विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 July 2020

## एक होता राजा ## राजा भवानराव पंत प्रतिनिधी-------------------------3






## एक होता राजा ##
राजा भवानराव पंत प्रतिनिधी------------------------------3
postsaambhar :Udaykumar Jagtap

राज्याला एक राजपुत्र होता .त्याचं नाव होतं "आप्पा साहेब उर्फ अप्पा पंत " विलायतेत शिक्षण घेऊन आला . त्याला सर्व लोक वाकून नमस्कार करू लागले .बोटीतून उतरल्यानंतर सामोरे येणाऱ्यात त्याला लहानपणी" अरे पोऱ्या "म्हणून ओरडणारे मास्तरांनी त्याला लावून नमस्कार करू लागल्यानंतर तो धावला आणि ओरडून म्हणाला "पाठीचा कणा ताठ ठेवायचा आता स्वातंत्र्य येणार. लाचारी ,भीती जाणार. मास्तर तुम्हीच मला शिकवले, आणि हे काय ?" मास्तर शरमले म्हणाले "मला आवरले नाही,जुने संस्कार अजून डोकावतात "
औंधच्या आटपाडी भागातील लोक" सारा बंद "म्हणून औंधवर मोर्चा घेऊन आले . तरुण राजपुत्र घाबरून गेला . राज्याकडे गेला. राजा म्हणाला "ते दमून आले असतील ,त्यांना आधी जेवायला घाला . दुपारी ४ वाजता वाड्यासमोर जमू, बोलू ". आटपाडीचे ३२ गावे व गुणडाळ तालुक्यातील १६ गवे नेहमीच दुष्काळी. १० वर्षातून ७ वर्ष दुष्काळ .४वाजता राजा म्हणाला" इतके लांब कशाला आलात ?मला बोलावयाचे, मी आलो असतो, सर्वांचे कल्याण करावयाचे आहे .राजपुत्राशी बोला ठरावा . आपण सर्व मिळून संस्थानचा उध्दार करू ."लोकांचा विरोध मावळून गेला. सारा आसमंत" राजा भवानराव पंत प्रतिनिधी कि जय " म्हणून दुमदुमून गेला. राजपुत्र शिकायला इंग्लंडला असताना त्याचे मॉरिस, राल्फ, ऍव्हेलीन म्हणून मित्र झाले. ते राजपुत्राच्या मदतीसाठी औंधला आले .त्यांनी औंधचा राज्यकारभार लोकांच्या हाती सोपवण्याचा मसुदा तयार केला . राज्याने राजपुत्रास महात्मा गांधींची भेट घेऊन मसुदा दाखवण्यास सांगितला . महात्माजींनी राज्याला भेटीचे आमंत्रण दिले . गांधीजी म्हणाले" औंधमध्ये स्वतंत्र अशी पूर्ण स्वायत्त खेडी निर्माण झाली पाहिजेत. औंध मधील सर्व राजसत्ता, दिवाण, पोलीस व सर्व अधिकारी वर्ग व त्यांची कामे औंधच्या खेड्यातच खेड्यातील लोकांनी आपली उन्नती करण्याकरिता स्वतः केली पाहिजेत . तज्ञ सल्ला औंधमधून जरूर तेंव्हा मिळण्यासाठी व्यवस्था करावी . राज्याने हे सर्व कसे चालले आहे, कोठे चुकते आहे, हेच पाहावे . राज्याला सूचना देण्याचा अधिकार, सल्ला देण्याचा अधिका,र अधिकार स्वतः वापरणेचा नाही " राजा म्हणाला "बापूजी ,गेली ३५ वर्ष मी औंधच्या प्रजाजनांना स्वावलंबी व सुसंस्कृत करण्याचे व्रत पळत आलो आहे . माझी प्रजा ही माझीच मुले आता रांगू लागली आहेत ,मी मांडीवर घेऊन बोळ्याने दूध पाजण्यात काय अर्थ? सर्व मसुदा तयार आहे . तुमच्या आशीर्वादाने तो अमलात येईल " . राजा मुंबईला पोचतो तो हिंदुस्थानमधील सर्वच वृत्तपत्रांनी" औंधचा राजा महात्माजींना भेटला, सर्व अधिकार प्रजेला" असे सेवाग्रामचे वृत्त छापले . आटपाडी जवळ एक डबई वई नावाचे कुराण होते भला मोठा ओढा आटपाडीतून माण नदीला मिळतो . डबई कुरणाला बांध घालून हजारो एकर जमीन बागायती करण्याचे स्वप्न राजाला पडू लागले . औध तिजोरीत शिल्लक शून्य मग श्रमदानातून धरण बांधण्याची क्लुप्ती मॉरिस साहेबांची . त्यांच्या आग्रहावरून राज्याने स्वतंत्रपूरला औंधच्या तुरुंगातील कैदी पाठवले .