#वीर_राणोजी_घोरपडे 🚩⚔️🚩 सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे पुत्र राणोजी घोरपडे.🚩
" मुघल पन्हाळ्याला थोडीथोडकी नव्हे तर
तब्बल ९ वर्षे वेढा घालून बसले होते पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही
दाद देत नव्हते. औरंगजेबाने आपले एकाहून एक सरस उमराव पन्हाळ्यावर रवाना
केले होते पण या पैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाहीत. किल्ल्यातून
मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री-अपरात्री
गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार
होत असत. गडावरच्या मराठयांना बाहेरून सुद्धा मदत मिळत असे. धनाजी
जाधवांच्या आणि हिंदुराव घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या
आसमंतातील मुघली फौजेला हैराण करून सोडले होते.
पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे.
या युद्धात राणोजी घोरपडेनवर जबाबदारी होती ती मुघली रसद मारण्याची आणि
त्यांनी ती चोख बजावली. राणोजी घोरपडे शिपाईगिरित आपल्या वडलांच्या पुढेच
होते असे काही इतिहासकार लिहितात.
१७०२ च्या सुमारास मुघली फौजेशी सामना करताना वीर राणोजी घोरपडे धारातीर्थी पडले.,
वीर राणोजी घोरपडे यांना अखंड मानाचा मुजरा
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment