postsaambhar :डॉ उदयकुमार जगताप
सुपे मुक्कामी "खैरे" या नावाचे मराठा पाटील होता .
त्यांच्या वंशात एक "भाव्या" या नावाचा एक मार्तंड भक्त होता .
तो दर रविवारी सुप्याहून निघून कडेपठारी येत असे.
मार्तंडास अष्टभावें लीन होऊन पुन्हा सुप्यास जात असे .
पुढे त्यास येणे कठीण झाले.
कऱ्हा नदी ओलांडून अलीकडे आला.
व मूर्च्छित पडला.
उठल्यावर त्यास घोड्याचे खुर मातीत उमटलेले दिसले.
त्या ठिकाणास त्याने "घोडेउड्डाण "नाव दिले .
पुढे तो "जयाद्री "क्षेत्री (जेजुरी) निघून गेला .
त्याने झालेला प्रकार गावातील लोकांना सांगितला.
लोकांनी देवाची विधिवत यात्रा केली .
पुढे "विरपाळ "विरमल्ल या नावाचा एक मार्तंड भक्त होता.
त्याने सन1381 मध्ये मंदिराच्या आतील गाभऱ्याचे काम केले ..
खटाव मधील" राघो बंबाजीस "दिल्लीच्या बादशाहने जुन्नर प्रांतात बंदोबस्तासाठी नेमले होते.
तो मोठा मार्तंड भक्त होता.
त्याने मार्तंडाच्या यात्रेस आला असता.
त्याच्या मनात आले की या मार्तंडाच्या कृपेने मला सर्व प्राप्त झाले.
म्हणून या स्थळी आपण काहीतरी पुण्य करावे.
म्हणून सन1635 मध्ये गाभऱ्याचे काम व पुढील सदरचे काम
त्याने करवून घेतले .
सभोवती कोटाचे काम व ओवऱ्या बांधल्या.
या कामास त्याचे कोट्यवधी रुपये खर्च झाले .
राघो बंबाजीने पर्वताचे उत्तर बाजूस विहीर बांधली.
त्या विहिरीस "फकिरची विहीर "म्हणतात .
या राघो बंबाजीस बादशाह "राजे "या पदविने सन्मानित केले .
त्यांच्या वंशास "खटावकर" महाराज असे म्हणतात .
गझनीचा बादशाह याने जेजुरीचा गड फोडण्याचा प्रयत्न केला.
असता त्यास ते भुंग्यामुळे शक्य झाले नाही.
देवास शरण जाऊन त्याने एक लक्ष रुपयांचा भुंगा तयार करून देवास वाहिला..
तो पाचूच्या होता .
व भुंग्याच्या आकाराचा होता.
व सोन्याच्या कोंदणात बसवला होता.
सभोवताली लहान लहान कोंदणे करून त्यात उत्तम प्रकारची रत्ने बसवली होती .
पूर्वेची वस्ती मोडून गडाच्या उत्तर बाजूस वस्ती झाली .1689 मध्ये पंचलींगाचे देऊळ
सासवडचे" विठ्ठल शिवदेव दाणी "यांनी बांधले .
"अहिल्याबाई होळकर" यांनी पूर्वी जो खटावकर यांनी तट बांधला होता.
तो मोडकळीस आला होता.
तो उचकटून पुन्हा नवीन सुंदर तट बांधला .
धृतमारी व पश्चिम दरवाज्याचे काम सन 1742 मध्ये झाले.
बारद्वारीचे काम व काचेरीचे व चौघड्याचे काम म्हणजे उत्तर बाजूचे काम1756 मध्ये पूर्ण झाले .
1768 मधे आग्नेय बाजूचे व 1770 मध्ये दरवाजा व कोटाचे काम पूर्ण झाले.
दक्षिण बाजूचे खटावकर यांच्या दहा जशासतश्या ठेवून त्याच्या पुढे म्हणजे नैऋत्य कोनास काम केले.