स्वतंत्रपूरला तुरुंग नाहीच . कैद्यांवर मॉरिस साहेबांचे सहवासाचे संस्कार तेथे आलेले कैदी एक दोन वर्षात नवीन जन्म घेऊन पुन्हा समाजात जात . एका नव्या प्रकारच्या तुरुंगाचा प्रात्यक्षिक व प्रकार हिंदुस्थान मध्ये औंध येथे सुरु झाला. (open jail) राजा एक दिवस "खरसुंडी" येथे खंडोबा या देवस्थानच्या जवळ असलेल्या खेडेगावात गेला होता. गावाची लोकसंख्या १००-२०० . सर्वच गाव मुसलमानांचा एकही हिंदू घर नाही . सर्व खंडोबाचे वतनदार . खंडोबाच्या खरसुंडीच्या जत्रेला" शासने "नेण्याचा त्यांचा अधिकार. शासने म्हणजे १०-१२ फूट लांबीचे खांब हि शासने म्हणजे खंडोबाचे भाले . जत्रेच्या वेळी हि शासने बाहेर काढून त्यांची मिरवणूक काढली जाई . पीक पाण्याबद्दल विचारपूस झाल्यानंतर काही अडचण आहे का? म्हणून विचारल्यावर" महंमद भाई "धीर करून बोलले" गावात मारुतीचे मंदिर आहे . आज पर्यंत" पेट "खात्यातून १२ रुपये पूजेकरिता मिळत होते . हि नवीन राज्य घटना आल्यापासून पैसे आले नाहीत. आम्ही पूजा कशी करायची "हा तो औंध संस्थानचा आपलेपणा .असं सध्या लोकांचं साधं संस्थान .. पुढे क्रांतीवीर गौरी सिंह ,के. डि . पाटील,नागनाथ नायकवडी नाना पाटील, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा अण्णा कुंभार या क्रांतीकारकांना राज्याने मदत केली . गेसफोर्ड या अधिकाऱ्याने राजपुत्राला कोल्हापूरला बोलावून घेतले व त्यांना खडसावू लागला. "दिल्ली वरून रिपोर्ट आला आहे. तुम्ही या गुंड लोकांना भेटता. त्यांच्या सभेला हजर राहता .असा रिपोर्ट आहे. वीस हजार रुपयांचे ज्याला पकडून देण्याबद्दल बक्षीस जाहीर झाले आहे अशा नाना पाटलाला कुंडल मध्ये आसरा देता .पटवर्धन ,असफ अली, जयप्रकाश नारायण याना तुम्ही भेटता"
. राजपुत्र बोलला "हो मी भेटतो .काही झाले तरी माझी हाडे हिंदुस्थानातच पुरली जाणार .माझा आणि तुमचा दृष्टिकोन वेगळा . ब्रिटिश सरकारला माझी वागणूक पसंत नसेल ,तर मला औंध सोडण्याचा हुकूम तुम्ही देऊ शकता. अथवा अटक करून तुरुंगात ठेवू शकता ." राज्याने औंध संस्थानात जी लोकराज्ये गावागावातून बसवली व त्यांना लोकशाही कार्यक्षमतेने चालवण्यास तयार केले. अशी लोकशाही सर्व हिंदुस्थानात खेडी तयार झाली असती तर खऱ्या खुऱ्या लोकशाहीचा भक्कम पाया घालता आला असता . राजपुत्राचे पुढे लग्न झाले. एका डॉक्टर नलिनी बरोबर ज्याFRCS सर्जन होत्या . १५ ऑगस्ट १९४७ मोठ्या प्रेमाने आदराने श्रद्धेने राज्याने साजरा केला . गावातील अंबाबाईच्या देवळासमोरील ४५० वर्षाची भव्य सुंदर दीपमाळ सुशोभित दिव्यांनी केली होती रात्री १२ वाजता आंबाबाईची दीपमाळ राज्याने प्रज्वलित केली . लोकांनी टाळ्यांनी स्वागत केले वीजांचा कडकडाट होऊन औंधात जोराचा पाऊस पडला व व जुने सारे धुवून गेले . . काळाच्या जबड्यात गडप झाले . विलीनीकरणाच्या कागदावर राज्याने सही केली राजा ७८ वर्षाचा झाला होता . तो औंध संस्थानचा शेवटचा राजा होता . ३१५ वर्ष पंत प्रतिनिधींच्या औंधच्या राजवटीचा शेवटचा राजा होता . राजपुत्र नंतर राजदूत झाला. एक दिवस राजपुत्राला फोन आला . राजा आजारी पडला आहे. राजपुत्र आला राजा त्याला म्हणाला "तुझ्या मुलाला मला पाहायचे आहे घेऊन ये " राज्याने मुलाकडे दोन मिनिट बघितले आणि म्हणाला" जय जगदंबा ! " १३ एप्रिल १९५१ ला सकाळी राज्याने देह सोडला .

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...