# डाफळापूरचे चव्हाण उर्फ डफळे ##
postsaambhar:डॉ . उदयकुमार जगताप
महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची जी जी प्राचीन व माननीय कुळे आहेत त्यात प्रामुख्याने" चव्हाण उर्फ डफळे" हे कुळ होय .
या कुळातीळ पुरुषांचे आगमन महाराष्ट्रात केव्हा झाले व कसे झाले याची माहिती उपलब्ध नाही
. या घराण्यातील लोकांनी जी मर्दुमकी दाखवली आहे त्याने त्याच्या कुळाचे नाव अमर झाले आहे
प्रथम या कुळाने यवनांचे दास्य स्वीकारले नंतर यांनी स्वराज्याची सेवा केली ती ही स्वामी निष्ठेने स्वीकारली .
या घराण्यात केवळ पुरुषच न्हवे तर स्त्रियाही राजसिहासनावर विराजमान झाल्या व त्या राजकार्य धुरंदर निपजल्या .
" डाफळापूर "येथील वतनदार पाटील लखमोजी यलंदोजी चव्हाण हे या घराण्याचे मूळ पुरुष होत .
हे डाफळापूरची पाटीलकी करून शिलेदारी पेशाने राहत होते .
" शिलेदार" म्हणजे जो आपल्या सत्तेच्या घोड्यावर बसून धन्याची चाकरी
करतो तो "शिलेदार" आणि जो धान्याच्या घोड्यावर बसून चाकरी करतो तो
"बारगीर"
यांच्या पुत्रांनी दौलत मिळवल्यावर यांचे" चव्हाण "आडनाव लुप्त होऊन "डफळे" असे पडले .
डाफळापूरचे राहणारे म्हणून डफळे पडले .
गोत्र कश्यप, अथणी तालुक्यातील मौजे "रामतीर्थ" येथील" श्रीरामेश्वर "देव हे त्यांचे कुल दैवत आहे .
लाखमोजीस सटवाजी व धोंडाजीराव असे दोन पुत्र होते
ते शूर होते त्यांनी १६५० मध्ये फौज जमावली.
विजापूरच्या आसपास मुलखात स्वतंत्र सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला .
त्यामुळे विजापूरच्या बादशहाने बोलावणे पाठवले. जातेवेळी" चीनगी साहेब" या अवलिया फकीराची गाठ पडली.
त्याने"" तुम्हास दौलत व यश मिळेल "असा आशीर्वाद दिला
या सटवाजीच्या निशाणास काळा तुरा बांधला त्यामुळे डफळ्याचे" चीनगी साहेब" गुरु झाले .
त्याच्या शौर्यानें तो विजापुरच्या अल्लि आदिलशहाच्या नजरेस आल्यानें,
त्यानें त्याला नौकरींत घेऊन, जत, करजगी, बारडोल व हानवाड या चार
परगण्यांचें देशमुखीवतन वंशपरंपरा जहागीर म्हणून दिलें
;सटवोजीने मर्दुमकी दाखवल्यांने बादशहाने त्यास दोनशे स्वरांची मनसब व वजिराचा हुद्दा दिला
आदिलशाही नष्ट झाल्यानंतर सटवोजीनें आपली जहागीर वाढविण्याचा उपक्रम केला,
तेव्हां औरंगझेबानें त्याला धरण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रथम सांपडला नाहीं.
मात्र त्याचा भाऊ धोंडजीराव सांपडला
. तेव्हां भावाच्या प्रमानें सटवोजी आपण होऊन औरंगझेबास भेटला व त्यानें त्याची नौकरी करण्याचें कबूल केलें.
सटवाजीस दोन पुत्र होते वडिलपुत्र बाबाजी राव व धाकटे खानाजीराव .
त्याचा मुलगा बाबाजी यास औरंगझेबानें आपल्या सैन्यांत नोकर नेमिलें
.
पुढें औरंगझेबानें १६९९ मध्ये सातारच्या किल्ल्यास वेढा दिला असतां व
मंगळाईच्या बुरूजास सुरूंग लावून ते उडला असतां, तटावर चढून याच बाबाजीनें
किल्ल्यावर स्वतःचे निशाण लावले
त्या बुरूजास "डफळे बुरुज" म्हणतात .
या लढाईतील जखमांमुळें डफळापुरास परत जात असतां बाबाजी हा वाटेंतच मरण पावला.
या कृत्यामुळें औरंगझेबाने खूष होऊन सटवोजीस जत व करजगी,व्हानवाड,बरडोल
या महालांची जहागीर व पंचहजारी मनसब दिली . सटवोजीनें "जत" ही आपली
राजधानी केली.
याच सुमारास त्याचा दुसरा पुत्र कान्होजी हा वारला.
त्यामुळें पुत्रशोकानें सटवोजी हा १७०१ त मृत्यु पावला.
यावेळीं कान्होजीची मुलें अज्ञान असल्यानें बाबाजीची बायको येसूबाई ऊर्फ आऊसाहेब ही कारभार पाहूं लागली.
शाहूमहाराज सुटून गादीवर बसल्यानंतर" सरकुली" येथील भोसले यांची कन्या येसूबाईउर्फ आऊबाई ही त्यांच्या आश्रयास राहिली.
ही बाई फार सच्छील असून (बेळगांव जिल्ह्यांतील) रामतीर्थ येथील रामेश्वराची उपासक होती.
लोकांची तिच्यावर भक्ती असून ते तिला पूज्य मानीत.
हल्लीं सुद्धां तिकडील भागांत तिला दुसरी अहिल्याबाई होळकर म्हणतात. तिला
मूलबाळ नसल्यानें तिच्या विनंतीवरून शाहूनें तिचा वडील पुतण्या यशवंत राव
यास गादीचा वारस कायम केलें (१७४४).
येसू बाईनें बाकीच्या तिघां
(रामराव, भगवंत, मुकुंद) पुतण्यांस तनखा तोडून दिला व यशवंतरावाच्या हातीं
कारभार सोंपवून (१७५४) थोड्याच दिवसांत ती उमराणी येथें वारली (१७५७).
डॉ . उदयकुमार जगताप
No comments:
Post a Comment