाई दिली.
होती.
भवानीबाई हिस अंबाजी व दुर्गाजी हे दोन पुत्र झाले.
अंबाजी याना छत्रपती शाहू सातारा यांनी तारळे प्रांताची देशमुखी दिली .
दुसरे पुत्र दुर्गाजी हे करवीर गादीचे सेवेत राहीले. शंकराजी यांच्या मृत्यू नंतर भवानीबाई तारळे नदी काठी सती गेल्या.
No comments:
Post a Comment