## होनाजीबाळा ##
postsaambhar:डॉ. उदयकुमार जगताप
ह्या कवीची "घनश्याम सुंदरा" श्रीधरा अरुणोदय झाला"
ही सुंदर भूपाळी ऐकली नाही.
असा मराठी माणूस विरळा आहे .
रा .देवल यांनी आपल्या शारदा नाटकातील "जरी कुणा श्रीमंतांची सून होय शारदा "
ह्या लोकप्रिय पदाची रचना ज्या मूळ पदाच्या चालीवर केली आहे.
ते "राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेई घेई "
हे पद्य होनाजीबाळा चे आहे.
महाराष्ट्रातील प्रतिभासंपन्न कवींपैकी होनाजीबाळा होत.
पेशवाईच्या शेवटच्या अमदानीत होनाजीबाळाचे नाव साऱ्या महाराष्ट्रात दुमदुमून राहिले.
सोलापूरस रामजोशी, कोकणात प्रभाकर
गंगथडीत परशुराम शाहीर
संगमनेर अनंतफ़ंदी
पुणे प्रांतात होनाजीबाळा व सगनभाऊ
ही सर्व प्रतिभावंत समकालीन होती .
यांनी मराठी वाङ्मयात आपापल्या परीने भर घातली आहे.
धाकट्या बाजीराव पेशवे यांच्या काळात लावण्या करणारे कवी व शाहीर उदयास आले.
एकदा "धाकटे बाजीराव पेशवे" म्हणाले," बैठकीच्या लावण्या कोणी रागतालात गाऊन दाखवल्या,
तर त्या आम्ही आनंदाने ऐकू".
बाजीराव त्या कलाकारांचे कार्यक्रम मोठ्या आवडीने ऐकत असत.
तमाशा या कलेचा उत्कर्ष हा "बाजीराव पेशवे" यांच्या काळात झालेला दिसतो.
बडोद्याचे "खंडेराव गायकवाड "यांनीही या कलेला उत्तेजन दिलेले दिसते.
"होनाजी" हा गवळी होता. त्याचे आडनाव "शिलारखाने".
त्याच्या आजोबांचे नाव "सातप्पा "गवळी ते स्वतः लावण्या रचून त्या स्वतः म्हणत असत .
सातप्पा हे शंकर भक्त होते.
त्यांची समाधी पुणे येथे संगमावर हरनामगिरीच्या काठावर आहे.
या स्थळास "शांतलींग" म्हणतात .
ह्या लिंगासमोर श्रावणमहिन्यात प्रत्येक सोमवारी तमाशा कलाकार हजेरी लावत असत .
सातप्पास तीन मुलगे होते.
बाळा ,कुशाबा आणि सयाजी या पैकी "बाळा "हा कवी गायक होता .
बाळाचा साथीदार "बहिरू रंगारी " ह्या दोघांच्या लावण्या प्रसिद्ध आहेत.
त्यात" बाळाबहिरू" अशी नावे आढळतात.
" होनाजीबाळा" हा सुद्धा असाच प्रकार आहे. होनाजीस घरचे लोक होनाप्पा असे म्हणत.
त्याचा जन्म 1754 मध्ये झाला.
त्याचा सोबती "बाळा शिंपी करांजकार" हा एक गुणी मनुष्य होता.
तो होनाजीच्या बैठकीतला होता .
तमाशात या दोघांची जोडी असल्याने त्यांना पेशवे या जोडीला" होनाजीबाळा" संबोधू लागले .
होनाजीच्या प्रत्येक लावणीत त्याने "होनाजीबाळा" असाच उल्लेख केला .
होनाजीचा चुलत "बाळा" व त्याचा साथीदार "बहिरू" हे उत्तम गवई होते.
सातप्पा च्या मागे त्यांनी हे नाव राखले.
होनाजीने आपल्या चुलत्याचे व आजोबाजे नाव राखले.
पेशवाईच्या अखेरच्या काळात शुक्रवार पेठेतून बावनखणीवर जाताना रागदारीचे
सुरात गाण्यासाठी ख्याल, टप्पे वगैरे गोष्टी कानावर पडू लागल्या.
