postsaambhar :डॉ. उदयकुमार जगताप
रायगड मोगलांच्या ताब्यात जाण्यापूर्वीच छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड सोडला होता .
सप्टेंबर 1689 पूर्वीच ते पन्हाळगडावर पोहोचले होते.
विजयादशमी नंतर लवकरच पन्हाळा मोगली सरदारांनी वेढला.
राजारामाने 26 सप्टेंबर 1689 रोजी पन्हाळा सोडला.
पुढे सेनापती,
मागे मानसिह घोरपडे ,
प्रल्हाद निराजी,
कृष्णाजी अनंत,
नीलकंठ मोरेश्वर
बहिरो मोरेश्वर,
उद्धव ,
नीलकंठ पारसनीस
खंडो बल्लाळ,
खंडोजी कदम ,
बाजी कदम
हे राजाराम महाराजांबरोबर परस्परात मिसळून व घोळक्यातून लक्षात येणार नाही ,
अशा रीतीने वेढ्यातून सुटले.
मोगलांनी त्यांना ओळखले नाही ,
सकाळी राजाराम कृष्णातिरी पोहोचले .
नदी पार करून ते वर्धा नदीजवळ पोहोचले .
शत्रूस त्याची खबर लागली ते पाठलाग करू लागले.
बहिर्जी घोरपडे याचा भाऊ मालोजी घोरपडे राज्यांच्या सेवेला पोहोचला .
नदी पार करून सगळे पैलतीरी पोहोचले .
शत्रूने सर्व वाटा रोखल्याने ठीक ठिकाणी शत्रूशी युद्ध करावे लागले.
शत्रू सैन्य मोठे व राज्यांची घोडेही थकले आहेत हे पाहून संताजी जगताप व रूपसिंह भोसले राज्यांना म्हणाले, "शत्रू सर्व बाजूने चालून आला आहे .
आपण येथून निसटून जावे .
आम्ही येथे शत्रूशी युद्ध करून विजय मिळवतो ."
शत्रू बरोबर महायुद्ध झाले.
संताजी जगताप व रुपसिंह भोसले यांचे हे युद्ध छत्रपती राजाराम यांनीही पाहिले.
हे युद्ध हुबळी ते बंकापूर या दरम्यान झाले असावे.
राज्यांच्या बरोबर फक्त 300 मावळे होते.
राज्यांनी शत्रू सैन्य मोठे आहे हे पाहिल्यावर संताजी जगताप याला शत्रूच्या तोंडावर ठेवून रुपसिंह भोसले यास बरोबर घेऊन पुढे निघून गेले .
राजे तुंगभद्रा नदीच्या काठावर पोहोचले .
शत्रू मोठा आहे.
नदी अगाध आहे हे पाहून राजाराम म्हणाला ,"रुपसिंहा तू एकटा आहेस व शत्रू पुष्कळ, तसेच हा प्रदेशही युद्धाला योग्य नाही.
तू माझ्या बरोबर चल ."
परंतु रुपसिंह भोसले एक पाऊलही हालला नाही.
तो राज्यांना म्हणाला ,"राजे तुम्ही पुढे जा व लवकर स्वराज्य प्राप्त करून घ्या." मी तुमच्या बरोबर आलो तर सर्वजण मारले जाऊ .
मी काही लोकांना बरोबर घेऊन शत्रूची वाट अडवून धरतो."
वर्धा नदी ते तुंगभद्रा नदी या प्रवासास राजेंना 70 ते 80 मैलांच्या प्रवासास तीन दिवस लागले.
राजाराम महाराजांना पन्हाळ्यावरून येथे तुंगभद्रे जवळ पोहोचायला तीन आठवडे लागले .असावेत.
सर्व प्रवास आडमार्गाने केला .
सर्व प्रवास शत्रूच्या प्रदेशातून केला .
शत्रूने आपणास वेढले आहे. बाहेर पडण्यास मार्ग नाही. हे ओळखून राजाराम बहिर्जीस म्हणाला ,"आपण यातून बाहेर पडू ,त्याशिवाय मार्ग नाही ."
बहिर्जी राजाराम महाराजांना खांद्यावर घेऊन शत्रूतून बाहेर पडला.
महाराजांबरोबर बाहेर पडलेल्या लोकांनी यात्रेकरूंचा, भिकाऱ्यांचा बैराग्याचा व्यापाऱ्यांचा वेष धारण केला
गुप्तपणे बाहेर पडून राज्यांनी बहिर्जी सह तुंगभद्रा पार केली.
ही घटना सुभान गड व हिरा या गावाजवळ घडली.
सर्व सेवा बहिर्जीने केली. नदीतीरी भोजन झाले.
मित्र नोकर चाकर ही सर्व कामे बहिर्जीने केली.
आशा रीतीने दोघांनी शत्रूच्या प्रदेशात वाटचाल केली .
राज्यास व बहिर्जीस शत्रूस ओळखता आले नाही.
बेदनुर मध्ये काही दिवस राज्यांनी गुप्तपणे काढले.
राजे अंबुर नावाच्या शहरात पोहोचले .
बाजी काकडे यांच्याकडे बहिर्जीस पाठवले .
बाजी काकडे राज्यांना आपल्या सैन्यासह येऊन भेटला.
राजे मराठ्यांच्या राज्यात आले होते .
नाना प्रकारची वाद्ये वाजली.
तोफांचे आवाज घुमले.
मोहोत्सव झाला.
राजा जिंजीस 28 ऑक्टोबर 1689 रोजी पोहोचला .
शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका व राजगडास आगमन ( राजाराम महाराजांची पन्हाळ्याहून सुटका जिंजीस आगमन) ,
बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली पावनखिंड (संताजी जगताप याने बंकापूर -हुबळी दरम्यान एकट्याने शत्रूस दिलेली झुंज व रुपसिंह भोसले याने तुंगभद्रे अलीकडे सुभान गड-हिरा या ठिकाणी दिलेली एकाकी लढत )
या घटनांची आठवण राजाराम महाराजांच्या जीवनप्रवासकडे बघितल्यावर आल्याशिवाय राहत नाही.
छत्रपतींच्या घराण्याशी निष्ठा,इमान, श्रद्धा ठेवुन प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या असंख्य अनामिकांना माझा प्रणाम !
No comments:
Post a Comment