ते काम सन1777 मध्ये झाले.
भंडार घरचे काम 1756 मध्ये श्रीगोंदेकर यांनी पूर्ण केले.
छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा उत्कर्ष झाल्या नंतर मार्तंड प्रित्यर्थ गावे इनाम दिली.
ती अशी
गोसावी या आडनावाच्या ब्राम्हणास कोळविहिरे हा गाव , जेजुरी येथील काही जमीन दिली.
त्यांचेकडे सेजारती चा नैवद्य व सोमवतीस व दसऱ्याच्या दिवशी मार्तंडाची स्वारी बाहेर शिकारीसाठी निघते .
त्या दिवशी सर्व यात्रेकरू व भक्त लोकांना म्हूशाहिरा म्हणजे बेल भंडार व जोंधळे वाटण्याचे काम देण्यात आले.
या कारणामुळे त्या ब्राम्हण वंशास "पेशवे" असे म्हणतात.
व नाझरे हे गाव "गौतम गोत्री" ब्राम्हणास देऊन त्यांचेकडे देवाजवळ पुराण वाचण्याचे काम देण्यात आले.
त्यांना "चौधरी "असे म्हणतात.
कुंभारवळंण येथील मोकसबाब व बेलसर मधील काही जमीन इनाम देऊन "मुजुमदार "या आडनावाच्या ब्राम्हणास म्हाळसाकांत समोर दररोज कीर्तन करण्याचे काम सांगितले.
चांदीच्या मल्हारी व म्हाळसेच्या मूर्ती अलंकारासह प्राणप्रतिष्ठा करून बसवल्या.
दुसऱ्या "चंदचिंदावरचे राजे" यांनी सुवर्णाचा खंडोबा म्हाळसेचा जोड प्रभावळीसह आलंकारयुक्त तयार करून पाठवला.
पेशवाईत "नारायणराव पेशवे" मरण पावल्या नंतर "गंगाबाईस "पुरंदर किल्ल्यावर ठेवले
व त्यांनी सवाई माधवराव पेशवे यांची गादी चालवली त्या वेळेस गंगाबाईस पुत्र व्हावा म्हणून नाना फडणवीसांनी एक लक्ष रुपयांचा नवस मार्तंडास केला होता.
तो त्यांनी फेडला.
तो मूर्ती, दगडी काम चांदीने मढवणे, चांदीची शाळूका व घंगाळे ,सुवर्णाचे मुखवटे, छत्री ,कलगी, तुरा वगैरे अलंकार केले .
श्रीगोंदेकरांनी भंडार घराचे काम केले त्यावेळेस केलेल्या पितळेच्या मूर्ती स्थापित केल्या.
यात्रेच्या दिवशी "वीर " लोक आहेत ते त्यांच्यापैकी एका मनुष्याचे मांडीचे रक्त शस्त्राने काढून रक्ताचा तिलक मार्तंडास लावीत असत.
ती प्रथा इंग्रजांनी बंद केली.
नवसाचे गळ टोचून घेणेही बंद केले .
होळकर घरण्याचे अन्नछत्र, चौघडा ,नंदादीप अहोरात्र झडत होता.
सुमारे सन 1837 मध्ये मार्तंड भैरवावर दरोडा पडला.
त्यावेळेस सोन्याचांदीच्या मूर्ती अलंकार लुटून नेले.
लोक आरडाओरडा करू लागले.
म्हणून त्यांनी काही मूर्ती रस्त्यात टाकल्या.
ओझे जास्त झाले काही अलंकार "लवथळेश्वराच्या" ओढ्यात पुरले .
व एक म्हाळसेची मूर्ती व रत्न जडीत भुंगा, चौकडा घेऊन गेले.
पुढे 12 वर्षांनी एक शेतकरी शेतात नांगर हकीत असता त्याला देवीची मूर्ती सापडली.
तो "बेलसर "गावचा होता.
मोठ्या समारंभाने जेजुरीचे लोक बेलसरास मूर्ती आणण्यासाठी गेले .
