सिद्दी जौहरच्या भेटीला जाण्यासाठी जेव्हा शिवा काशीद तयार होत होते तेव्हा शिवरायांच्या डोळ्यात
पाणी आलं. तेव्हा शिवा काशीद यांनी महाराजांना
विचारलं,
"महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू?"
तेव्हा महाराज म्हणाले
"शिवा तू हा पोशाख परीधान
केला आहेस.
याचं
बक्षीस काय मिळणार माहीत आहे तुला?"
शिवा काशिद म्हणाले,
" होय राजे मला माहीत
आहे, शत्रूच्या वेढ्यात
गेल्यावर शत्रू मला खतम करणार आहे, पण
शत्रू मला मारताना शिवा काशिद म्हणून मला मारणार नाही, तर शिवाजी महाराज म्हणून मला मरायची संधी मिळत्येय राजे.
ही संधी सोडीन मी ??? "
सात जन्माची पुण्याई म्हणून शिवाजी महाराज म्हणून_मरतोय ह्यापेक्षा मोठं भाग्य ते काय.🙏🚩
किती सामर्थ्य आणि त्याग होता शिवा काशिद यांच्या बोलण्यात, एक दिवसासाठी
राजा व्हायला पण थोर पुण्याई लागते. शिवाजीराजेंसाठी मी हजार वेळा मरायला
तयार आहे, शिवाजीराजे कोणाला सापडणार नाहीत असे म्हणत आपल्या प्राणाची
आहुती देणा—या वीर शिवा काशीद यांचा आज पुण्यस्मरण दिन. वीर शिवा काशिद
यांना मानाचा मुजरा..
विनम्र अभिवादन.🚩🚩
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Saturday, 18 July 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
No comments:
Post a Comment