postsaambhar :डॉ उदयकुमार जगताप
मराठ्यांच्या राज्यकारभारात खेड्यातील प्रशासन व्यवस्था ग्रामपंचायती कडे असे . माधवराव पेशवे यांच्या काळात पुण्याचे महत्व वाढले.
ह्या शहराच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र कोतवाल म्हणजे पोलीस अधिकारी नेमण्यात आला .
बाळाजी नारायण केतकर यास माधवराव पेशव्यांनी 18 फेब्रुवारी 1764 रोजी पुणे शहराच्या व्यवस्थेवर नेमून "बाळाजी जनार्दन फडणीस (नाना)सांगतील असे करीत जाणे "असा हुकूम दिला . कालांतराने कोतवालाकडे बंदोबस्ताशिवाय शहरातील लहान गुन्हे, चोऱ्या, व्यभिचार, मद्यपान ,जुगार, यासारखे गुन्हे ,बाजाराची व्यवस्था ,वाद्य, वेश्या ,हजाम यांची देखरेख .
शहर स्वच्छता ,रस्ते, इमारती , पाहुण्याचा सत्कार ,दानधर्म, दस्त ऐवज नोंदणी अशी कितीतरी कामे कोत्वालाकडे नाना फडणवीस यांच्या काळात आली.
त्यामुळे कोतवाल शहराचा मुख्य व महत्वाचा अंमलदार बनला .
बाळाजी नारायण केतकर यांच्या नंतर बाबुराव राम ,जनार्दन हरी धोंडो बाबाजी व आनंदराव काशी असे कोतवाल झाले. त्यानंतर "घशीराम कोतवाल" याची कोतवाल पदावर नेमणूक8 फेब्रुवारी 1777 रोजी नानांनी केली .
त्याचा निघृण अंत 31 ऑगस्ट 1791 मध्ये झाला . घाशीराम सुस्वरूप बुद्धिमान व भाषणात चतुर होता.
मन आकर्षीत करणारा होता.
नाना त्याचा उपयोग फितुराच्या, राघोबादादाच्या ठिकठिकाणच्या बातम्या गुप्त रीतीने आणण्याच्या कामी करू लागले.
किंबहुना याच बातम्यांवर त्यांचा मुख्य कारभार पंधरा वर्षे चालू राहिला .
त्याच्या काळात लोकांवर कित्येक अन्याय झाले .
परंतु त्याने शहरात सुधारणा करून व्यवस्था राखली.
यात संशय नाही.
त्याच्या गुप्त हेरकडून मिळणाऱ्या बातम्यांवरून नानांनी फ़ंद फितुरी दाबात ठेवली होती .
नाना त्यास वेळोवेळी बक्षिसे देऊन त्याची प्रशंसा करीत. निर्दयपणे त्याने पुण्याचा कारभार केला म्हणून "घाशीरामी कारभार" असे बदनाम कारभारास नाव प्राप्त झाले .
घशीरामाच्या कारकिर्दीत 25 तेलंगी ब्राह्मण पुण्यास आले होते.
ते आपल्या देशास जाण्यास निघाले असता त्यास घशीरामाच्या शिपायांनी पकडून आणून भवानी पेठेतील चावडीत खणाचे भुयार होते त्यात कोंडले. कोंडमारा होऊन 21 जण मृत्युमुखी पडले.
नानाजी फाकडे यांच्या निदर्शनास ही बाब आली त्यांनी पेशव्यांच्या कानावर ही गोष्ट घातली .
कोंडून ब्राह्मणांना मृत्यू आला ही बाब पुण्यात वाऱ्यासारखी पसरली .
पेशवे वाड्यासमोर सारे लोक जमा झाले
घाशीरामाला हत्तीच्या पायी देऊन ठार मारावे अशी मागणी लोक करू लागले.
घाशीरामाने सांगितले की हे लोक शहारात चोरी करत होते .
सबब त्यांना धरून आणून ठेवले असता त्यांनी अफू खाऊन प्राण दिला.
त्यांना मूठमाती देण्याची परवानगी नानांनी दिली व अय्याशास्त्री यांनी चौकशी केली .
त्यात घाशीराम दोषी ठरले,
त्यांच्या मुसक्या आवळून गारद्यांच्या पहाऱ्यात ठेवले. त्यास हत्तीच्या पायी द्यावे असे समस्त ब्राह्मणांनी आग्रह धरला.
तेव्हा त्यास हत्तीस बांधले व शहरातून फिरते वेळेस लोकांनी त्यास दगड मारले. तेणे करून त्याचे डोके फुटले तरी लोक शांत होईनात.
शेवटी दुसऱ्या दिवशी 31 ऑगस्ट 1791 रोजी त्यास उंटावर बसून गारपिरावर नेऊन सोडण्यात आले. लोकांनी त्यास धोंडे घालून मारिला.
" अद्यापि शरीर कोतवालाचे पडले आहे नदीत टाकिले नाही "असे मिरजकाराच्या वकिलांचे पत्र आहे. कोत्वालाच्या दिवाणास बेड्या घातल्या.
कोतवालाच्या घराची जप्ती करून दोघा लेकास बेड्या घातल्या .
आशा रीतीने कोतवालाचा शेवट झाला .
No comments:
Post a Comment