विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## पवार मलठणकर ##













## पवार मलठणकर ##

postsaambhar :डॉ .उदयकुमार जगताप

पवार हे कुळ फार पुरातन असून सर्वत्रास वंदनीय असेच आहे,
प्रमार (परमार)उर्फ पवार यांची माहिती नाही, असा व्यक्तीच विरळा.
"राजा विक्रमादित्य", "राजा भोज ," "राजा जगदेव पवार" याच घराण्यात उत्पन्न झाले
.ह्याच घराण्यातील एक शाखा कालांतरे करून धारेहून ,रेवा उतरून ,तापी उल्लंघन करून खान्देशी प्रांताकडून दक्षिणेत महाराष्ट्रात आले व ठाणे देऊन राहिले.
पुण्याचा ईशान्येस "मलठाण" म्हणून गाव आहे तेथील पाटीलकी "शिवाजी पवार "यांचेकडे होती,
शिवाजीला कृष्णाजी नावाचा एक पुत्र होता,
तो व त्याचे पुत्र बाबाजी ,रायाजी, केरोजी हे शिलेदार होते ,
बाबाजीचे पुत्र संभाजी व मालोजी हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे सरदार होते ,
संभाजीचे तीन पुत्र उदाजी, आनंदराव व जगदेवरराव हे शाहू महाराजांचे पदरी होते,
जगदेवराव पवार ,उदाजी व आनंदराव यांनी दयाबहादूर ऐंशी हजार फौज 350 तोफा घेऊन स्वराज्यावर चालून आला असता त्याच्याबरोबर फक्त पंधरा हजार फौजेनिशी लढाई केली
. जगदेवराव पवारांनी लढाईत दयाबहादूरच्या हत्तीवरील आंबरीत चढून त्याचे शीर छेदून त्यास खाली फेकले
.त्या लढाईत तलवारी, भाले,गोळ्या ,तिर लागून तिघांच्याही जखमांनी सर्व युद्धभूमी लालेलाल झाली ,
तोफा व सारा सरंजाम स्वराज्यात आणला
. "उदाजी पवार" हा असामान्य पुरुष झाला,
त्यास "सेनाखप्तसहस्त्र" असे म्हणत असत,
उदाजीचे व बाजीराव पेशव्यांचे वैमनस्य सुरू होऊन त्याने त्यास नजरकैदेत ठेवले, व त्याचा भाऊ आनंदराव यास सरदारकी दिली.
यास माळवा, व गुजराथ प्रांताच्या वसुलीच्या कामावर नेमले ,
तो' धारे'स जाऊन राहिला व त्याने तेथे संस्थान स्थापन केले
,वरील बाबाजी पाटलाचे मुलगे संभाजी व काळोजी हे शाहू महाराजांच्या पदरी सरदार होते,
पैकी काळोजीला कृष्णाजी तुकोजी जिवाजी आणि मानाजी असे चार पुत्र होते ,
पैकी तुकोजी व जिवाजी हे बाजीराव पेशवे यांच्याबरोबर सन1725 मध्ये माळव्यावर स्वारी करावयास गेले होते.
त्यावेळी जो प्रांत मिळाला त्यातून देवास ,सारंगपूर, अलोट व इतर मिळून 2,42,970 रुपये व वसुलीचे महाल ह्या उभयातास दिले,
हे "देवास संस्थान" उभय बंधूंना मिळाल्यामुळे प्रथम ते सामायिक होते .परंतु ते पुढे एकमेकात वितुष्ट आल्यामुळे त्यांनी मुलुख वाटून घेतला. परंतु पुढे वशजांच्या मनात एकत्र राहावे असे आल्याने अंमल एकच चालू राहिला व मानापमान ,वसूल वगैरे वाटून घेतला.
ह्या कुळाची धार ,देवास ह्या ठिकाणी दोन संस्थाने आहेत.
वाघ, वानखडे, निंबाळकर ,इंगळे धारराव ,धायबार,घुमरे,कर्हे कर,पाडभर, मगने, वागचवरे,परमडे, शेटे ,वाघमारे हे पवारांचे सगोत्रीय आहेत,
पवार हे सूर्यवंशी,
क्षत्रिय ,
देवक ढाल तलवारीचे
लाल निशाण वर जरी पटका त्यावर मारुती
कुलस्वामी कालभैरव आहे,
"पवार "घराण्याची गतवैभवाची साक्ष देत त्यांचा वाडा शिरूर तालुका ,मु पो. मलठाण, जिल्हा पुणे येथे उभा आहे,

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...