विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 17 July 2020

#कन्हेरेश्वर_मंदिर #कन्हेरखेड















#कन्हेरेश्वर_मंदिर
#कन्हेरखेड

postsaambhar:शेखर शिंदे सरकार

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कन्हेरखेड हे एक लहानसे खेड़े असले तरी हिन्दुस्थानचा इतिहासात यांचा सिंहाचा वाटा आहे,कन्हेरेश्वर या शिव मंदिराहुन या गावास कन्हेरखेड हे नाव रुजू झाल्याचे सांगितले जाते,या गावचा अनेक शतकांचा गौरवशाली इतिहास आहे, छत्रपतींशी सोयरे सबंध या गावचे होते तर थेट दिल्लीझुकवणाऱ्या असामी याच गावच्या,

कन्हेरखेड, गावाच्या चहु बाजूंनी दगडी तटबंधीचे अवशेष आज पहायला मिळतात तर गावात अनेक वाड्यांचे अवशेष पहावयास मिळतात,विशेष म्हणजे कन्हेरेश्वर मंदिर हे मंदिर खुप प्राचीन असून याचा जीर्णोद्धार राणोजी शिंदे यांनी केला, मंदिराच्या चारि बाजूनी दगडी बुरुंज होते सध्या तीन बुरुंज दिसतात व दगडी तटबंधी,मंदिराव कोरिव व दगडी नक्षी काम असून 4 मजबूत खंबावर गाभारा अजून पेलुन धरला आहे,समोरच प्रवेश द्वारा वर शरभ चे शिल्प आहेत,मंदिर हे खुप जागरूक मानले जाते व गावकरी मोठ्या भक्ति भावाने महादेवाची पूजा अर्चना करतात,

गभार्यात शिव पिंड व त्यावर फनीदार नाग आहे या मंदिराच्या आनेख आख्यायिका सांगितल्या जातात,मंदिरा बाहेर अनेक दगडी मुर्त्या आहेत तर काही विरंगळ आहेत,विशेष म्हणजे गावकरी ज्यास मूळ पुरुष म्हणून सांगतात त्यांची मूर्ति आहे त्यावर त्या पुरुषाच्या पाठी नागर व चंद्र सूर्य ही शिल्पे कोरली आहेत,या पुरतान शिल्पांचा अभ्यास होने गरजेचे आहे,

या मंदिरा सोबत गावात अनेक मंदिर आहेत,मारुती,विठ्ठल रुक्माई,जानुबाई,खंडोबा,ज्योतीबा,भैरोबा,तुकाराम महाराज यांची मंदिरे आहेत ज्याच्या वर शेषचिन्ह कोरलेले आहेत,कन्हेरेश्वराचा व जानुबाई मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता विजयाराजे यांनी केला,

याच सोबत गावात अनेक वास्तु मराठेशाहीचा इतिहास सामावुण मोठ्या दिमाखात उभ्या आहेत ज्या पहाणाऱ्याला नक्कीच भूतकाळात घेऊन जातात..!!


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...