व जेजुरकारांनी मूर्तीची पुन्हा स्थापना केली.
कडे पठारी एक राम मंदिराची स्थापना" रामचंद्र मल्हार मूनसप "यांनी केली आहे.
कडेपठारावर " गोपाळबाबा" व "लक्ष्मणबाबा" हे साधू होऊन गेले.
त्यांनी म्हैषासुर देवीची स्थापना केली .
त्यांचे शिष्य "गोविंदबाबा" यांनी दत्त पंचायतनाची स्थापना केली.
मार्तंडाच्या वायव्येला "भगवानगीर" नावाचा परोपकारी साधू राहत होता .
त्याने एकदा" उमाजी नाईक" व त्यांचे साथीदार यांना इंग्रज मागे लागले असता त्यांची तहान भागवून मार्गस्थ केले.
भगवानगीर महाराज समाधिस्थ झाल्यावर त्या स्थळी मठ बांधला.
गडास एकंदर 1200 पाहिऱ्या ,
दीपमाळा, मनोरे 350
दरवाजे 22 आहेत.
पश्चिम बाजूस एक आवड असून त्यास" अब्दरखाना" म्हणतात .
आग्नेयेस पेशव्यांनी अष्टपैलू तलाव बांधला आहे.
पूर्व बाजूस गायमुख केले आहे .
चोरखजिना बांधून पाणी उडवले होते.
तलावाचे पूर्वेस पेशवे सरकारची बाग होती .
या तलावाच्या उत्तरेकडील वासहतीस "जुनी जेजुरी" अथवा "शुक्रवार पेठ" म्हणतात.
दुसरा तलाव पश्चिमेस "होळकरांनी "बांधला.
हा तलाव चौकोनी आहे.
तलावा भोवती होळकरांचे बगीचे होते .
याचा आग्नेयेस" मल्हारराव होळकर "यांची छत्री आहे.
1848 मध्ये देवीचा तीन शेर वजनाचा मुखवटा चोरांनी चोरून तोडून वाटून घेतला.
"धारचे पवार" यांनी देवाचा गाभारा चांदीने मढवून टाकला.
"तुकोजीराव होळकरांनीही" 1853 मध्ये चांदीचे पत्रे करून सात लक्ष रुपये खर्च केला.
मल्हार तीर्थीचे काम छत्रपती शाहूंनी केले.
या गावाची जोशी कुलकर्ण्याची वृत्ती" खाडे" व "बेलसरे" यांची आहे.
पाटीलकीचे वृत्तीत" खोमणे" व "माळवतकर" आशा दोन तक्षीमा आहेत.
या गावचे देवस्थान पंचात मुख्य सरपंच" रंगराव उर्फ आप्पासाहेब पुरंदरे" सासवडकर हे होते.
देवदर्शनाचा पाठ असा होता.
किल्ल्याच्या पायथ्याशी नंदी आहे.
त्याचे मुख दक्षिणेस आहे.
त्याचे दर्शन घेऊन पाहिऱ्या चढून गेले असता" वीरभद्र" आहे.
पुढे डाव्या बाजूस" हेगण" नामा सरदारांचे स्थान लागते.
येथे हेगणाचा तांदळा आहे.
या सरदारास "हेगडी प्रधान" म्हणतात .
उजव्या बाजूस गणपती महाद्वाराजवळ नंदी आहे .
पुढे डाव्या हाताला" समर्थ रामदासांनी" स्थापलेल्या मारुतीची मूर्ती आहे.
(दिपमाळेजवळ )
नंतर कोटचा दरवाजा लागतो.
राखणदार "यशवंतराव हवालदार" म्हणून दैवत आहे.
मार्तंड भैरवाचे समोर माणिदैत्याची मूर्ती आहे .
आशा जेजुरीत "सगनभाऊ" नावाचा एक विख्यात कवी होऊन गेला.
No comments:
Post a Comment