विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

अहिल्याबाई होळकर #अन्नछत्र (लोणार,)


अहिल्याबाई होळकर
#अन्नछत्र (लोणार,)
postsaambhar:Varsha Mishra
सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतभर लोककल्याणकारी कार्य फक्त अहिल्याबाईनीच केली..... अहिल्याबाई चे राज्य कालौघात नष्ट झाले परंतु त्यांनी भारतात ऊभे केलेले #धर्माचे राज्य आजही त्यांच्या कार्य रूपाने टिकून आहे... हिंदू धर्मशास्त्रात तिर्थयात्रा करणे हे महत्त्वाचे काम मानले जाते. त्या काळात प्रवासाची साधने मर्यादित होती. राजे,संस्थानिक, धनिक, मध्यम वर्गीय व सामान्य आपआपल्या परीने तिर्थयात्रा करीत असत. धर्मशाळा दान,एक काम्य दान,प्रवासी लोकाचा प्रवास सुखावह व्हावा यासाठी धर्मशाळा बांधुन व आवश्यक त्या सोयी ऊपलब्ध करून ती धर्मशाळा दान करणे याला 'धर्मदान' म्हणत होते. भविष्य पुराणात सांगितले आहे की दोन अनाथ अशा लोकांची राहण्याची सोय करणार्या माणसाला आणखी काही दानधर्म करायला नको, धर्मशाळा ने त्याला मोक्षप्राप्ती होते. तिर्थयात्रा, पिंडदान ला जाणाऱ्या भाविकांची, यात्रेकरूंची त्याकाळी तिर्थक्षेत्री गैरसोय होते ही बाब लक्षात घेऊन अहिल्याबाई नी संपूर्ण भारतात धर्मशाळा बांधल्या, धर्मशाळेच्या व्यवस्थेसाठी कायम स्वरूपी खर्च लावून दिला. बर्याच धर्मशाळेत अन्नछत्र व सदावर्ते चालू केलीत त्यापैकी च एक लोणारच"े अन्नछत्र" एक मजली १०८ दगडी खांब असलेले (१००×५० फुट ) ओवर्या, मोठा परीसर व बाजूला स्थानिक दानशूरने बाधलेली 'धर्मशाळा' आहे. अन्नछत्र आता भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे... पण माझे गाव अहिल्याबाईच्या पायधुळीने पवित्र झाल्याचे अन्नछत्राचे लेणं अभिमानाने घेऊन ऊभे आहे.....
#अहिल्यापर्व
#जागरइतिहासाचा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...