विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 July 2020

## छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असलेले शूर मुस्लिम सरदार ## ## सरदार सिद्दी हिलाल ##





## छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असलेले शूर मुस्लिम सरदार ##
## सरदार सिद्दी हिलाल ##
postsaambhar:Udaykumar Jagtap
शिवाजी महाराजांवर बलोलखानानेच स्वारी करावी , असे विजापूरच्या दरबारात ठरले . खानाला वस्त्रे ,शस्त्रे ,चार घोडे आणि हत्ती बहाल करण्यात आले . महाराजांवर स्वारी करण्यास बलोलखान मोठी फौज घेऊन निघाला . तो बादशहास कुर्निसात करून निघाला. १एप्रिल १६७३ मध्ये महाराज परळीचा किल्ला काबीज करून पन्हाळ्यालाआले होते . सभासद आपल्या बखरीत म्हणतो" पुढे विजापूरहून अब्दुल करीम बेलोलखान बारा हजार स्वारांनिशी इकडे चाल करून आला . तो फौजेनिशी हिकडे चालला .हि खबर राजियास कळोन कुल लष्कर प्रतापराव यास हुकूम करून आणविले . आणि हूकूम केला कि"विजापूरचा बलोलखान एव्हडा वळवळ बहुत करीत आहे . त्यास मारून फत्ते करणे " "म्हणून आज्ञा करून लष्कर नबाबावरी रवाना केले. त्यांनी जाऊन नबाबास उंबराणीस गाठले . प्रतापराव गुजर यांच्या बरोबर विठ्ठल पिलदेव अत्रे ,आनंदराव मकाजी , कृष्णाजी भास्कर विसोबा बल्लाळ , कृष्णाजी भास्कर ,विठोजी शिंदे ,दीपाजी राऊतराव आणि सिद्दी हिलाल हे सरदार होते . सभासद पुढे म्हणतो ,"चौतर्फा राजियांचा फौजेने कोंडून उभा केला . पाणी नाही .असा जेर केला." प्रतापराव यांनी खानाच्या फौजेस होणार पाणीपुरवठ्याचा तलाव सिद्दी हलाल यास घेण्यास सांगितले . हिलालने पाणीपुरवठा ताब्यात घेतल्याने खानची पंचाईत झाली. सभासद पुढे म्हणतो ". युद्ध थोर जाहले. इतक्यात अस्तमानही झाला. मग निदान करून नबाब पाणियावरी जाऊन पाणी पिला . त्यावरी त्याने प्रतापराव सरनोबत यास अंतस्थ कळविले कि ,"आपण तुम्हांवरी येत नाही, पादशाहाच्या हुकुमाने आ,लो याउपरी आपण तुमचा आहे .हरएक वक्ती आपण राजियांचा दावा न करी" .ऐसे कितीएक ममतेचे उत्तर सांगून" सला " केला . मग राजियाचे लष्कर निघोन गेले ." प्रतापराव गुजरानी खानास सोडून दिले . सुमारे १५ एप्रिल १६७३. राजांना खानाला सोडून देणे आवडले नाही. त्यांनी प्रतापराव गुजर याना निरोप दिला त्याचे वर्णन सभासद करतो ," "राजियास खबर कळून लष्करास ताकीद फजित केले कि "सला काय निमात्य केला ?असे रागास आले . पुढे प्रतापराव फौजेनिशी मोगलाईत भागानगरचा देश ,देवगड ,रत्नागिरी ,बाजे देश मारून लुटून माघारे आले . त्याजवर मागती विजापुराहून बेलोलखान पन्हाळे प्रांतास पातशाहानी रवाना केला . तो सदर प्रांतात आला . त्याजवर राजियास कळलें कि, बलोलखान मागती आला आहे. मग राजे म्हणू लागले कि," हा घडोघडी येतो, याकरिता मागती प्रतापराव यास पाठवले ,"तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बलोलखान येतो . याशी गाठ घालून बुडवून फत्ते करणे, "नाहीतर तोंड न दाखवणे " ऐसे प्रतापराव यास निक्षून सांगून पाठवले . त्यावरी प्रतापराव जाऊन बलोलखानाशी गाठले . . नेसरीवरी नबाब आला. ""नेसरी" हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगल तालुक्यात आहे . सभासद म्हणतो ",त्याने गाठले . " बहलोल खानाकडे सैन्य होत१७०००. आणि प्रतापराव गुजरांकडे सैन्य होत.