## रामराजा ##
postsaambhar :डॉ उदयकुमार जगताप
राणी ताराबाईचे पुत्र शिवाजी दुसरा त्याची बायको भवानीबाई हिचेपासून
रामराजा झाला . शिवाजी राजे 1726 मार्च 24 मध्ये देवी रोगाने वारले .
त्यानंतर रामराज्याचा जन्म पन्हाळा गडावर जून 1726 मध्ये झाला,
त्यावेळी कोल्हापूर संस्थानावर ताराराणीची सावंत राजसबाई यांचे पुत्र
संभाजी राज्य करीत होता, आपल्या मुलाच्या जीवास धोका आहे .म्हणूंन मुल
मेल्याचे जाहीर करून या मुलास खाजगी चौकीचा घाशीराम नावाचा राजपूत होता
त्याच्या बायकोच्या स्वाधीन केले .
त्याच्या बायकोचे मूल वारले होते .
चौकीच्या राजपुतांचा हिशेब करून गावास रवाना केल्याचा बहाणा केला ,
रामराज्यास रात्री जास्त अफू दिलीत्यामुळे त्याचे चलनवलन राहिले
दोन घटिका रात्री मूल वारले म्हणून रडारड होऊन मूल राजपुतांचा बायकोकडे स्वाधीन केले .
काकासाहेब भोसले जिंतिकर या वेळेस हजर होते,
त्यांनी मूळ पुराव्यास जातो म्हणून राजपुतांचा घरी मुलास पोहोचवले .,
राजपुतांचा बायको मुलास घेऊन बावड्यास अमात्यांकडे गेली .
तेथे अमात्यांनी पाच वर्षे मुलाचा सांभाळ केला,
हे वृत्त जिजाबाई हिस कळले.
त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी त्याने राजपुतांचा बायकोकडे रामराज्यास दिले.
पुढे ती त्याला कोकणात घेऊन गेली .
तेथे तो दोन वर्षे होता. राजपुतांची बायको वारली म्हणून त्याने त्याची
थोरली बहीण कृष्णाबाई निंबाळकर ही बार्शीपासून जवळ असलेल्या पानगाव येथे 17
फेब्रुवारी 1745 मध्ये तिच्या सुपूर्द केले
तेथे रामराजा अज्ञातवासात वाढला ,
छत्रपती शाहूंनी त्यास गादीवर बसवण्याचा विचार 1745 दरम्यान केला असावा
कारण शाहू महाराज खनवटे, मुंगी, शिंगणापूर, हिंगणी या ठिकाणच्या बाबाजी
भोसल्यांच्या वाशांपैकी दत्ताकाचा विचार करीत होते , ताराराणीने रामराजा हा
माझ्या शिवाजीचा पुत्र असल्याचे सांगितले व बाजीराव अमात्य याना बोलावून
रामराज्याची खात्री करण्यास सांगितले , त्यास व ताराराणीस एक ताटात
दूधभात खाण्यास लावले व खात्री झाली छत्रपती शाहू म्हणाले ,"आमच्या मागे या
मुलास धनी करून त्यांचे आज्ञेत राहावे "
, 15 डिसेंबर 1749 रोजी शाहू महाराज निधन पावले त्यांच्या इच्छे नुसार 4 जानेवारी 1750 रोजी रामराज्याचे राज्यारोहण झाले ,
अगोदरच सुरवातीचे जीवन अज्ञातवासात गेल्याने अनेक गुंतागुंतीचे प्रश्न
सोडवणे त्यांना अवघड जाऊ लागले , सरदारांचे हेवेदावे ,शत्रूचे डावपेच हे
समजून निर्णय घेणे अवघड जाऊ लागले,
रामराज्यानी सदाशिवराव भाऊ पेशवे
यांचे बरोबर सांगोल्यावर स्वारी करून सांगोला ताब्यात घेतले व
पेशव्यांबरोबर 25 डिसेंम्बर 1750 मध्ये तह झाला.
त्यामुळे सर्व सत्ता पेशव्यांकडे गेली व छत्रपती नामधारी राहिले रामराजे पेशव्यांच्या तंत्राने वागू लागले .
हे पाहून ताराराणीस खूप चिड व संताप आला,
त्यानी रामराजास सिहगडावर बोलावून कैद केले ,
रामराजे नंतर ताराराणीचे कैदेत राहिले .
हा रामराजा छत्रपतींच्या वंशाचा नाही असे नंतर ताराराणी म्हणू लागली,
पेशव्यांनी छत्रपतींना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ताराराणीपुढे त्यांचे
काही चालले नाही
व त्यांचा अपमान होईल दुखावले जाईल म्हणून त्यांनी तसे केले नसावे,
9 डिसेंम्बर सन 1761 मध्ये ताराराणी निवर्तल्या, माधवराव पेशवे यांनी या रामराज्यास सढळ हाताने मदत केली ,
रामराज्यास पुत्र झाला नाही . त्यांचा मृत्यू 11 डिसेंम्बर 1777 रोजी सातारा येथे झाला ,
त्यांच्या मागे तीन कन्या व दुर्गाबाई उर्फ तुकाबाई (ही शिर्के यांच्या
घराण्यातील होती )व सगुणाबाई(बुऱ्हाणजी मोहिते या सरदाराची मुलगी होती)ही
आशा दोन राण्या उरल्या , राणी सगुणाबाई हिच्या मांडीवर वावीकर भोसले
यांच्या पैकी विठोजी यास दत्तक देऊन त्याचे नामकरण शाहू महाराज दुसरे असे
केले,
No comments:
Post a Comment