postsaambhar :DrPramod Bankhele
सुभेदार मल्हारराव होळकरांची आणि त्यांची खंडाराणी हरकुबाई साहेब -(जन्म-1721-मृत्यू 20 मे 1766)काही ठिकाणी त्यांचा हरकुंवर बाईसाहेब असा उल्लेख मिळतो त्या सिरवि/काही ठिकाणी सिरोहीच्या चौहान घराण्यातील होत्या .
होळकरां विषयी माहिती आमच्या भागासंदर्भातील इतिहासाच्या दृष्टीनं रोचक आहे.
होळकर घराण्यात , सुभेदार मल्हारराव (पाहिले) यांच्या निधनानंतर हरकुबाइंचाअहिल्यादेवींनी खूप मोठा आधार वाटत होता,सुनबाई अहिल्यादेवी या सासूबाई हरकुबाईसाहेबांहून फक्त ४ वर्षानीं लहान, अहिल्यादेवींच्या कुटुंबात झालेल्या लागोपाठ मृत्यु, सती च्या दुःखद घटनांची मालिकाआणि कौटुंबिक वाद या पार्श्वभूमीवर एका लेखकाचा उल्लेख असा आहे-'रक्ताची सर्व नाती निखळून पडल्यावर बाईंना जवळची वाटणारी माणिके म्हणजे हरकुबाईसाहेब,नणंद उदाबाई वाघमारे आणि तुकोबादादा" हरकुमावशी या नावाने पत्रात त्यांचा उल्लेख येतो,अहिल्यादेवींना सल्ला देणं (पुण्यास पाठवलेल्या एका पत्रात जे पत्र नारो गणेश आणि तुकोजीबाबा अहिल्यादेवींनी न भेटता गेले त्या बाबत पत्रातील संदर्भित उल्लेख-अहिल्या देवी लिहितात--"हरकू बाई मावशी बोलल्या की श्रीमंतांनी घरात अशी फूट पडू नये"-त्याच पत्रात पुढे"-हरकू बाई मावशी म्हणालयात की होळकारात आणि शिंद्यात अशी फूट पडू देऊ नये"-- ) राज्यकारभारात आणि कौटुंबिक बाबीत मदत हे पाहता अहिल्यादेवींच्या मनातील हरकुबाईसाहेबांचे स्थान या पत्रात स्पष्ट दिसत.
सुभेदार मल्हार राव व मातोश्री श्रीमंत गौतमी बाईसाहेब यांना उदाबाई (होळकर-वाघमारे) आणि संतुबाई(होळकर-लंभाते) या कन्या. श्रीमंत उदाबाई यांचा विवाह खडकी तर्फ महाळुंगे (आत्ता ते खडकी- पिंपळगाव या नावाने ओळखतात मंचरहून 6 -7 कि.मि.आहे) येथील मातब्बर वाघमारे पाटील यांच्या घराण्यातील रा.मनाजीराव वाघमारे पाटील यांच्यासोबत 1733 च्या दरम्यान झाला.खडकी तर्फ महाळुंगे येथेच उदाबाई आणि मनाजीजीराव या आपल्या मातृपितृ स्मृतिसाठी पुत्र अवचित राव वाघमारे पाटील यांनी छत्र्या बांधल्या अगदी अहिल्यादेवींच्या काळातील शिल्पवैभवाला साजेसा घाट ही बांधला, छत्री आणि घाटाकडे जाणाऱ्या कमानीवर त्यांचे मराठी/ संस्कृत मिश्र बाळबोध मध्ये शिलालेख आहेत.त्यात शके १७११ मध्ये ही कामे केल्याचा उल्लेख आहे.मंदिरे बांधली विरोबाच मंदिर लक्षणीय आहे ,थोडं गावाबाहेर आहे ,गावातील मंदिरात विरोबा/विरभद्राची देखणी पितळी मुर्ती आहे, महादेवाच्या मंदिरासमोरील नंदी खूपच सुंदर आज,हे खडकी तर्फे महाळुंगे आणि मंचर (इथेही होळकरांचा जुना वाडा होता आता फक्त भिंती आहेत) वाफगाव ,पाबळ, लाखंणगाव(इथेही सुंदर मंदिर आणि वाडा आहे सुस्थितीत) ही होळकरांकडेच होती. नंतर ब्रिटिशांनी मराठा राज्य गिळल्यावर ही 1827 मध्ये कॅप्टन क्लुन्स मंचर बाबत लिहितो की "हे गाव होळकरांकडे च असून या गावात--"पुढे सांख्यिकी माहीत आहे.
पुढे 1868-69 मध्ये मंचर आणि परिसरही ब्रिटिशांना अदलाबदली मध्ये होळकरांकडून मिळाला( पुणे गॅझेट)
नक्की याबद्दल काय तह झाला होता याची माहिती मिळाली नाही.खडकी तील काही फोटोग्राफ इथे देतो--
#जागर इतिहासाचा#अहिल्यापर्व
पुढे 1868-69 मध्ये मंचर आणि परिसरही ब्रिटिशांना अदलाबदली मध्ये होळकरांकडून मिळाला( पुणे गॅझेट)
नक्की याबद्दल काय तह झाला होता याची माहिती मिळाली नाही.खडकी तील काही फोटोग्राफ इथे देतो--
#जागर इतिहासाचा#अहिल्यापर्व
No comments:
Post a Comment