फक्त १२०० . इतक्या कमी सैन्याने आपण खानाचा पराभव करू शकणार नाही. आणि यामध्ये आपल्या सैन्याचा पराभव होईल, हे प्रतापराव गुजरांच्या लक्षात आले . आपल्या बरोबर आपले सैन्य कापले जाईल . म्हणून आनंदराव मकाजीस मागे ठेवून , त्यांनी फक्त ६ सरदार बरोबर घेतले . दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४ . जे सहा सरदार होते त्यात होता" सिद्दी हिलाल " . या सहा जणांना घेऊन व स्वतः प्रतापराव गुजर असे सात जण नेसरीच्या खिंडीत घोड्यावरून बहलोल खानावर वेगाने चालून आले . आणि सुमारे१७००० सैन्यात शिरले . खानाचे सैन्य कापून काढले. . अशा प्रकारच्या आत्मघातकी हल्ल्यासाठी हे सरदार तयार कसे झाले ? याचे आश्चर्य वाटते .प्रतापराव गुजरांच्या बरोबर मरण्यास तयार झालेल्या इतर सहा जणांना बघून खान व त्याची फौज आश्चर्यचकित झाली . जगाच्या इतिहासात अशा प्रकारच्या आत्मघातकी हल्ल्याचे वर्णन इतरत्र कोठेही सापडत नाही. सर्वांच्या सर्वजण धारातीर्थी पडले . सभासद या लढाईचे वर्णन करतो ,"मोठे युद्ध झाले . अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीच्या वाराने ठार झाले." . "रण बहुत पडिले." रक्ताच्या नद्या चालल्या." ". त्याजवर बलोलखान विजापुरास गेला आणि राजियाचे लष्कर पन्हाळ्याखाली आले . "" "प्रतापराव पडले हि खबर राजियानी ऐकून बहुत कष्टी झाले.." आणि बोलिले कि ,"आज एक बाजू पडली , प्रतापराव यास आपण लिहून पाठविले कि," फत्ते न करीत तोंड दाखवू नये " त्यासारखे करून बरे म्हणविलें आता लष्कराचा बंद कैसा होतो . ? सरनोबत कोण करावा ? "
आनंदराव या मागे राहिलेल्या सरदाराने खानाच्या जहागिरीवर झडप घातली, आणि खानाला पुन्हा विजापुरास पळून जावे लागले . मराठ्यांनी फत्ते झाली ...... . असे "वेडात दौडले वीर मराठे सात "
त्या सात जणात एक मुस्लिम सरदार होता" सिद्दी हिलाल ".
इतर लढ्यांमध्येही सिद्दी हिलालचा उल्लेख आढळतो . तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख होता . विजापुराहून" रुस्तुम झमान" विजापुरवरून कोल्हापुरास आला व पन्हाळा किल्ला घेण्यासाठी निघाला. दिवस होता २८डिसेम्बर १६५९ . रुस्तम झमानवर राज्यांच्या फौजेने हल्ला चढवला त्यात गोदाजी जगताप,नेतोजी पालकर ,हिरोजी इंगळे भिमाजी वाघ सिदोजी पवार हनुमंतराव खराडे जाधवराव, पांढरे, महाडिक यांच्या बरोबर होता सिद्दी हिलाल . पन्हाळगडावर झालेल्या लढाईत सिद्दी हिलालचा मुलगा सिद्दी वहवाह जखमी झाला. पन्हाळा घेतला. रुस्तम झमान याला हरवून मराठी फौजेने विशाळगड घेतला. प्रतापगडावरील १० नोव्हेंबर १६५९ दिवशी प्रतापगडावर अफजलखानाच्या सैन्याबरोबर झालेल्या लढाईत मराठा सरदारांबरोबर होता" सिद्दी हिलाल " . स्वराज्यच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. इतर जाती धर्माच्या लोकांच्या बरोबरीनं मुस्लिम धर्माच्या लोकांनी बलिदान दिले आहे .
दर्यासारंग ,दौलतखान ,इब्राहिमखान ,काझी हैदर ,सिद्दी इब्राहिम ,सिद्दी वाहवाह(हा सिद्दी हिलाल याचा मुलगा पन्हाळा लढाईत जखमी झाला. ) नुरखान बेग ,शामाद खान ,हुसेनखान मिदान , सिद्दी मिस्त्री ,सुल्तानखान, दाऊदखान ,मदारी मेहेतर आणखी खूप मुस्लिम सरदार, महाराजांचे अंगरक्षक, शिलेदार,हशम, मावळे या पदावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी इमाने इतबारे सेवा केली. आणि स्वराज रक्षिले. . शिवाजी महाराजांचे एक चित्र त्यांच्या मुस्लिम सैनिकांबरोबर काढलेले प्रसिद्ध आहे ते चित्र मीर मुहम्मद याने काढले होते .

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...