१६३६ साली महाबली शहाजी महाराज हे आदिलशाहीतर्फे कर्नाटकात गेले, तेथून ते कारभार पाहू लागले. बाल शिवाजी, राजमाता जिजाऊ माँसाहेब व इतर मंडळी कर्नाटकात आल्यावर सर्वांना खूप आनंद झाला. थोड्याच दिवसात बाल शिवाजींचे शिक्षण सुरू झाले, त्यांच्या लेखन-वाचन याचा सराव सुरू झाला याविषयी शिवभारतात उल्लेख आला आहे. याविषयी कवी परमानंद म्हणतात
मग तो गुणवान मुलगा ( बाल शिवराय ) सात वर्षांचा झालेला पाहून तो मुळाक्षरे शिकण्यास योग्य झाला असे राजास ( शहाजी महाराज ) वाटले
प्रधानांच्या समवयस्क पुत्रांसह बुद्धीमान आणि स्पष्टोच्चार करणाऱ्या त्या पुत्राला गुरूच्या मांडीवर बसवले
गुरुजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात तोच हा दुसरे अक्षर सुद्धा लिहून दाखवत असे
सकल विद्यांचे द्वारच अशी जी मुळाक्षरे ती सर्व गुरुजींने त्याला उत्तम रीतीने उत्तम रीतीने शिकवली
तेंव्हा स्वभावतःच बुद्धिमान, सुस्वभावी आणि अवर्णनीय प्रभावाच्या त्या राजबिंड्याला ( बाल शिवराय ) सर्व विद्यार्थ्यां मध्ये इतक्या लवकर मुळाक्षरे शिकलेला पाहून गुरूला मोठा अभिमान वाटला आणि हा काही विलक्षण मुलगा अशी त्याने खूणगाठ बांधली..
त्याच बरोबर युद्ध उपयोगी शिक्षणाचे दररोजचे सराव सत्र सुरू झाले. अश्व रोहण, दौड, तलवारबाजी, भालाफेक इत्यादी शिक्षण सुरू झाले. बाल शिवराय हे कर्नाटकमध्ये महाबली शहाजी महाराज यांच्या बरोबर दरबारात जात असत सहाजिकच बाल शिवराय हे दरबाराचा कारभार पहात असत असे उल्लेख आढळतो त्यांना आपल्या वडिलांच्या लष्करी, प्रशासकीय, राजकीय कारभाराचा अनुभव घेता आला. हे सर्व शिक्षण सुरू होते ते महाबली शहाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या देखरेखीखाली, साधारणता आपल्या आईवडिलांच्या देखरेखीखाली बाल शिवरायांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळत होते हे सिद्ध होते.
१६४६-४७ साली दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या उद्योगास प्रारंभ केला. १६५८ सालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना संत रामदास स्वामी कोण होते हे देखील माहीत नव्हते यासंदर्भात एक पत्र उपलब्ध आहे तर १६७२ चे समर्थ संप्रदायाचे एक पत्र (खरे की खोटे हा पुढील भाग ) उपलब्ध असून त्यात संत रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची पहिलीच भेट होईल असा या पत्राचा सारांश आहे, असो याचा अर्थ १६७२ पर्यंत संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झालीच होती हे देखील आपल्याला ठामपणे म्हणता येत नाही. १६७४ साली शिवाजी महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करवून आपले सार्वभौमत्व सिद्ध केले आणि स्वराज्य स्थापनेला कळस चढवला..
एखाद्या राजाने आपल्या राज्यातील साधूसंतांना आश्रय देणे, त्यांचा आदर ठेवणे, देवस्थानांची सोय लावणे ही काही नवीन गोष्ट नाही तो राजधर्मच आहे, यावर अमात्यकृत आज्ञापत्र या साधनात वृत्ती आणि दान याप्रकरणात सविस्तर वर्णन आलेले आहे. १६७८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी संत रामदास स्वामी यांना चाफळची सनद दिल्याचे सांगितले जाते पण ती सनद बनावट आहे असे काही इतिहासकारांचे साधार मत आहे. अलीकडे काही इतिहास संशोधकांनी ब्रिटिश म्युझियममधील या सनदेची फोटोझिंक कॉपी आणली आहे. १६७८ ला दिलेली सनद जरी या इतिहास संशोधकांच्यामते खरी (?) आहे असे सिद्ध झाले तरी संत रामदास स्वामी यांनी स्वराज्य स्थापनेत भूमिका, उपदेश दिला हे सिद्ध होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० साली झाला, एकंदर ही कालखंड निहाय घटनाक्रम आणि नोंदी पाहता संत रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हा दावाच निखळून पडतो..
जुन्या वादाला ब्रिटिश म्युझियममधील फोटोझिंक कॉपी ( डिजिटली नकलवलेली प्रत ) या नावाखाली ग्लोरिफिकेशन देण्यात येत आहे, दुसरं नाविन्यपूर्ण असे काहीही नाही !!
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू हे महाबली शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब आहेत हेच सिद्ध होते ..
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment