विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

#अहिल्यापर्व

#अहिल्यापर्व
postsaambhar :अमर मोरे
अहिल्याबाईंना जातीव्यवस्था मान्य नव्हती. माणसा - माणसात फरक त्यांनी कधी केलाच नाही. अचानक एके दिवशी सरदार व प्रजेला आपल्या दरबारात अहिल्याबाईंनी बोलविले आणि जाहीर केले, "राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या व प्रजेची लूट करून त्यांना त्रास देणाऱ्या चोर, लुटारू व दरोडेखोरांचा आपल्या पराक्रमाच्या जोरावर जो बंदोबस्त लावेल त्या शूर, धाडसी आणि चतुर पुरुषाशी मी माझ्या राजकुमारीचा विवाह करीन." त्याक्षणी एक युवक पुढे आला आणि त्याने जबाबदारी स्वीकारली. त्या युवकाला सैन्य, शस्त्रे अहिल्याबाईंनी दिली आणि त्या युवकाने लुटारूंचा बंदोबस्त केला. शांतता प्रस्थापित करणारा उमदा युवक यशवंतराव फणसे हा होता. अहिल्याबाई वचनाच्या पक्क्या होत्या. अहिल्याबाईंनी यशवंतराव फणसेच्या जाती-धर्माचा विचार न करता रोटी-बेटीचा विचार न करता प्रजेच्या सुरक्षिततेसाठी विवाहाचा निर्णय घेतला होता. याचवेळी प्रथा परंपरेला जबरदस्त धक्का बसला. आंतरजातीय विवाहाबाबत फक्त उपदेशाचे डोस समाजाला देत बसण्यापेक्षा आहिल्याबाईंचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे उदाहरण बनणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळातही माता- पिता आपल्या मुला-मुलींचा आंतरजातीय विवाह करण्यास तयार होणे अशक्यच आहे. मात्र अहिल्याबाईंनी त्याकाळी असा विवाह करून समाजापुढे मोठा आदर्शच ठेवला आहे.
#अहिल्यापर्व #जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...