नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची समाधी कुठे आहे ?
उत्तर : पिंपळ डोह.
स्पष्टीकरण :
मुरारबाजी देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - मृत्यू : ११ जून, १६६५) हे मराठा सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र ११ जून, १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले.
तब्बल दिड महिने पुरंदर लढता ठेवून ११ जून, १६६५ या दिवशी एक महान तेजस्वी तारा सुर्यतेजात मिसळला....दिलेरखानाचा बाण लागुन मुरारबाजी पुरंदरी पडले....त्यांची समाधी महाड जवळ पिंपळ डोह या गावात आहे. पिंपळ डोह येथील सोमेश्वर मंदिरासमोरील मुरारबाजींच्या भग्न समाधीची स्थान निश्चिती कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉ. सचिन पोवार यांनी दि. २६ मार्च २०१८ रोजी केली व किंजळोली ग्रामस्थाकडून या समाधीच्या जीर्णोद्धरासाठी ठराव मंजूर करून घेतला. याकामी हेमंत घुणके व गौरव जाधव यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले होते.
No comments:
Post a Comment