होनाजीवर पेशव्यांची मर्जी बसली.
यांचेकडून शालू, दुपट्टे, पैसे खुपसारे द्रव्य व मानमरातब मिळाला.
हा सर्व पैसे त्याने "त्र्यम्बक डेंगळे" यांच्या घरी ठेवला होता .
पुढे त्र्यम्बक डेंगळ्यांवर "पटवर्धन शास्त्री "यांच्या खुनाचा आरोप येऊन
त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट लागली.
त्यात होनाजीबाळाची संपत्तीची वाताहत झाली.
शुक्रवारात "भातकर "यांच्या हवेली समोर पूर्वेस मारुतीचे देवालय आहे .
त्याचा शेजारी त्र्यम्बक डेंगळे यांचा वाडा होता.
त्यात एक खोली होनाजी बाळा ची होती.
होनाजीचा शेवट अत्यंत वाईट झाला.
त्यास संधी साधून दोघांनी "वानवडीच्या" अलीकडील रानात नेऊन मारेकरी घालून खूप मारले.
त्याला नंतर आदीतवार पेठेच्या कोपऱ्यावर आणून टाकले .
असे करण्यामागे होनाजीची पेशवे वाड्यात होणाऱ्या मानामुळे द्वेषाने त्यावर हल्ला करण्यात आला .
नागरिकांनी त्यास घरी आणले.
पण त्याला इतके बेदम मारले की त्या दिवशीच त्याचा अंत झाला .त्याचा मृत्यू
सन 1844 मध्ये झाला.
"बाळा बहिरू" यांची समाधी सासवड येथे आहे .
"होनाजीची समाधी "पुणे येथे संगमावर होती.
ती आता नाही.
तेथे खुणेसाठी एक "बेलाचे झाड "आहे .
कोंडणपूर येथील डोंगर माधवराव पेशवे यांनी चौधरी या गवळी समाजाच्या
लोकांना दिला होता व या घराण्याशी होनाजीच्या घराण्याचे शरीरसंबंध झाल्याने
त्याची गुरेही तेथे चरत असत.
पुढे तो डोंगर होनाजीस पेशव्यांकडून इनाम मिळाला असे लोक म्हणू लागले.
शनिवारवाडा येथून सालाना 300 रुपये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचेकडून100 रुपये त्यास मिळत असत.
होनाजी बाळा यांच्या खूप कविता व त्याचे चुलते बाळाबहिरू व आजोबा
सातप्पा यांचे खूप लिखाण "शंकर तुकाराम शाळिग्राम" याना 1879 मध्ये
सापडले.
होनाजीस संस्कृत भाषेचे ज्ञान होते.
हिंदी व गुजराथी भाषाही अवगत होती .
होनाजीबाळाच्या लावण्याचे वैशिष्ट्य म्हणजे गोड सुरच्या सोप्या चाली
,सूज्ञ व अज्ञ याना त्या सारख्याच प्रिय वाटतात ,शब्दलालित्य व
अर्थगांभीर्य हे गुण अवर्णीनिय आहेत .
पुराणातील कथानकांवर "कृष्णचरित्र "यावरही त्याने रचना केल्या आहेत.
होनाजीबाळाचे भाषा ज्ञान, धर्म ज्ञान, सुक्ष्मवलोकन हे गुण त्याच्या रचनेतून उद्गोचर होतात .
होनाजीचे "धोंडी सदाशिव "व "कांशीराम" शिष्य होते .
होनाजीबाळाने खुपसाऱ्या तीर्थयात्रा केल्या होत्या .
" पंढरीतील संतांची रूपे देवानेच धारण केली
" "श्रोता वक्ता आपण होऊनि रंग कीर्तन भरी "
हे त्याचे उद्गार परमार्थ विषयात त्याची गती होती,
हे दर्शवतात.
होनाजीने महाराष्ट्रातील साधुसंतांच्या नामावळीवरही एक मोठी लावणी रचली आहे.
हिंदी गुजराथी भाषांमध्येही त्याच्या रचना आहेत .
No comments:
Post a Comment