विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2020

## दळवी ##





## दळवी ##

दळवी हे कुळ विजापूरच्या दरबारी चांगलेच प्रसिद्धीस आले
हे मूळचे पवार त्याच्या एका पुरुषाच्या अधिपत्याखाली बरेच सैन्य असून त्याने पराक्रमाची शर्थ केल्यामुळे त्यास "दळवई- दळवी" असे म्हणू लागले.
बहुतेक सेनापतीस पूर्वी "दळवी "असे म्हणत असत , म्हैसूरच्या नंदराज्यास" दळवई" म्हणत .
जो दळाचा नायक को दळवी. मुरारराव या सरदाराच्या हाताखालचे अधिपत्य हे "बाजी दळवी" यांच्याकडे होते.
हे दळवी चंद्रराव मोरे यांच्या बरोबर बादशहाच्या आदेशाने जावळीस राहिले.
स्वतःच्या मर्दुमकीने मोऱ्यांची सत्ता जावळीवर स्थापन करण्यास दळवींनी जीवाचे रान केले.
मोरे यांनी संपूर्ण कोकण काबीज केला.
त्यावेळेस " शृंगारपूर" हे दळव्यां च्या अधिपत्याखाली आले,
मुराररावने तळ कोकणात शिरून निजामाचा प्रदेश बाजी दळव्यांना काबीज करायला सांगितला.
त्यांनी निजामाच्या सुभेदाराच्या पराभव करून बहुतेक कोकणचा प्रदेश काबीज केला,
यावर निजामाने चिडून त्यावर मोठी फौज पाठवली.
त्यांनी बाजी दळवीचा पराभव केला व त्यास ठार मारले .
त्यामुळे बाजींचे कुटुंब व इतर भाऊबंद शृंगारपूर सोडून इतरत्र कोकण किनारपट्टीवर पांगले ,
सध्या महाड तालुक्यात" विन्हेरे "येथे व "तळगाव" येथे दळवी येथे काही कुटुंबे राहतात,
सावंतवाडीकर भोसले यांच्या आश्रयानेही काही दळवी सावंतवाडी परिसरात राहू लागले .
तळगाव, पेंडूर, बाव, बांबोली आशा बारा गावात त्यांची सत्ता होती .
सावंतवाडीकर भोसले यांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जो तह झाला त्यानंतर वाडीकर सावंत व दळवी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंकित झाले,
हा छत्रपतींना अंकित होणारा "राम दळवी "
तळगावकार दळवी यांच्या पुरुषांनी अनेक मर्दुमकीची कामे सावंतवाडीकर भोसले यांच्या बरोबर केली ,
जावळी प्रांतातहीदेशमुख दळवी व ते तेथे इनामदार आहेत ,
विन्हेरे गावी दळवी खोत आहेत.
जानवलकर दळवी यांची माहिती उपलब्ध नाही,

## दळवी भोसले ##

हे मराठयांचे कुळही आपल्या सेनाधुरंदरत्वाने प्रकाशात आले.
हे मूळचे भोसले कुडाळच्या प्रभू देसाई यांच्याकडे सेनानायक होते,
त्यावरून त्यांना "दळवी "म्हणू लागले .
देवदळवी,
नागदळवी
दौलतदळवी
रघुनाथ दळवी हे सावंतवाडी दरबारात
उदयास आलेले दिसतात .
,सन1661 मध्ये आदिलशहा याचा "जसवंतराव दळवी" मंडणगड किल्ल्याचा किल्लेदार होता असा उल्लेख आढळतो .
दळवी घराण्याने कोकणात बरीच मर्दुमकी गाजवून वाडीकर भोसले यांची मनोभावे सेवा केली असे दिसते .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...